IPL 2026 MI vs RCB Players Wearing Black Armbands: आयपीएल २०२६ मध्ये आज १२ एप्रिलचा डबल हेडरमधील दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होत आहे. मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियममध्ये आजचा सामना खेळवला जात आहे. मुंबई इंडियन्सने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर आरसीबीचा संघ फलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे. मुंबईच्या संघात २ तर आरसीबीच्या संघात १ असे या मोठ्या सामन्यासाठी बदल करण्यात आले आहेत. पण या सामन्यासाठी दोन्ही संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरले आहेत, यामागचं कारण जाणून घेऊया.
आज १२ एप्रिलला सकाळी गानसम्राज्ञी आशाताई भोसले यांचं निधन झालं. आशाताईंना ११ एप्रिलला प्रकृती बिघडल्याने ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण १२ एप्रिलला त्यांचे मल्टीपल ऑर्गन फेल झाल्याने अखेरचा श्वास घेतला. मुंबई आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यापूर्वी खेळाडू व चाहत्यांनी जागेवर शांत उभ राहून आशाताईंना श्रध्दांजली वाहिली.
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी दोन्ही संघांचे खेळाडू आशाताईंना श्रध्दांजली म्हणून हातावर काळी पट्टी बांधून आजचा सामना खेळण्यासाठी उतरले आहेत. गायिका आशा भोसले यांनी जगभरातील चाहत्यांना आपल्या सुमधूर आवाजाने मंत्रमुग्ध केलं होतं आणि अनेक भारतीय खेळाडूंनाही त्यांची गाणी आवडत असत, तसेच त्यातील बरेच जण त्यांचे मोठे चाहतेही होते. आशा भोसले यांच्या निधनानंतर, अनेक भारतीय खेळाडूंनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपलं दुःख व्यक्त केलं.
मुंबई इंडियन्सने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्यांना अल्लाह गझनफर आणि दीपक चहर यांच्या जागी मिचेल सँटनर आणि मयंक मार्कंडे यांना संघात स्थान दिलं आहे. तर आरसीबीने जोश हेझलवूडच्या जागी जेकब डफीला संघात घेतलं आहे. जोश हेझलवूड दुखापतीनंतर गेल्या सामन्यात संघात परतला होता. पण आता मुंबई इंडियन्सविरूद्ध सामन्यासाठी त्याच्याजागी पुन्हा डफीला संधी देण्यात आली आहे.
आरसीबीची प्लेईंग इलेव्हन
फिल सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), टिम डेव्हिड, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रोमॅरियो शेफर्ड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, सुयश शर्मा
मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, शार्दुल ठाकूर, ट्रेंट बोल्ट, मयंक मार्कंडेय, जसप्रीत बुमराह</p>
