MI-W vs GG-W WPL Playoff 2025 Highlights: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ मधील एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने दणदणती विजयासह अंतिम फेरीत दुसऱ्यांदा धडक मारली आहे. मुंबई इंडियन्सने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात जायंट्सचा ४७ धावांनी आणि ५ चेंडू राखून मोठा हरमनच्या संघाने पराभव केला. मुंबईकडून सलामीवीर हिली मॅथ्यूजने अष्टपैलू खेळी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. याशिवाय हरमनप्रीत कौरने २२३ च्या स्ट्राईक रेटने १२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावांची वादळी खेळी केली. तर हिली आणि नॅट स्किव्हर ब्रंटने मुंबई इंडियन्ससाठी १३३ धावांची सर्वात मोठी भागीदारी रचली. यासह मुंबई इंडियन्स आता अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध खेळताना दिसणार आहे.

Live Updates

MI vs GG Match Highlightd in Marathi: वुमन्स प्रीमियर लीग २०२५ च्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पराभव करत धडक मारली आहे. मुंबईकडून संपूर्ण संघाने उत्कृष्ट कामगिरी करत संघाचा विजय निश्चित केला.

23:34 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: गुजरातचा संघ ऑल आऊट

गुजरात जायंट्सचा संघ १६६ धावांवर सर्वबाद झाला, यासह मुंबई इंडियन्सच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे.

22:55 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: दोन विकेट

हिली मॅथ्यूजने १६ व्या षटकात तिसऱ्या चेंडूवर भारती फुलमालीला क्लीन बोल्ड करत मुंबईच्या विजयाच्या आशा उंचावल्या. तर अमेलिया करने १८व्या षटकातील पहिल्या चेंडूवर सिमरन शेखला झेलबाद करत मुंबईला आठवी विकेट मिळाली. कॅप्टन हरमनप्रीत कौरने उत्कृष्ट झेल टिपला.

22:36 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: तिसरा रनआऊट

शबनम इस्माईलच्या षटकात गुजरातने तिसरी विकेट रनआऊटच्या रूपात गमावली. काश्वी गौतम १३व्या षटकात धाव घेण्याच्या नादात धावबाद झाली. हरमनप्रीतने उत्कृष्ट थ्रो करत धावबादमध्ये मोठी भूमिका बजावली.

22:30 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: मुंबईच्या खात्यात महत्त्वाची विकेट

१२ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अमेलिया करने मोठी विकेट मिळवली. लिचफिल्ड मोठा फटका खेळण्यासाठी पुढे आली आणि चेंडू खेळायला चुकली. चेंडू थेट विकेटकिपर यस्तिकाच्या हातात गेला आणि तिने स्टंपिंग करत महत्त्वाची विकेट मिळवली. लिचफिल्ड २० चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह ३१ धावा करत बाद झाली.

22:21 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: ११ षटकांत १०० धावा

गुजरात जायंट्सने लिचफिल्डच्या खेळीच्या जोरावर १०० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह गुजरातला विजयासाठी ५४ चेंडूत ११२ धावांची गरज आहे.

22:18 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: गुजरातची अजून एक खेळाडू रनआऊट

गुजरात जायंट्सकडून फिबी लिचफिल्ड आणि डॅनियल गिब्सन यांनी संघाचा डाव सावरला होता. पण एक जास्तीची धाव घेण्यात डॅनियल गिब्सन धावबाद झाली. यासह गुजरातला १०व्या षटकात दुसरी विकेट मिळाली. तर गुजरातने १० षटकांत ४ बाद ८८ धावा केल्या आहेत.

21:55 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: तिसरी विकेट

हरलीनच्या विकेटनंतर मॅथ्यूजच्या पुढच्या षटकातील चौथ्या चेंडूवर गुजरातची कर्णधार एश्ले गार्डनरला क्लीन बोल्ड करत मोठी विकेट आपल्या नावे केली. अशारितीने गुजरातने पॉवरप्लेमध्ये ३ बाद ४६ धावा केल्या.

21:53 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: दुसरी विकेट

सामन्यातील पाचव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हरलीन देओल धावबाद झाली. हरलीनने चेंडू खेळून एक धाव घेण्याचा प्रयत्न केला पण संस्कृती गुप्ताने चांगली फिल्डिंग करत पटकन चेंडू विकेटकिपर यस्तिकाच्या दिशेने थ्रो केला आणि संघाला दुसरी विकेट मिळवून दिली.

