Mumbai Indians (MI) vs Chennai Super Kings (CSK) IPL 2026 Highlights: एल क्लासिको सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने बाजी मारली. मुंबई इंडियन्सचा या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने तब्बल १०३ धावांनी लाजिरवाणा पराभव केला. मुंबई इंडियन्सचा आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. तर चेन्नईचा मुंबईवरील सर्वात मोठा विजय आहे. संजू सॅमसनच्या शतकाच्या बळावर चेन्नई सुपर किंग्सने २०८ धावांचं लक्ष्य दिलं. तर प्रत्युत्तरात मुंबईचा संघ १०४ धावांवर सर्वबाद झाला. या पराभवाचा मुंबईला गुणतालिकेत मोठा फटका बसला आहे. तर चेन्नईने कमाल विजयासह मोठी झेप घेतली.

Live Updates

IPL 2026 MI vs CSK Highlights, 20 April 2026: आयपीएल 2026 मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स सामन्याचे हायलाईट्स

23:24 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: चेन्नईचा मुंबईवर दणदणीत विजय

गुर्जपनीत सिंगने 19व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहला झेलबाद करत मुंबई इंडियन्सला सर्वबाद केला. 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईचा डाव अवघ्या 104 धावांत गुंडाळला. यासह मुंबईला आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नईने मुंबईवर 103 धावांनी ऐतिहासिक विजय मिळवला.

23:18 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: २ षटकांत दोन विकेट्स

जेमी ओवर्टनच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात क्रिश भगत झेलबाद झाला. यानंतर पुढच्या षटकातील पहिल्या चेंडूवर अंशुल कंबोजने कनक्शन सबस्टिट्यूट शार्दुलला झेलबाद केलं.

23:04 (IST) 23 Apr 2026

मुकेश चौधरी आईच्या निधनानंतरही मैदानात उतरला; विकेट घेताच मैदानावर केलेली 'ती' कृती पाहून डोळ्यात येईल पाणी, VIDEO

Mukesh Chaudhary mother death: चेन्नईचा गोलंदाज मुकेश चौधरी आईच्या निधनानंतरही संघाकडून खेळण्यासाठी उतरला आणि विकेट घेतल्यानंतर केलेल्या कृतीने सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. ...वाचा सविस्तर
22:55 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: अकील हुसैनच्या खात्यात चौथी विकेट

अकील हुसैन मुंबई इंडियन्स संघावर चांगलाच भारी पडला. अकीलने १४व्या षटकात सूर्यकुमार यादवला झेलबाद करत मुंबईच्या पुनरागमनाच्या आशा धुळीस मिळवल्या.

22:49 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: नूर अहमदचे २ चेंडूत २ विकेट्स

नूर अहमदने १३व्या षटकात सामन्याचं चित्र पालटलं. नूरने षटकातील पहिल्या चेंडूवर हार्दिकला झेलबाद केलं. यानंतर दुसऱ्या चेंडूवर शेरफेन रूदरफोर्ड मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह मुंबईने १३ षटकांत ६ बाद ८७ धावा केल्या आहेत. आता मुंबईला विजयासाठी ४२ चेंडूत १२१ धावांची गरज आहे.

22:46 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: तिलक वर्मा क्लीन बोल्ड

अकील हुसैनने पॉवरप्लेमधील विकेट्सनंतर १२व्या षटकात तिलक वर्माला क्लीन बोल्ड करत मुंबईला मोठा धक्का दिला. तिलक वर्मा ३७ धावा करत माघारी परतला.

22:44 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: सूर्या-तिलकची जोडी जमली

सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या जोडीने सलग ३ विकेट्स गमावल्यानंतर संघाचा डाव सावरला आहे. दोघांनी अर्धशतकी भागीदारी रचत संघाचा डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. यासह १० षटकांत मुंबईने ३ बाद ७८ धावा केल्या आहेत.

22:14 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: पॉवरप्ले

चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावांना चांगलाच ब्रेक लावला आहे. पॉवरप्लेमध्ये मुंबईने ३ विकेट्स गमावत फक्त २९ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव व तिलक वर्माची जोडी मैदानावर आहे.

21:54 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: नमन धीर विकेट पाहून चकित

अकील हुसैनने तिसऱ्या षटकात कमालीचा चेंडू टाकत नमन धीरला क्लीन बोल्ड केलं. नमन स्टंप्स उडालेले पाहून चकित झाला आणि निराश होत माघारी परतला. यासह मुंबईने ३ षटकांत ३ बाद ११ धावा केल्या आहेत.

