IPL 2026, MI vs KKR Highlights in Marathi: मुंबई इंडियन्स संघाने १४ वर्षांनंतर आयपीएल स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकला आहे. २०१२ मध्ये मुंबईने अखेरचा सलामीचा सामना जिंकला होता, त्यानंतर गेली १४ वर्षे मुंबई स्पर्धेतील पहिली मॅच देवाला द्यायची. पण यावर्षी रोहित-रिकल्ट व शार्दुलच्या उत्कृष्ट कामगिरीच्या बळावर ६ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला.
MI vs KKR IPL 2026 Highlights: मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२६ सामन्याचे हायलाईट्स
मुंबई इंडियन्सनने १३ वर्षांनी जिंकला सलामीचा सामना, KKRवर मिळवला ऐतिहासिक विजय; रोहित-रिकल्टन-शार्दुल विजयाचे हिरो
MI vs KKR live: तिलक वर्मा झेलबाद
तिलक वर्मा १९व्या षटकात ६ धावांची गरज असताना मोठा फटका खेळताना झेलबाद झाला आहे.
१६ व्या षटकात ब्लेसिंग मुझरबानीच्या गोलंदाजीवर फटका खेळल्यानंतर रिकल्टनने एक धाव घेतली आणि दुसरी धाव घ्यायला गेल्यानंतर तिलकने समोरून त्याला थांबवलं. मागे जाईपर्यंत मुझरबानी त्याच्यासमोर आला आणि त्यामुळे तो पुढे जाऊ शकला नाही आणि झेलबाद झाला. यासह रिकल्टन ४३ चेंडूत४ चौकार व ८ षटकारांसह ८१ धावा करत बाद झाला. मुंबईला विजयासाठी २४ चेंडूत २६ धावांची गरज आहे.
MI vs KKR live: सूर्या झेलबाद
कार्तिक त्यागीने वर्ल्डकप विनिंग कर्णधार सूर्यकुमार यादवला १५व्या षटकात झेलबाद करत संघाला दुसरी विकेट मिळवून दिली. सूर्या ८ चेंडूत १६ धावा करत माघारी परतला.
१२व्या षटकात वैभव अरोराच्या षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा झेलबाद झाला. यासह अनुकूल रॉयने मागे धावत जाऊन कमालीचा झेल टिपला. रोहित शर्मा ३८ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांसह ७८ धावा करत बाद झाला.
Ryan Rickelton Fifty: रायन रिकल्टनचं अर्धशतक
रोहित शर्मानंतर रायन रिकल्टननेही दणदणीत अर्धशतक झळकावलं आहे. रिकल्टनने २४ चेंडूत २ चौकार व ६ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यासह मुंबई संघाने ९ षटकांत बिनबाद ११० धावांचा पल्ला पार केला.
रोहित शर्माने केकेआरविरूद्ध रनचेसमध्ये उत्कृष्ट फटकेबाजी करत दणदणीत अर्धशतक झळकावलं आहे. रोहितने अवघ्या २३ चेंडूत ३ चौकार व ५ षटकारांसह यंदाच्या हंगामातील पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. यासह मुंबईने पॉवरप्लेमध्ये बिनबाद ८० धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा व रायन रिकल्टनने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली आहे. रोहित व रिकल्टनने आक्रमक सुरूवात करत केकेआरच्या प्रत्येक गोलंदाजावर हल्लाबोल केला आहे.
MI vs KKR live: रिकलटन सुसाट
आयपीएल पदार्पण करणाऱ्या ब्लेसिंग मुझाराबानीच्या गोलंदाजीवर रिकलटनने तडाखेबंद षटकार चोपला.
MI vs KKR live: रिकलटनचे वैभवच्या गोलंदाजीवर दोन षटकार
वैभव अरोराच्या स्वैर गोलंदाजीचा फायदा उठवत रायल रिकलटनने उत्तुंग षटकार लगावले.
MI vs KKR live: रोहितची षटकाराने सुरुवात
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्माने खणखणीत षटकारासह सुरुवात केली आहे.
कोलकाता नाईट रायडर्सकडून अजिंक्य रहाणे, अंगक्रिश रघुवंशी आणि रिंकू सिंह यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या. यासह केकेआरने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद २२० धावांचा डोंगर उभारला आहे. रहाणे व रघुवंशीने अर्धशतकी खेळी केल्या. तर रिंकूने ३३ धावांचं योगदान दिलं. यासह मुंबई इंडियन्सला विजयासाठी आता २२१ धावांचं मोठं आव्हान देण्यात आलं आहे.
अंगक्रिश रघुवंशीने उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला २०० धावांच्या पलीकडे नेलं. रघुवंशी २९ चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा करत अर्धशतक केलं. पण यानंतर पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.
MI vs KKR live: केकेआरच्या २०० धावा पूर्ण
केकेआरने १९व्या षटकात २०० धावा पूर्ण केल्या आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणेनंतर उपकर्णधार रिंकू सिंहने अंगक्रिश रघुवंशीने संघाचा डाव सावरला.
MI vs KKR live: रोहितकडून कॅच ड्रॉप
वादळी फॉर्मात असलेल्या अंगक्रिश रघुवंशीचा झेल रोहितने सोडला. गझनफरच्या गोलंदाजीवर रघुवंशीने मोठा फटका खेळला. रोहित शर्मा सीमारेषेवर होता, रोहितने झेल टिपला पण त्याच्या हातातून चेंडू सुटला आणि चौकार मिळाला.
