Mumbai Indians vs Lucknow Super Giants: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना २२८ धावा केल्या होत्या. लखनौकडून निकोलस पूरनने दमदार अर्धशतकी खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने सर्वाधिक ८४ आणि रायन रिकल्टनने ८३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने २२९ धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे. या पराभवासह लखनौचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
Mumbai Indians vs Lucknow Super Giants : पाहा मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचे हायलाईट्स.
MI vs LSG Live Score: रोहित- रिकल्टनचं दमदार अर्धशतक! मुंबईचा ६ गडी राखून विजय; लखनौचं पॅकअप
या सामन्यात २२९ धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने ८४ धावांची खेळी केली. तर रायन रिकल्टनने ८३ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने लखनौवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे.
MI vs LSG Live: रोहित शर्माचं शतक थोडक्यात हुकलं! इतक्या धावांवर झाला बाद
रोहित शर्माकडे शतक झळकावण्याची संधी होती. पण तो ८४ धावा करून माघारी परतला आहे.
MI vs LSG Live: मुंबईला पहिला मोठा धक्का! रायन रिकल्टन परतला माघारी
रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने मिळून दमदार सुरूवात करुन दिली. दरम्यान रायन रिकल्टने ८३ धावांची खेळी केली.
MI vs LSG Live: रोहित- रिकल्टनची अर्धशतकं! मुंबईची विजयाच्या दिशेने वाटचाल
धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने दमदार सुरूवात करुन दिली आहे. दोघांनी दमदार अर्धशतकं झळकावली आहे.
MI vs LSG Live: रोहित - रिकल्टनची दमदार सुरुवात! मुंबईच्या ५० धावा पूर्ण
लखनौने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईला जशी सुरुवात हवी होती. तशी सुरुवात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टनने करून दिली आहे.
MI vs LSG Live: मुंबईसमोर स्पर्धेत टिकून राहण्याचं आव्हान! जिंकण्यासाठी इतक्या धावांची गरज
लखनौ सुपर जायंट्स संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. पण हवा तसा शेवट करता आलेला नाही. मुंबईने २० षटकांअखेर २२८ धावा केल्या आहेत. मुंबईला हा सामना जिंकण्यासाठी २२९ धावांची गरज आहे.
MI vs LSG Live: वानखेडेवर चौकार- षटकारांचा पाऊस! लखनौच्या २०० धावा पूर्ण
लखनौ सुपर जायंट्स संघाला या डावात चांगली सुरूवात मिळाली आहे. लखनौने १७ व्या षटकात २०० धावांचा पल्ला गाठला आहे.
MI vs LSG Live: रघुने लखनौला दिला पाचवा धक्का! विकेट घेताच केलं भन्नाट सेलिब्रेशन
मुंबईचा फिरकी गोलंदाज रघुने आपला पहिला सामना खेळत असलेल्या अक्षतला माघारी धाडलं. दरम्यान बाद करताच त्याने चिठ्ठी काढून भन्नाट सेलिब्रेशन केलं.
MI vs LSG Live: लखनौला तिसरा मोठा धक्का! कर्णधार ऋषभ पंत स्वस्तात परतला माघारी
लखनौ सुपर जायंट्स संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. कर्णधार ऋषभ पंत १५ धावा करून माघारी परतला आहे.
MI vs LSG Live: W,W...लखनौला बॉशचा दणका! एकाच षटकात दोघांना धाडलं माघारी
फॉर्ममध्ये नसलेल्या निकोलस पूरनला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. त्याने या डावात ६३ धावांची खेळी केली. तर मार्शने ४४ धावा केल्या. या दोघांना कॉर्बिन बॉशने बाद करत माघारी धाडलं.
MI vs LSG Live: पूरनचं दमदार अर्धशतक
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना निकोलस पूरनने अवघ्या १६ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं
MI vs LSG Live: लखनौच्या १०० धावा पूर्ण
आतापर्यंत लखनौचा संघ पावरप्लेमध्ये संघर्ष करताना दिसून येत होता. पण या सामन्यात लखनौच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात करून दिली आहे. पूरन आणि मार्शने मिळून ७ षटकात १०६ धावा जोडल्या आहेत.
MI vs LSG Live Score: पूरन- मार्शकडून चौकार- षटकारांचा पाऊस! पावरप्लेमध्ये केल्या इतक्या धावा
निकोलस पूरन आणि मार्शने मिळून पावरप्लेमध्ये ९० धावा जोडल्या आहेत.
MI vs LSG: मुंबईची दमदार सुरुवात! लखनौला पहिला मोठा धक्का, इंग्लिस परतला माघारी
लखनौ सुपर जायंट्स संघाला पहिला मोठा धक्का बसला आहे. जोस इंग्लिस अवघ्या १३ धावा करून माघारी परतला आहे.
लखनौ संघात तीन बदल
लखनौचा संघ असा
मिचेल मार्श, एडन मारक्रम, जोश इंगलिस, निकोलस पूरन, ऋषभ पंत (कर्णधार), अक्षत रघुवंशी, हिंमत सिंग, मोहम्मद शमी, मोहसीन खान, अवेश खान, प्रिन्स यादव
इम्पॅक्ट प्लेयर्स- सिद्धार्थ मनीमरन, दिग्वेश राठी, मयांक यादव, शाहबाझ अहमद, अब्दुल समद
मुंबईचा संघ
मुंबईचा संघ असा आहे
रायल रिकलटन, नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कार्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्ला गनफझर, राघू शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स- रोहित शर्मा, मयांक रावत, रॉबिन मिन्झ, शार्दूल ठाकूर, ट्रेंट बोल्ट
मुंबईने टॉस जिंकला; बॉलिंगचा निर्णय
मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला आहे.
सूर्यकुमार यादवकडे मुंबईचं नेतृत्व
हार्दिक पंड्या लखनौविरुद्धच्या लढतीत खेळणार नाहीये. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
जोश इंगलिस पदार्पण करणार
ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज जोश इंगलिस लखनौकडून पदार्पण करणार आहे. याआधी तो पंजाब किंग्ज संघाचा भाग होता. लग्नामुळे इंगलिस भारतात उशिरा दाखल झाला.
गुणतालिकेत तळाशी लखनौ पुनरागमन करणार?
दर्जेदार गोलंदाज असूनही आणि त्यांची कामगिरी चांगली होऊनही लखनौचा संघ गुणतालिकेत तळाशी फेकला गेला आहे. मोहम्मद शमी, मोहसीन खान यांनी सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र फलंदाज साथ देऊ शकलेले नाहीत.
रोहित शर्मा खेळणार का?
मुंबई इंडियन्स संघाच्या प्लेऑफ्सच्या आशा मावळत चालल्या आहेत. लखनौविरुद्धच्या लढतीत हिटमॅन रोहित शर्मा खेळणार का याचा निर्णय व्यवस्थापनाने त्याच्यावरच सोपवला आहे.
Mumbai Indians vs Lucknow Super Giants: पाहा मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचे हायलाईट्स
Mumbai Indians vs Lucknow Super Giants: पाहा मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपर जायंट्स सामन्याचे हायलाईट्स