21:49 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: दुसऱ्या षटकात दुसरा धक्का

चेन्नईकडून दुसरं षटक टाकण्यासाठी मुकेश चौधरी आला. मुकेशने सलग ४ डॉट चेंडू टाकत चांगली सुरूवात केली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर मुकेशने क्विंटन डीकॉकला क्लीन बोल्ड केलं. मुकेशने ही विकेट आभाळाकडे पाहत आईला समर्पित केली. मंगळवारी २१ एप्रिलला मुकेश चौधरीच्या आईचं दीर्घ आजाराने निधन झालं.

21:45 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: मुंबईला पहिला धक्का

चेन्नईने दिलेल्या २०८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईला पहिल्याच षटकात मोठा फटका बसला. अकील हुसैनच्या गोलंदाजीवर दानिश मलेवार गोल्डन डकवर पायचीत होत बाद झाला.

21:23 (IST) 23 Apr 2026
MI vs CSK Live Cricket Score: चेन्नईने उभारला धावांचा डोंगर

संजू सॅमसनच्या शतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने २०७ धावांचा डोंगर उभारला आहे. संजूने नाबाद १०१ धावांची खेळी केली. यासह संजूने यंदाच्या हंगामातील दुसरं शतक झळकावलं आहे. ऋतुराज गायकवाड २२ धावा, डेवाल्ड ब्रेविस २१ धावांचं योगदान दिलं. यासह आता मुंबईला घरच्या मैदानावर विजयासाठी २०८ धावांचं आव्हान दिलं आहे.

21:19 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: संजू सॅमसनचं शतक

संजू सॅमसनने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना वादळी शतक झळकावलं आहे. संजू सॅमसनने अखेरच्या चेंडूवर चौकार लगावत आपलं शतक पूर्ण करत नाबाद परतला. संजूने ५४ चेंडूत १२७च्या स्ट्राईक रेटने नाबाद १०१ धावांची खेळी केली.

21:10 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: अश्वनीच्या खात्यात दुसरी विकेट

अश्वनी कुमारने स्पेलमधील अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर महत्त्वाची विकेट मिळवली. अश्वनीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ओवर्टन झेलबाद झाला. पण या षटकात सीएसकेने १५ धावा कुटल्या.

21:04 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: सँटनरचा कमाल कॅच

बुमराहच्या १७व्या षटकात कार्तिक शर्मा बुमराहला फटका खेळायला गेला आणि सँटनरने कमालीचा झेल टिपला. यासह चेन्नईने पाचवी विकेट गमावली. यासह संघाने १७ षटकांत १६६ धावा केल्या आहेत.

20:49 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: १५ षटकांत सीएसकेच्या १४९ धावा

कार्तिक शर्माने मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर २ षटकार लगावत आपल्या फलंदाजीची झलक दाखवली. यासह आता १५ षटकांत चेन्नईने ४ बाद १४९ धावा केल्या आहेत.

20:33 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: ब्रेविसला बाद करत अश्वनीने उघडलं विकेट्सचं खात

अश्वनी कुमार ११वं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या षटकात संजूने चौकार लगावत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यानंतर पाचव्या चेंडूवर ब्रेविसने चौकार खेचला. ब्रेविस अखेरच्या चेंडूवर पुन्हा मोठा फटका खेळायला गेला आणि झेलबाद झाला. ब्रेविस ११ चेंडूत १ चौकार व २ षटकारांसह २१ धावा करत बाद झाला.

20:31 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live: संजू सॅमसनचं अर्धशतक

चेन्नईचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने आपल्या उत्कृष्ट फॉर्माचा पुन्हा एकदा नमुना दिला आहे. संजूने मुंबई इंडियन्सविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर २६ चेंडूत आपलं अर्धशतक झळकावलं आहे. संजूच्या या खेळीच्या बळावर सीएसके मोठ्या धावसंख्येच्या दिशेने जात आहे.

20:29 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: 10 षटकांत 111 धावा

संजू सॅमसनच्या खेळीच्या योगदानासह चेन्नईने 10 षटकांत 111 धावांचा डोंगर उभारला आहे. एका टोकाकाडून विकेट्स पडत असताना संजूने संघाचा डाव सावरला.

20:16 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: शिवम दुबेला केलं क्लीन बोल्ड

अल्लाह गझनफर नवव्या षटकात गोलंदाजीला आला आणि त्याने येताच पहिल्या चेंडूवर संघाला मोठी विकेट मिळवून दिली. गझनफरने शिवम दुबेला क्लीन बोल्ड केलं. दुबे ५ धावा करत माघारी परतला.

20:14 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK: चेन्नई सुपर किंग्सच्या संघातील खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून का उतरले आहेत? काय आहे कारण?

