IPL 2026 MI vs RCB Highlights in marathi: आयपीएल २०२६च्या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सला पराभवाचा धक्का दिला आहे. घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा १८ धावांनी पराभव केल्यानंतर आऱसीबीचा संघ आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबईचा संघ आठव्या स्थानी घसरला आहे. आरसीबीने वानखेडेवर सलग दुसऱ्यांदा मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे.
Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Highlights, IPL 2026: आयपीएल २०२६ मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याचे हायलाईट्स
MI vs RCB Live: रूदरफोर्डने दिली कडवी झुंज
इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या शेरफेन रूदरफोर्डने कडवी झुंज देत आयपीएल कारकीर्दीतील आपलं पहिलं अर्धशतक झळकावलं आहे. रूदरफोर्डने २६ चेंडूत १ चौकार व ६ षटकारांसह अर्धशतक झळकावलं.
MI vs RCB Live: नो बॉलवर विकेट
रसिक सलाम दारला दुखापत झाल्याने अखेरचा चेंडू टाकण्यासाठी रोमारियो शेफर्ड गोलंदाजीला आला. त्याच्या चेंडूवर रूदरफोर्ड मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. पण तो नो बॉल असल्याने रूदरफोर्डला जीवदान मिळालं.
MI vs RCB Live: नमन धीर झेलबाद
रसिक दर सलामने १६व्या षटकात नमन धीरला झेलबाद केलं आणि संघाला विजयाच्या अजून एक पाऊल पुढे नेलं. रसिक सलामला षटकादरम्यान अनेकदा पायाला दुखापतीचा त्रास झाला. पण तरीही तो सातत्यान गोलंदाजी करत होता.
MI vs RCB Live: हार्दिक पंड्या झेलबाद
जेकब डफीने १५व्या षटकात हार्दिक पंड्याला झेलबाद करत मुंबईला मोठा धक्का दिला आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त होत मैदानाबाहेर झाल्यानंतर मुंबईचा डाव कोसळला आहे. यासह आता मुंबईला ३० चेंडूत ९४ धावांची गरज आहे.
MI vs RCB Live: मुंबई इंडियन्सला तिसरा धक्का
कृणाल पंड्याने १३व्या षटकात सूर्यकुमार यादवला झेलबाद करत मुंबईला मोठा धक्का दिला आहे. सूर्या ३२ धावा करत बाद झाला आहे. यासह मुंबईला आता विजयासाठी ४६ चेंडूत १२० धावांची गरज आहे.
MI vs RCB Live: सुयशच्या एका षटकात दुसरा धक्का
सुयश शर्माने ८व्या षटकात तिलक वर्माला झेलबाद करत मुंबई इंडियन्सला दुसरा मोठा धक्का दिला आहे. तिलक १ धाव करत माघारी परतला.
MI vs RCB Live: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का
आठव्या षटकात सुयश शर्मा फलंदाजीला आला आणि त्याने येताच पहिल्या चेंडूवर रायन रिकल्टनला झेलबाद करत संघाला मोठा विकेट मिळवून दिला. रिकल्टन २२ चेंडूत ३६ धावांची खेळी करत बाद झाला. यासह मुंबईने ७ षटकांत ७२ धावा केल्या आहेत. मुंबईला विजयासाठी ७७ चेंडूत १६९ धावांची गरज आहे.
MI vs RCB Live: रोहित शर्मा मैदानाबाहेर
आरसीबीने दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा पॉवरप्लेमधील अखेरच्या षटकात रिटायर्ड हर्ट होत मैदानाबाहेर गेला आहे. रोहित शर्माच्या हॅमस्ट्रिंगमध्ये फलंदाजी करताना सातत्याने त्रास होत होता. अखेरीस रोहितने सहाव्या षटकातील दोन चेंडू झाल्यानंतर मैदानाबाहेर जाण्याचा निर्णय़ घेतला आहे. रोहित शर्माच्या जागी आता सूर्यकुमार यादव फलंदाजीला आला आहे.
रोहितने लगावला उत्तुंग षटकार
मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने जेकब डफीच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेट क्षेत्रात उत्तुंग षटकार लगावला.
रायल रिकलटनची आक्रमक सुरुवात
२४१ धावांच्या प्रचंड लक्ष्यासमोर खेळताना रायल रिकलटनने मुंबईला वेगवान सुरुवात करून दिली आहे.
MI vs RCB live: मुंबईला विजयासाठी इतक्या धावांचं लक्ष्य
ट्रेंट बोल्टने अखेरच्या षटकात एक विकेट घेत यॉर्करच्या मदतीने उत्कृष्ट षटक टाकलं. पण टीम डेव्हिडने अखेरच्या चेंडूवर षटकार खेचत आरसीबीला २४० धावांचा पल्ला गाठून दिला. यासह आऱसीबीने २० षटकांत ४ बाद २४० धावा केल्या आहेत. या मोठ्या धावसंख्येत विराट कोहलीचं अर्धशतक, फिल सॉल्टच्या ७८ धावा तर रजत पाटीदारच्या ५३ धावा आणि टीम डेव्हिडच्या नाबाद ३४ धावांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सला जर हा सामना जिंकायचा असेल तर २० षटकांत २४१ धावांचं मोठं लक्ष्य गाठावं लागणार आहे.
MI vs RCB live: जितेश शर्मा झेलबाद
१९व्या षटकात बुमराहविरूद्ध १२ धावा कुटल्यानंतर अखेरच्या षटकात ट्रेंट बोल्ट गोलंदाजीला आला. बोल्टने अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जितेश शर्माला झेलबाद केलं.