21:33 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: पहिली विकेट

मुंबईने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला मोठा धक्का बसला आहे. संघाची महत्त्वाची फलंदाज आणि सलामीवीर बेथ मुनी अवघ्या ६ धावा करत बाद झाली. गुजरातच्या डावातील पाचव्या चेंडूवर शबनम इस्माईलने उत्कृष्ट चेंडू टाकत इस्माईलने मूनीला हिलीकरवी स्लिपमध्ये झेलबाद केलं.

21:32 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: पहिली विकेट

मुंबईने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला मोठा धक्का बसला आहे. संघाची महत्त्वाची फलंदाज आणि सलामीवीर बेथ मुनी अवघ्या ६ धावा करत बाद झाली. गुजरातच्या डावातील पाचव्या चेंडूवर शबनम इस्माईलने उत्कृष्ट चेंडू टाकत इस्माईलने मूनीला हिलीकरवी स्लिपमध्ये झेलबाद केलं.

21:06 (IST) 13 Mar 2025
MI vs GG Live: मुंबई इंडियन्सची ऐतिहासिक धावसंख्या

मुंबई इंडियन्सने नाणेफेक गमावत प्रथम फलंदाजीला उतरली. यासह मुंबईने WPL च्या इतिहासातील मुंबई इंडियन्स संघाने त्यांची स्वतंत्र सर्वात मोठी धावसंख्या उभारली. मुंबईने ४ विकेट्स गमावत २१३ धावा केल्या आहेत. मुंबईने २६ धावांवर यस्तिका भाटियाची पहिली विकेट गमावली. पण नंतर हिली मॅथ्यूज आणि नॅट स्किव्हर ब्रंट यांनी १३३ धावांची मोठी भागीदारी रचत संघाला ऐतिहासिक धावसंख्या गाठून दिली. हिली मॅथ्यूजने ५० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावा केल्या.

तर नॅट स्किव्हर ब्रंटने ४१ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांसह ७७ धावांची खेळी केली. तर हरमनप्रीत कौरने वादळी खेळी केली. हरमनने १२ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह ३६ धावा केल्या. यासह मुंबईने २१३ धावा करत गुजरातला विजयासाठी २१४ धावांचे आव्हान दिले आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1900210614922076462

20:50 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: हिली मॅथ्यूज झेलबाद

काश्वी गौतमच्या १७व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हिली मॅथ्यूज विकेटच्या मागे झेलबाद झाली. विकेटकिपर बेथ मूनीने एक कमालीचा झेल टिपला. यासह मुंबईने १७ षटकांत २ बाद १६६ धावा केल्या आहेत.

20:23 (IST) 13 Mar 2025
MI vs GG Live: हिली मॅथ्यूजचं अर्धशतक

हिली मॅथ्यूजने ११व्या षटकात शानदार षटकारासह आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. हिलीने ३६ चेंडूत १ षटकार आणि ८ चौकारांसह ५० धावा केल्या. यासह मुंबई संघाने ११ षटकांत १०० धावांचा पल्ला गाठल. तर नॅट १६ चेंडूत ३० धावा करत मैदानावर कायम आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1900197050018586964

20:12 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: हिली मॅथ्यूजची चौकारांची हॅटट्रिक

मुंबईची सलामीवीर हिली मॅथ्यूजने प्रिया मिश्राच्या आठव्या षटकात सलग तीन चौकार लगावत मुंबईच्या धावांमध्ये महत्त्वपूर्ण भर घातली आहे. प्रिया मिश्राच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूवर हिलीने शानदार फटकेबाजी करत चौकार लगावले. यासह मुंबईने ८ षटकांत १ बाद ६५ धावा केल्या.

20:05 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: ५० धावा पूर्ण

नॅट स्किव्हर ब्रंट आणि हिली मॅथ्यूज यांनी मिळून ७ षटकांत ५० धावा केल्या. नॅट १४ धावा तर हिली १७ धावा करत खेळत आहे.

19:55 (IST) 13 Mar 2025
MI vs GG Live: मुंबई इंडियन्सला पहिला धक्का

मुंबई इंडियन्सला ५व्या षटकात पहिला धक्का बसला. डिएंड्रा डोटिनच्या जागी संघात आलेल्या गिब्सनला तिच्या पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर पहिली विकेट मिळाली. यासह यस्तिका १५ धावा करत बाद झाली. तर मुंबईने ५ षटकांत १ बाद ३१ धावा केल्या आहेत.

19:43 (IST) 13 Mar 2025
MI vs GG Live: मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला सुरूवात

मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीला सुरूवात झाली असून मुंबईकडून हिली मॅथ्यूज आणि यस्तिका भाटियाची जोडी उतरली आहे. यासह मुंबईने ३ षटकांत बिनबाद १६ धावा केल्या आहेत.

