IPL 2026 MI vs SRH Highlights: मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानावर ६ विकेट्सने दारूण पराभव केला आहे. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना रायन रिकल्टनच्या नाबाद १२३ धावांच्या खेळीच्या बळावर २४३ धावांचा डोंगर उभारला. पण मुंबईचे गोलंदाज मात्र या मोठ्या धावसंख्येचा बचाव करण्यात अपयशी ठरले. प्रत्युत्तरात अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड व हेनरिक क्लासेन यांच्या फटकेबाजीने संघाचा विजय निश्चित केला. तर अखेरच्या षटकांत सलील अरोराने १० चेंडूत ३० धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. या विजयासह हैदराबादचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्स ९व्या स्थानी आहे.

Live Updates

IPL 2026 Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: आयपीएल २०२६ मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद सामन्याचे हायलाईट्स

23:36 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: हैदराबादचा मुंबईवर दणदणीत विजय

सनरायझर्स हैदराबाद संघाने मुंबईने दिलेल्या २४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना १९व्या षटकात ६ विकेट्सने सहज विजय मिळवला. यासह मुंबईने घरच्या मैदानावर सलग चौथा सामना गमावला आहे. हेनरिक क्लासेनने ६० धावांची खेळी करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. तर सलील अरोराने हार्दिकच्या १९व्या षटकात चौकार-षटकारांची आतिषबाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

23:34 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: हैदराबाद विजयाच्या उंबरठ्यावर

हैदराबादला विजयासाठी १२ चेंडूत ११ धावांची गरज आहे. क्लासेनबरोबर सलिल अरोराने कमालीची फलंदाजी करत विजयाच्या दिशेने अग्रेसर होत आहे.

23:24 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: नितीश रेड्डी झेलबाद

१७व्या षटकात ट्रेंट बोल्टच्या दुसऱ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात नितीश रेड्डी झेलबाद झाला. आता हैदराबादला विजयासाठी २२ चेंडूत ३१ धावांची गरज आहे.

23:21 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: हेनरिक क्लासेनचं अर्धशतक

हेनरिक क्लासेनने २२ चेंडूत वादळी अर्धशतक झळकावलं आहे. या अर्धशतकासह सनरायझर्स हैदराबादने १६व्या षटकात २०० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह आता १६ षटकांनंतर हैदराबादची धावसंख्या ३ बाद २१२ धावा आहे, तर हैदराबादला विजयासाठी २४ चेंडूत ३२ धावांची गरज आहे.

23:03 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: रिकल्टनची वादळी फटकेबाजी

हैदराबादने सलग ३ विकेट्स गमावल्यानंतर हेनरिक क्लासेनने संघाचा डाव सावरला आहे. क्लासेनने १२ चेंडूत ३१ धावा केल्या आहेत. यासह १२ षटकांत हैदराबादने ३ बाद १६८ धावा केल्या आहेत.

22:47 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: ट्रव्हिस हेडच्या रूपात मोठी विकेट

गझनफरनंतर हार्दिक पंड्या १०वं षटक टाकण्यासाठी आला आणि त्याने या षटका ३ सिंगल्स देत चौथ्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडच्या रूपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली. विल जॅक्सने कमालीचा झेल टिपत हेडला बाद केलं. हेडने ३० चेंडूत ४ चौकार व ८ षटकारांसह ७६ धावांची खेळी केली.

22:42 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: गझनफरच्या एका षटकात दोन विकेट्स

अभिषेक शर्मा व ट्रॅ्व्हिस हेडच्या जोडीने मुंबई इंडियन्सची चांगलीच धुलाई करत १२९ धावांची भागीदारी रचली होती. नवव्या षटकात अल्लाह गझनफर पुन्हा गोलंदाजीला आला. त्याच्या चौथ्या चेंडूवर अभिषेक शर्मा मोठा फटका खेळताना झेलबाद झाला. यानंतर पाचव्या चेंडूवर इशान किशन क्लीन बोल्ड झाला. यासह मुंबईला २ चेंडूत २ विकेट्स मिळाल्या. ९ षटकांनंतर सामन्याचं चित्र २ बाद १३० धावा झाल्या आहेत. आता हैदराबादला विजयासाठी ६६ चेंडूत ११४ धावांची गरज आहे.

22:29 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: अश्वनी कुमारच्या पहिल्याच षटकात २३ धावा

सनरायझर्स हैदराबादने अश्वनी कुमारच्या पहिल्याच षटकात २३ धावा चोपून काढल्या.