MI vs KKR live: शार्दुल ठाकूरच्या खात्यात मोठी विकेट
शार्दुल ठाकूरने १४व्या षटकात अजिंक्य रहाणेला बाद करत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली आहे. शार्दुलची या सामन्यातील तिसरी विकेट आहे. अजिंक्य रहाणे ४० चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांसह ६७ धावा करत बाद झाला. यासह १४ षटकांत केकेआरने ३ बाद १५० धावा केल्या आहेत.
मुंबईचा पोरगा अजिंक्य रहाणेने सलामीला उतरत कमालीची फटकेबाजी करत अर्धशतक झळकावलं. यासह अजिंक्यने २७ चेंडूत ३ चौकार व ४ षटकारांसह ५१ धावा केल्या. यासह केकेआरने १० षटकांत २ बाद १२० धावा केल्या आहेत.
शार्दुल ठाकूरने नवव्या षटकात मुंबईला अजून एक विकेट मिळवून दिली. शार्दुलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ग्रीन सीमारेषेजवळ झेलबाद झाला. शेरफन रूदरफोर्डने कमालीचा डायव्हिंग झेल टिपला. यासह ९ षटकांत केकेआरने २ बाद ११० धावा केल्या आहेत.
MI vs KKR live: शार्दुल ठाकूरच्या खात्यात पहिली विकेट
लॉर्ड ठाकूरला पॉवरप्लेमधील अखेरचं षटक टाकण्यासाठी बोलावलं. त्याने दुसऱ्याच चेंडूवर फिन एलनला झेलबाद करवत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. फिन एलन शार्दुलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेजवळ तिलक वर्माने कमालीचा झेल घेतला. यासह पॉवरप्लेमध्ये केकेआरने ६ बाद ७८ धावा केल्या आहेत.
MI vs KKR live: फिन एलनने केली हार्दिक पंड्याची धुलाई
हार्दिक पंड्याने दुसरं षटक चांगलं टाकल्यानंतर चौथं षटक टाकण्यासाठी आला आणि फिन एलनने त्याची चांगलीच शाळा घेतली. एलनने या षटकात २६ धावा कुटल्या. सुरूवातीच्या दोन चेंडूंवर षटकार आणि अखेरच्या ३ चेंडूवर चौकार लगावत संघाला ४ षटकांत बिनबाद ५८ धावा केल्या आहेत.
MI vs KKR live: केकेआरची चांगली सुरूवात
कर्णधार अजिंक्य रहाणेने ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात षटकार लगावला. तर एलनने तिसऱ्या षटकात अल्लाह गझनफरच्या गोलंदाजीवर २ षटकार व १ चौकार लगावला. यासह केकेआरने ३ षटकांत बिनबाद ३१ धावा केल्या.
मुंबई इंडियन्सने घडवला इतिहास, टी-२० इतिहासात अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली फ्रँचायझी
MI vs KKR Live: सामन्याला सुरूवात
मुंबई इंडियन्स आणि केकेआर यांच्यातील सामन्याला सुरूवात झाली आहे. केकेआरकडून फलंदाजीसाठी फिन एलन व अजिंक्य रहाणे ही जोडी उतरली आहे. तर गोलंदाजीत ट्रेंट बोल्टच्या हातात चेंडू आहे.
KKR Playing XI: केकेआरची प्लेईंग इलेव्हन
फिन ऍलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, रमणदीप सिंग, अनुकुल रॉय, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, ब्लेसिंग मुजराबानी
MI Playing XI: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शेरफन रूदरफोर्ड, नमन धीर, शार्दुल ठाकूर, मयंक मार्कंडे, अल्लाह गझनफर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह</p>
सबस्टीट्यूट खेळाडू
सूर्यकुमार यादव, कार्बिन बॉश, रॉबिन मिंज, अंगद बावा, अश्वनी कुमार
आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्स आणि केकेआर सामन्याची नाणेफेक मुंबई संघाने जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर केकेआरचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. मुंबईचा संघ ६ गोलंदाज आणि ५ फलंदाजांसह मैदानावर उतरणार आहे.
MI vs KKR Live: नाणेफेक किती वाजता होणार?
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील आयपीएल २०२६ चा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ७:०० वाजता होईल.
KKR vs MI: कोलकाता नाईट रायडर्सचा २०२६ साठी संपूर्ण संघ
अजिंक्य रहाणे (कर्णधार), मनीष पांडे, रोवमन पॉवेल, अंगक्रिश रघुवंशी, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वैभव अरोरा, हर्षित राणा, उमरान मलिक, वरुण चक्रवर्ती, कॅमेरॉन ग्रीन, फिन ऍलन, राहुल त्रिशतक, तृणमूर्ति, त्रिपाठी, फिन ऍलन. सेफर्ट, तेजस्वी दहिया, सार्थक रंजन, रचिन रवींद्र, आकाश दीप, प्रशांत सोलंकी, दक्ष कामरा
MI vs KKR: मुंबई इंडियन्सचा २०२६ साठी संपूर्ण संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, रायन रिकेल्टन, रॉबिन मिंग्स, मिशेल सँटनर, कॉर्बिन बॉश, नमन धीर, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, अल्लाह गफंजार, अश्विनी कुमार, दीपक चहर, विल जॅक्स, रघु बाफ शर्मा, मार्कन शेफर्ड, अनिल शेंडे, रघुन कुमार, अनिल शेंडे. शार्दुल ठाकूर, क्विंटन डी कॉक, मोहम्मद इझार, दानिश मलेवार, अथर्व अंकोलेकर, मयंक रावत

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders IPL 2026: मुंबई इंडियन्सने केकेआरचा पराभव करत १४ वर्षांनंतर स्पर्धेतील सलामीचा सामना जिंकला.
