Mumbai Indians vs Delhi Capitals Match Updates: मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सला १४५ धावांवर सर्वबाद करत ५० धावांनी शानदार विजय नोंदवला. पहिल्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर मुंबईने दमदार पुनरागमन करत विजय मिळवला. दिल्लीने जेमिमावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. जेमिमा मुंबईची असून आज ती मुंबई इंडियन्सविरूद्ध कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळत होती. पण जेमिमासाठी सुरूवात मात्र नक्कीच अपेक्षेप्रमाणे झाली नाही.
MI vs DC Highlights, WPL 2026: वुमन्स प्रीमियर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सनने दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी दणदणीत विजय मिळवत विजयाचं खातं उघडलं आहे. सामन्यादरम्यान नेमकं काय काय घडलं, खाली सविस्तर वाचा...
दिल्ली कॅपिटल्सचा संघ १९ षटकांत १४५ धावांवर सर्वबाद झाला आहे. यासह मुंबई इंडियन्सनने दिल्लीवर ५० धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मुंबईचा यंदाच्या मोसमातील हा पहिला विजय आहे. दिल्लीला विजयासाठी मुंबईने १९६ धावांचं लक्ष्य दिलं होतं, पण मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर चिनेल हेन्री वगळता दिल्लीचे कोणतेच फलंदाज टिकू शकले नाहीत.
कर्णधार म्हणून जेमिमाला पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तिच्यासाठी व दिल्लीसाठी या मोसमाची सुरूवात खूप खराब झाली आहे.
चिनेल हेन्रीने ३१ चेंडूत ५ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा करत अर्धशतक केलं. यासह हेन्री ३३ चेंडूत ५६ धावा करत झेलबाद झाली. अमेलिया करने तिला झेलबाद करत माघारी धाडली. यासह मुंबईचा संघ विजयाच्या दिशेने पोहोचला आहे.
MI vs DC live: स्नेह राणा झेलबाद
स्नेह राणाने मोठे फटके खेळत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण ती ११ धावा करत झेलबाद होत माघारी परतला. यासह मुंबईने सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
MI vs DC live: अमेलिया करच्या खात्यात पहिली विकेट
अमेलिया करने १२व्या षटकात निकी प्रसादला क्लीन बोल्ड करत संघाला अजून एक विकेट मिळवून दिली. यासह दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला आहे. दिल्लीला आता विजयासाठी ४८ चेंडूत १०८ धावांची गरज आहे. मैदानावर चिनेल हेन्री व स्नेह राणाची जोडी आहे.
MI vs DC live: मारिजन काप माघारी
मारिजन काप व निक्की प्रसाद चांगली भागीदारी रचण्याच्या मनसुब्याने मैदानावर उतरल्या होत्या. निकोल कॅरीच्या षटकात चौकार-षटकार लगावत मारिजन कापने सुरूवात केली होती. पण त्याच षटकात कॅरीने तिला झेलबाद करत माघारी धाडलं.
MI vs DC live: जेमिमा रॉड्रिग्ज फेल
कर्णधार जेमिमा रॉड्रिग्ज स्वस्तात माघारी परतली आहे. २ विकेटस् गमावल्यानंतर शबनम इस्माईल गोलंदाजीला आली. शबनमने कमालीचा चेंडू टाकला आणि चेंडू जेमिमाच्या बॅटची कड घेत विकेटच्या मागे गेला, कमालिनीने कोणतीही चूक न करता एका हाताने चेंडू टिपला आणि संघाला चौथी विकेट मिळवून दिली.
MI vs DC live: एका षटकात २ विकेट
दिल्लीची आक्रमक सलामीवीर फलंदाज शफाली वर्मा स्वस्तात माघारी परतली आहे. मुंबईच्या निकोला कॅरीने तिला क्लीन बोल्ड करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. त्याच षटकात कॅरीने लॉरा वोल्वार्डला क्लीन बोल्ड करत अजून एक विकेट मिळवली.
MI vs DC live: दिल्लीला पहिला धक्का
दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर लिझेल ली पहिल्या सामन्यात १० धावा करत बाद झाली. नॅट स्किव्हरने तिसऱ्या षटकात तिला झेलबाद करवत माघारी धाडलं.
MI vs DC live: दिल्लीच्या डावाला सुरूवात
मुंबईने दिलेल्या १९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून शफाली वर्मा व लिझेल ली ही जोडी सलामीला उतरली आहे. पहलिया षटकात संघाने ५ धावा केल्या आहेत.
हरमनप्रीत कौरने अखेरच्या षटकात सलग ४ चौकार लगावत १९ धावा कुटल्या. हरमनप्रीत कौरने ४२ चेंडूत ८ चौकार व ३ षटकारांसह ७४ धावांची नाबाद वादळी खेळी केली. तर नॅट स्किव्हरने ४६ चेंडूत १३ चौकारांसह ७० धावांची खेळी केली. यासह मुंबई इंडियन्सनने ४ विकेट्स गमावत १९५ धावा केल्या. दिल्लीकडून नंदनी शर्मा, चिनेल हेन्री व श्रीचरणी यांनी १-१ विकेट्स घेतल्या. यासह दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सनने विजयासाठी १९६ धावांचं लक्ष्य दिलं आहे.