22:21 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: बुमराहची धुलाई, हैदराबादने पॉवरप्लेमध्ये लुटल्या ९२ धावा

आताच्या घडीला जगातला सर्वोत्तम गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहला ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या बॅटचा तडाखा बसला.

22:12 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: हैदराबाद सुसाट

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दमदार फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना निष्प्रभ केलं आहे.

22:03 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: हैदराबादची चांगली सुरूवात

मुंबई इंडियन्सने दिलेल्या २४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने दणक्यात सुरूवात करून दिली आहे. पहिल्या ३ षटकांत अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी ४३ धावांची खेळी केली.

21:31 (IST) 29 Apr 2026
MI vs SRH Live Cricket Score: मुंबईने विजयासाठी दिलं इतक्या धावांचं लक्ष्य

रायन रिकल्टनच्या नाबाद १२३ धावांच्या बळावर मुंबई इंडियन्सने मोठी धावसंख्या उभारली आहे. मुंबईने २० षटकांत ५ बाद २४३ धावा केल्या आहेत. मुंबईकडून या सामन्यात विल जॅक्सने २२ चेंडूत ३ षटकार ५ चौकारांसह ४६ धावांची खेळी केली, तर रायन रिकल्टन ५५ चेंडूत १० चौकार व ८ षटकारांसह १२३ धावा करत माघारी परतला. याशिवाय नमन धीरने २२ धावा, हार्दिक पंड्या ३१ धावांचं योगदान दिलं.

यासह सनरायझर्स हैदराबाद संघाला विजयासाठी २४४ धावांचं तगडं आव्हान दिलं आहे.

21:29 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: तिलक वर्मा झेलबाद

सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी केली. २०व्या षटकात प्रफुल हिंगेच्या गोलंदाजीवर तिलक वर्मा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला.

21:21 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: हार्दिक पंड्या झेलबाद

साकिब हुसैनने १९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याला झेलबाद करत संघाला महत्त्वाची विकेट मिळवून दिली. हार्दिक १५ चेंडूत २ चौकार व २ षटकारांसह ३२ धावा करत बाद झाला.

21:11 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: रायन रिकल्टनचं शतक आणि मुंबई २०० धावांच्या पलीकडे

रायन रिकल्टनने ४४ चेंडूत वेगवान शतक झळकावलं आणि पुढच्या चेंडूवर १ चौकार लगावला. यानंतर त्याच्या पुढच्या प्रफुल हिंगेच्या षटकात हार्दिक पंड्याने २१ धावा कुटल्या. यासह १६व्या षटकात मुंबईने २०० धावांचा पल्ला पार केला आहे.

21:08 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH: रायन रिकल्टनचं रौद्र रूप! अवघ्या इतक्या चेंडूत झळकावलं वादळी शतक, मुंबईसाठी अशी कामगिरी करणारा पहिला फंदाज

Ryan Rickelton Hundred: रायन रिकल्टनने सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामन्यात त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे. ...अधिक वाचा
20:48 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: मुंबईला नमन धीरच्या रूपात मोठा धक्का

प्रफुल हिंगेला १४वं षटक टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. या षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने नमन धीरला झेलबाद केलं. नमन मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. यासह मुंबईची धावसंख्या १३.४ षटकांत ४ बाद १६५ धावा आहे.

20:37 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: ११ षटकांत मुंबईच्या किती धावा?

रिकल्टन आणि नमन धीरच्या जोडीने मुंबईचा डाव सावरला असून १२ षटकांत मुंबई २ बाद १५६ धावा केल्या आहेत.

20:21 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: सूर्याने पुन्हा केलं निराश

विल जॅक्स बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. सूर्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारत सामन्याला सुरूवात केली. पण पुन्हा एकदा तो फक्त ५ धावा करत बाद झाला. पूल मारण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार झेलबाद झाला. यंदाच्या आयपीएलमध्ये सूर्या खूप खराब फॉर्मात असून त्याचा हा खराब फॉर्म कायम राहिला आहे. यासह ८.४ षटकांनंतर मुंबई २ बाद १११ धावांवर खेळत आहे.

20:14 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: रायन रिकल्टनचं अर्धशतक

रायन रिकल्टने वादळी सुरूवात करत आपलं अर्धशतक झळकावलं आहे. रिकल्टने अवघ्या २३ चेंडूत ४ षटकार व ५ चौकारांसह अर्धशतक पूर्ण केलं. यासह मुंबई इंडियन्सने आठव्या षटकात १०० धावांचा पल्ला पार केला.