CSK players black armbands: मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यात चेन्नई सपर किंग्स दोन्ही संघांचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून खेळत आहे, काय आहे कारण जाणून घेऊया. ...अधिक वाचा
20:09 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: सर्फराझ क्लीन बोल्ड

मिचेल सँटनर पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्यासाठी आला. त्याच्या पहिल्याच दोन चेंडूवर सर्फराझ खानने चौकार लगावले. तिसरा चेंडू डॉट राहिला. त्यानंतर सँटनरने अजून स्लो बॉल टाकत सर्फराझ खानला क्लीन बोल्ड केलं. यासह चेन्नईने २ विकेट्स गमावल्या आणि पॉवरप्लेमध्ये ७२ धावांचा डोंगर उभारला.

20:04 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: संजू सॅमसनकडून हार्दिक-बुमराहची धुलाई

संजू सॅमसनने हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. हार्दिक पंड्याच्या चौथ्या षटकात संजूने १९ धावा कुटल्या. संजूने तीन चौकार व एक षटकार लगावत वादळी फटकेबाजी केली. तर बुमराहच्या पाचव्या षटकात संजू सॅमसनने एक चौकार व एका षटकारासह १३ धावा कुटल्या. यासह ५ षटकांत चेन्नईने १ बाद ६४ धावा केल्या आहेत.

19:49 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: मुंबईला मिळाला ब्रेकथ्रू

मुंबई इंडियन्सला अल्लाह गझनफरने पहिली विकेट मिळवून दिली आहे. तिसऱ्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋतुराज सीमारेषेजवळ तिलक वर्माकरवी झेलबाद झाला. यासह चेन्नईची धावसंख्या ३ षटकांनंतर १ बाद ३२ धावा.

19:37 (IST) 23 Apr 2026

MI vs CSK Live Cricket Score: सामन्याला सुरूवात

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने गोलंदाजीला सुरूवात केली तर चेन्नईकडून संजू सॅमसन व ऋतुराज गायकवाडची जोडी मैदानावर उतरली आहे. यासह पहिल्या षटकात चेन्नईने बिनबाद 7 धावा केल्या आहेत.

19:08 (IST) 23 Apr 2026

MI playing 11:मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), नमन धीर, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या (कर्णधार), तिलक वर्मा, शेरफेन रदरफोर्ड, मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, क्रिश भगत, एएम गझनफर, अश्वनी कुमार

19:07 (IST) 23 Apr 2026
CSK playing 11: चेन्नई सुपर किंग्सची प्लेईंग इलेव्हन

संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), सरफराज खान, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, कार्तिक शर्मा, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, अंशुल कंबोज, गुर्जपनीत सिंग, मुकेश चौधरी

19:01 (IST) 23 Apr 2026
MI vs CSK Toss Live: नाणेफेक

एल क्लासिको सामन्याची नाणेफेक मुंबई इंडियन्सने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर सीएसकेचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. दोन्ही संघांचे माजी दिग्गज कर्णधार रोहित शर्मा आणि एम एस धोनी या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत.

18:34 (IST) 23 Apr 2026

महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्माच्या पुनरागमनाची उत्सुकता

चेन्नई सुपर किंग्स संघाचा आधारवड आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी तसंच मुंबईचा राजा माजी कर्णधार रोहित शर्मा हे दुखापतीतून सावरत पुनरागमन करणार का याकडे चाहत्यांचं लक्ष आहे. धोनीने बॅटिंगसह विकेटकीपिंगचाही सराव केला. दुसरीकडे रोहित शर्मानेही सराव केला आहे. रोहित आणि धोनी परतल्यास दोन्ही संघ बळकट होतील. चेन्नई आणि मुंबई दोन्ही संघांना यंदाच्या हंगामात लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

18:04 (IST) 23 Apr 2026

विल जॅक्स चेन्नईविरुद्धच्या लढतीसाठी उपलब्ध

ऑफस्पिनर आणि उत्तम फटकेबाजी करू शकणारा विल जॅक्स चेन्नईविरुद्धच्या लढतीसाठी उपलब्ध आहे. वैयक्तिक कारणास्तव विल जॅक्स भारतात दाखल झाला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी तो भारतात आला. त्याने संघाबरोबर सरावही केला. चेन्नईविरुद्धच्या लढतीत तो खेळण्याची शक्यता आहे. जॅक्स संघात आल्यामुळे शेरफन रुदरफोर्डला बाहेर बसावं लागू शकतं.

Mumbai Indians vs Chennai Super Kings Highlights: आयपीएलमधील एल क्लासिको सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबईचा १०३ धावांनी दारूण पराभव केला.