MI vs RCB live: आरसीबीच्या २०० धावा पूर्ण
आरसीबीने १७व्या षटकात २०० धावांचा पल्ला गाठला आहे. मैदानावर आता जितेश शर्मा व टीम डेव्हिडची जोडी आहे. त्यामुळे संघ उर्वरिक षटकांमध्ये किती धावा करणार, यावर सर्वांच्या नजरा आहेत.
रजत पाटीदारने वादळी खेळी करत १७ चेंडूत दणदणीत अर्धशतक झळकावलं आहे. रजतने १७ चेंडूत ४ चौकार व ५ षटकारांसह ही खेळी केली. अर्धशतकी खेळीनंतर मिचेल सँटनरने त्याच १६व्या षटकात पाटीदारला झेलबाद केलं.
विराट कोहलीने मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यात आयपीएलमधील ६५वं अर्धशतक झळकावलं आहे. एका टोकाकडून फटकेबाजी होत असताना विराटने सावधपणे आपला डाव पुढे नेला यासह विराटने ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. अर्धशतकानंतर पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळताना विराट कोहली झेलबाद झाला आहे.
रजत पाटीदारने येताच चौकार लगावत आपले मनसुबे जाहीर केले. त्यानंतर त्याने मयंक मार्कंडेच्या षटकात दणदणीत ३ षटकार लगावले आणि ६ चेंडूत २३ धावा केल्या आहेत. १३ षटकांत आरसीबीने १ बाद १६७ धावा केल्या आहेत.
MI vs RCB live: मुंबईच्या खात्यात पहिली विकेट
मुंबई इंडियन्सला ११व्या षटकात पहिली विकेट मिळाली आहे. शार्दुल ठाकूरने ११व्या षटकातील पाचव्या चेंडूवर चतुराईने फिल सॉल्टला बाद करत मुंबईला मोठी विकेट मिळवून दिली. विराट व सॉल्टने मिळून १२० धावांची भागीदारी रचली होती. सॉल्ट ३६ चेंडूत ६ चौकार व ६ षटकारांसह ७८ धावांची खेळी केली.
MI vs RCB live: १०० धावांचा पल्ला गाठला
फिल सॉल्ट व विराट कोहली या जोडीने आरसीबीला ८.४ षटकांत संघाला १०० धावांचा पल्ला गाठून दिला आहे. यासह दोघांनी १०० अधिक धावांची भागीदारी रचली आहे.
Phil Salt Fifty: फिल सॉल्टचं अर्धशतक
फिल सॉल्टला सूर गवसला असून त्याने वानखेडेच्या मैदानावर वादळी फटकेबाजी केली आहे. सॉल्टने २५ चेंडूत ४ चौकार व ४ षटकारांसह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. या अर्धशतकानंतर त्याने आरसीबीच्या डगआऊटकडे पाहून छाती ठोकत आक्रमक सेलिब्रेशन केलं. सॉल्टने याच आठव्या षटकात ३ चौकार व एका षटकारासह दणदणीत सेलिब्रेशन केलं आहे. यासह ८ षटकांत आरसीबीने बिनबाद ९५ धावा केल्या आहेत.
MI vs RCB live: पॉवरप्ले
आरसीबीने पॉवरप्ले आपल्या नावे केला आहे. आरसीबीने पॉवरप्लेमध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडला आहे. यासह अवघ्या ६ षटकांत सॉल्ट व विराटने एकही विकेट न गमावता ७० धावांचा पल्ला गाठला.
MI vs RCB live: सॉल्टची षटकारांची हॅटट्रिक
फिल सॉल्टने पाचव्या षटकात मिचेल सँटनरची चांगलीच धुलाई केली आहे. सॉल्टने सलग तीन चेंडूंवर ३ षटकार लगावत दणक्यात सुरूवात केली. यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने चौकार खेचला. यासह ५ षटकांत आरसीबीने बिनबाद ६५ धावा केल्या आहेत.
MI vs RCB live: आरसीबीने ३ षटकांत किती धावा केल्या?
मुंबई आणि आरसीबी यांच्यातील सामन्यात विराट कोहली व फिल सॉल्ट यांच्या सलामी जोडीने दणक्यात सुरूवात केली आहे. ट्रेंट बोल्ट व हार्दिक पंड्या यांची धुलाई करत दोघांनी सुरूवातीच्या ३ षटकांत ३३ धावा केल्या आहेत.
MI vs RCB: मुंबई इंडियन्स व आरसीबीचे खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून का उतरले? काय आहे नेमकं कारण?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी २ मिनिट मौन पाळत आशाताईंना श्रध्दांजली अर्पण केली आहे.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/2043328199317467148
RCB Playing 11: आरसीबीची प्लेईंग इलेव्हन
फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडेय, जसप्रीत बुमराह
MI vs RCB Toss Live: नाणेफेक
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्याची नाणेफेक झाली असून मुंबईने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह आरसीबीचा संघ प्रथम फलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल.
MI vs RCB Head to Head: हेड टू हेड
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील जय-पराजयाचे पारडे पाच वेळच्या विजेत्या संघाच्या बाजूने झुकलेलं आहे. या दोन संघांमध्ये एकूण ३४ सामने खेळले गेले असून, त्यांत मुंबईने १९ आणि बंगळूरने १५ सामने जिंकले आहेत.
MI vs RCB Live: किती वाजता होणार नाणेफेक?
मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामना ७.३० वाजता सुरू होणार असून ७ वाजता सामन्याची नाणेफेक होणार आहे.
MI vs RCB Live: मुंबई-आरसीबीमध्ये लढत
आयपीएल २०२६ मधील रविवार १२ एप्रिल डबल हेडरमधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.

Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Highlights:आरसीबीने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. या सामन्यात काय काय घडलं, जाणून घ्या