MI vs DC: जेमिमा रॉड्रिग्जने इतिहास घडवला, स्मृती मानधनाला मागे टाकत WPL मध्ये 'ही' कामगिरी करणारी पहिली खेळाडू
MI vs DC live: हरमनप्रीत कौरचं अर्धशतक
मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरची बॅट चांगलीच तळपली आहे. हरमनने दिल्लीविरूद्ध ३२ चेंडूत चौकार ३ षटकारांसह तिने ५३ धावा करत अर्धशतक झळकावलं आहे. यासह मुंबईची धावसंख्या १६०च्या पुढे गेली आहे.
MI vs DC live: हरमनप्रीतची फटकेबाजी
नॅट स्किव्हर ब्रंट व हरमनप्रीत कौर यांनी ४७ चेंडूत ६६ धावांची भागीदारी रचली होती. नॅट बाद झाल्यानंतरही हरमनने आपला आक्रमक अंदाज कायम ठेवला. हरमन ३८ धावांवर फलंदाजी करत आहे. तर मुंबईने १६ षटकांत ३ बाद १४३ धावा करत आहे.
नॅट स्किव्हर ब्रंट ७० धावा करत हरमनप्रीत कौरच्या साथीने वेगाने धावा करत होती. पण श्रीचरणीने मात्र तिला माघारी धाडलं आहे. १५व्या षटकात श्रीचरणीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नॅटला जेमिमाने झेलबाद केलं. नॅट ४६ चेंडूत १३ चौकारांसह ७० धावा करत झेलबाद झाली.
MI vs DC live: नॅट स्किव्हर ब्रंटचं अर्धशतक
नॅट स्किव्हर ब्रंटने संघाचा डाव सावरत ३२ चेंडूत १० चौकारांच्या मदतीने अर्धशतक केलं आहे. वुमन्स प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्यांची यादीत ती मेग लॅनिंगसह संयुक्तपणे पहिल्या स्थानी आहे. दोघींनीही स्पर्धेत ९ अर्धशतकं केली आहेत. यासह मुंबईने २ षटकांत ८० धावा केल्या आहेत.
MI vs DC live: पदार्पण करणाऱ्या नंदनी शर्माला मिळाली पहिली विकेट
दिल्लीकडून पदार्पण केलेली खेळाडू नंदनी शर्मा हिला पहिली विकेट मिळाली आहे. कमालिनीने तिच्या षटकातील पहिल्या दोन्ही चेंडूवर चौकार लगावत सुरूवात केली. पण पुढचा चेंडू तिच्या बॅटची कड घेत विकेटकिपरच्या हातात गेला, यासह मुंबईला दुसरा धक्का बसला.
MI vs DC live: पॉवरप्ले
नॅट स्किव्हर ब्रंटने संघाच्या डावाची जबाबदारी घेत फटकेबाजीला सुरूवात केली. जी कमालिनीने स्ट्राईक रोटेट करत तिला साथ दिली आहे. यासह मुंबईने पॉवरप्लेमध्ये १ विकेट गमावत ४३ धावा केल्या आहेत.
MI vs DC live: मुंबईला पहिला धक्का
मुंबईची पुन्हा एकदा खराब सुरूवात झाली आहे. हिली मॅथ्यूज संघात नसल्याचा मुंबईला दुसऱ्या सामन्यातही फटका बसला आहे. सलामीवीर अमेलिया कर चिनेल हेन्रीच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाली. त्यामुळे मुंबईला २ धावांवर पहिली विकेट गमावावी लागली.
MI vs DC live: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
मुंबईच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये या सामन्यात सायका ईशाक खेळणार नसून तिच्या जागी त्रिवेणी वसिष्ठ हिला संधी दिली आहे.
अमेलिया केर, जी कमलिनी (विकेटकिपर), नॅट स्किव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, पूनम खेमनार, त्रिवेणी वसिष्ठ, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता
MI vs DC live: दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग इलेव्हन
शफाली वर्मा, लिझेल ली (विकेटकिपर), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (कर्णधार), मारिझान काप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
MI vs DC live: नाणेफेक
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याची नाणेफेक दिल्लीने जिंकत जेमिमाने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यासह मुंबईचा संघ दुसऱ्या सामन्यातही फलंदाजीने सुरूवात करेल.
वुमन्स प्रीमियर लीगमधील पहिला डबल हेडर सामना आज १० जानेवारीला खेळवला जात आहे. यातील पहिला सामना गुजरात जायंट्स आणि युपी वॉरियर्ज यांच्यात खेळवण्यात आला, ज्यात गुजरातने विजय मिळवला. तर दुसरा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होत आहे.

MI vs DC Live Score Updates, WPL 2026: मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याचे हायलाईट्स
