पीटीआय, मुंबई
खेळाची गती ठरविण्यापेक्षा केवळ प्रतिस्पध्र्यांचा पाठलाग करण्याची योजना आमच्या मोहिमेत मारक ठरत असून, आम्हाला आता लीगमध्ये टिकून राहण्यासाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याची कबुली मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुविरुद्धच्या पराड्टावानंतर दिली.

फिल सॉल्ट, विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या जोरावर बंगळूरुने उड्टया केलेल्या ४ बाद २४० धावांच्या बलाढ्य आव्हानाचा पाठलाग करताना, मुंबई इंडियन्सचा संघ ५ बाद २२२ धावांपर्यंतच मजल मारू शकला. शेर्फेन रुदरफोर्डने ३१ चेंडूंत नाबाद ७१ धावांची तुफानी खेळी करूनही मुंबईला विजय मिळवता आला नाही.

हंगामातील तिसर्‍या पराड्टावानंतर हार्दिक पंड्या म्हणाला, ‘‘मला वाटते की आम्ही खूप जास्त धावा दिल्या. त्यामुळे आम्ही सुरुवातीपासूनच पिछाडीवर होतो. गेल्या काही सामन्यांमध्ये आमचे गोलंदाज आणि फलंदाज खेळाचे नेतृत्व करण्याऐवजी केवळ पिछाडी ड्टारून काढण्याचा प्रयत्न करत आहेत.’’ या पराड्टावामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर फेकला गेला आहे, तर गतविजेता बंगळूरु संघ चार सामन्यांत तीन विजयांसह तिसर्‍या स्थानावर कायम आहे.

संघाच्या योजना यशस्वी होत नसल्याचे मान्य करत पंड्या म्हणाला की,‘‘आता विचार करण्याची वेळ आली आहे. आम्हाला आता दोन दिवसांची सुट्टी आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर, आता अनेक गोष्टींवर पुन्हा विचार करण्याची गरज आहे. सध्याच्या योजना काम करत नाहीत. काही सामन्यांत आम्ही नाणेफेक जिंकली आहे, पण आता फलंदाजी किंवा गोलंदाजी गट म्हणून आमच्याकडे इतर कोणते पर्याय आहेत हे पाहावे लागेल.’’
‘‘गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर अचूक प्रयत्न झाले, तर सर्व काही ठीक होईल. ‘पॉवरप्ले’मध्ये गती कशी मिळवता येईल, यावर आमची चर्चा सुरू आहे. कारण फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये आम्ही ‘पॉवरप्ले’मध्ये मागे पडत आहोत,’’असेही पंड्याने मान्य केले.

शेर्फेन रुदरफोर्डच्या फलंदाजीमुळे संघात बदल करण्याची लवचीकता मिळाली आहे. रुदरफोर्डकडे असलेली क्षमता आणि ताकद आम्हाला माहीत होती. त्याच्या फलंदाजीमुळे आम्हाला एक अतिरिक्त आधार मिळाला, असेही पंड्याने सांगितले.

बुमरापलीकडे विचार करणे गरजेचे -ड्यूप्लेसिस

मुंबई इंडियन्सला जसप्रीत बुमरावर अतिअवलंबून राहणे कमी करावे लागणार आहे. त्यांना लीगमध्ये प्रगती करायची असेल, तर गोलंदाजीच्या आघाडीवर बुमराच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची गरज आहे, असे मत दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फॅफ ड्यूप्लेसिस याने व्यक्त केले. ‘‘मुंबई इंडियन्सने यावेळी पहिला सामना हरण्याची प्रथा मोडली. पण, त्यानंतर त्यांनी सलग तीन सामने गमावले आहेत. वेगवान गोलंदाज बुमरा हा त्यांचा हुकमी एक्का आहे. परंतु, चार सामन्यांत त्याला अद्याप एकही बळी मिळवता आलेला नाही. मुंबई इंडियन्सला आता बुमराच्या पलिकडे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे. तसेच त्याचा वापर अधिक समजूतदारपणे करावा लागेल,’’असे ड्यूप्लेसिस म्हणाला.