20:12 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: विल जॅक्स बाद

मुंबई इंडियन्सकडून रायन रिकल्टन व विल जॅक्सच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचली होती. यासह विकेटच्या प्रतिक्षेत असलेल्या सनरायझर्स हैदराबादने नितीश रेड्डीला गोलंदाजीसाठी पाठवलं. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात विल जॅक्स झेलबाद झाला. जॅक्सच्या बॅटची कड घेत चेंडू इशानच्या हातात गेला आणि मुंबईला पहिला धक्का बसला. मुंबईची स्थिती ७.१ षटकानंतर १ बाद ९३ धावा अशी आहे.

20:02 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live Cricket Score: पॉवरप्ले

मुंबई इंडियन्सची पॉवरप्लेमध्ये चांगली सुरूवात झाली आहे. रिकल्टन व विल जॅक्सच्या जोडीने ६ षटकांत संघाला ७८ धावांपर्यंत पोहोचवलं. प्रफुल हिंगे व साकिब हुसैन यांच्या गोलंदाजीवर चांगलीच धुलाई केली आहे.

19:53 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सचं अर्धशतक

मुंबई इंडियन्सने ४.१ षटकांत बिनबाद ५० धावांचा पल्ला पार केला आहे. फिरकीपटू हर्ष दुबेच्या गोलंदाजीवर विल जॅक्सने षटकार खेचला आणि संघाचं अर्धशतक पूर्ण केलं.

19:47 (IST) 29 Apr 2026
MI vs SRH Live: मुंबईची चांगली सुरूवात

विल जॅक्स व रायन रिकल्टनच्या जोडीने मुंबईला चांगली सुरूवात करून दिली आहे. ३ षटकांत मुंबईने ३७ धावा केल्या आहे. जॅक्स १७ धावा तर रिकल्टन १९ धावा करत खेळत आहेत.

19:31 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Live: सामन्याला सुरूवात

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्याला सुरूवात झाली असून रायन रिकल्टन व विल जॅक्सची जोडी मैदानावर उतरली आहे. तर हैदराबादकडून पॅट कमिन्सने गोलंदाजीला सुरूवात केली आहे.

19:19 (IST) 29 Apr 2026

Sunrisers Hyderabad Playing XI: सनरायझर्स हैदराबादची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, सलील अरोरा (यष्टीरक्षत), नितीश कुमार रेड्डी, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्ष दुबे, साकिब हुसेन, प्रफुल हिंगे, एशान मलिंगा

19:10 (IST) 29 Apr 2026

Mumbai Indians Playing XI: मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन

रायन रिकल्टन, विल जॅक्स, नमन धीर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), रॉबिन मिन्झ, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, एएम गझनफर, अश्वनी कुमार

19:06 (IST) 29 Apr 2026

MI vs SRH Toss Live: रोहित शर्माबाबत अपडेट

रोहित शर्मा हॅमस्ट्रिंग दुखापतीमुळे गेल्या बऱ्याच सामन्यांना मुकला आहे. हैदराबादविरूद्ध सामन्यात तो पुनरागमन करेल, अशी माहिती समोर येत होती. पण रोहित शर्मा अद्याप पूर्ण झाला नसल्याने अजून १-२ सामन्यांना मुकणार आहे, असी माहिती हार्दिक पंड्याने नाणेफेकीदरम्यान दिली आहे.

19:04 (IST) 29 Apr 2026
MI vs SRH Toss Live: नाणेफेक

सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामन्याची नाणेफेक मुंबई इंडियन्सने जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह सनरायझर्स हैदराबाद संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करणार आहे.

18:40 (IST) 29 Apr 2026

मुंबई केशव महाराजला संधी देणार?

मिचेल सँटनर दुखापतग्रस्त झाल्याने मुंबई इंडियन्स संघाने दक्षिण आफ्रिकेच्या केशव महाराजला समाविष्ट केलं आहे. केशव भारतात दाखल झाला असून त्याने सरावही केला. मुंबईसाठी गनफझर चांगली गोलंदाजी करत आहे. त्याच्या जोडीला केशव खेळणार का मयांक मार्कंडेयला पुन्हा संधी देणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. टी२० प्रकारात अतिशय शिस्तबद्ध गोलंदाजीसाठी केशव प्रसिद्ध आहे. आयपीएल स्पर्धेत तो दोन सामने खेळला आहे.

Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad Highlights: मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादने घरच्या मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं, सामन्यात नेमकं काय काय घडलं, वाचा सविस्तर