19:08 (IST) 13 Mar 2025
Mumbai Indians Eliminator Playing 11: गुजरात जायंट्सची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्स संघाने एलिमिनेटर सामन्यात संघात मोठा बदल केला आहे. फिरकीपटू पारूनिका सिसोदियाच्या जागी अनुभवी साईका इशाकला संघात संधी दिली आहे.

हिली मॅथ्यूज, अमेलिया कर, नॅट स्किव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनीम इस्माईल, सायका इशाक

19:07 (IST) 13 Mar 2025
Gujarat Giants Eliminator Playing 11: गुजरात जायंट्सची प्लेईंग इलेव्हन

गुजरात जायंट्स संघाला अखेरच्या क्षणी मोठा धक्का बसला आहे. संघाची अष्टपैलू खेळाडू डिएंड्रा डॉटिन एलिमिनेटर सामन्यापूर्वी दुखापत झाल्याने सामन्याबाहेर झाली आहे. तिच्या जागी डॅनिएल गिब्सन हिला संधी देण्यात आली आहे.

बेथ मुनी (यष्टीरक्षक), काश्वी गौतम, हरलीन देओल, एशले गार्डनर (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, डॅनिएल गिब्सन, भारती फुलमाली, सिमरन शेख, तनुजा कंवर, मेघना सिंग, प्रिया मिश्रा

19:02 (IST) 13 Mar 2025
MI vs GG Toss Update: नाणेफेक

गुजरात जायंट्स संघाने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. गुजरात संघात अखेरच्या क्षणी मोठा बदल झाला आहे. तर मुंबईच्या संघातही एक बदल पाहायला मिळत आहे.

18:50 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: मुंबई वि. गुजरात

मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स यांच्याती हा सामना ७.३० वाजता सुरू होणार आहे. तर हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळवला जात आहे.

18:31 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: गुजरात जायंट्सने जिंकले ४ सामने

गुजरातने आठ सामन्यांपैकी ४ सामने जिंकले तर ४ सामन्यात त्याला पराभव पत्करावा लागला. यासह गुजरातचा संघ ८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे आणि वुमन्स प्रीमियर लीगच्या तिसऱ्या सीझनच्या प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्क केलं.

18:15 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: मुंबईने जिंकले ५ सामने

एलिमिनेटर सामन्यापूर्वी, मुंबईने या मोसमात एकूण ८ सामने खेळले होते, ज्यात संघाने ५ सामने जिंकले होते, तर ३ सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ५ सामने जिंकून या संघाने १० गुणांची कमाई केली आणि गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. साखळी टप्प्यातील आरसीबीविरूद्ध अखेरच्या सामन्यात मुंबईला ९ धावांनी पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे मुंबईचा संघ एलिमिनेटर सामना खेळत आहे. मुंबईने जर तो सामना जिंकला असता तर संघ थेट फायनलमध्ये पोहोचला असता.

18:04 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Eliminator Live: मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई हा सामना जिंकून अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल, पण त्यांच्यासमोर एश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स संघ आहे, ज्याने साखळी सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. साखळी सामन्यांनंतर मुंबई संघ १० गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे, तर गुजरात संघ ८ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. तर युपी आणि आरसीबीचा संघ साखळी फेरीतून स्पर्धेतून बाहेर झाले आहेत.

17:57 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: मुंबई इंडियन्सचा संपूर्ण संघ

हिली मॅथ्यूज, अमेलिया कर, नॅट स्किव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, शबनिम इस्माईल, पारुनिका सिसोदिया, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लार्क, किर्तन बालाकृष्णन, साईका इशाक, जिन्तिमणी कलिता, अमनदीन कौर, अक्षिता महेश्वरी

17:56 (IST) 13 Mar 2025

MI vs GG Live: गुजरात जायंट्सचा संपूर्ण संघ

बेथ मुनी (यष्टीरक्षक), काश्वी गौतम, हरलीन देओल, ऍशले गार्डनर (कर्णधार), फोबी लिचफिल्ड, डिआंड्रा डॉटिन, भारती फुलमाली, सिमरन शेख, तनुजा कंवर, मेघना सिंग, प्रिया मिश्रा, लॉरा वोल्वार्ड, डॅनिएल गिब्सन, दयालन हेमलता, मन्नत कश्यप, शबनम एमडी शकील, प्रकाशिका नाईक, सायली सातघरे

MI-W vs GG-W WPL Eliminator 2025 Highlights: मुंबई इंडियन्स वि. गुजरात जायंट्स सामन्याचे हायलाईट्स

Story img Loader