पुढील महिन्यात १७ ऑक्टोबरपासून ICC Mens T20 World Cup ला सुरुवात होणार असून १४ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. मात्र, या सर्व पार्श्वभूमीवर क्रिकेट प्रेमींसाठी सर्वात मोठी घोषणा म्हणजे कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीचं कमबॅक!  भारताला दोन वेळा विश्वचषक जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी भारतीय टीमसोबत वर्ल्डकपमध्ये असणार आहे. यंदाच्या T20 World Cup मध्ये धोनी भारतीय संघाचा मेंटॉर अर्थात मार्गदर्शक म्हणून संघासोबत असेल, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जाहीर केलं होतं. दरम्यान, धोनीच्या मेंटॉर च्या रुपात निवडीबाबत अनेक दिग्गज खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने धोनीबाबत मोठे विधान केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलमध्ये धोनीने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याच्यापेक्षा सर्वोत्तम कर्णधार सध्या क्रिकेट विश्वात नाही. विशेषतः आरसीबी विरुद्धच्या सामन्यादरम्यान धोनीने आपल्या कर्णधारपदाचे आणखी एक उदाहरण सर्वांसमोर ठेवले. फलंदाजी क्रम बदलला आणि सामना वाचण्यासाठी चतुर असणे किती महत्त्वाचे आहे हे दाखवून दिले. 

ICC T20 World Cup : धोनी पुन्हा जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्डकप? बीसीसीआयची मोठी घोषणा!

क्रिकबझशी बोलताना, इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याने धोनी बाबत मोठे वक्तव्य केले आहे आणि म्हटले आहे की, बीसीसीआयने टी -20 विश्वचषकासाठी धोनीला मेंटॉर म्हणून संघात समाविष्ट केले आहे, हा एक चांगला निर्णय आहे. टी -20 विश्वचषकात भारताला धोनीच्या चतूर रणनीतीची गरज असेल. 

धोनी खेळपट्टीच्या आधारावर

वॉन धोनीच्या कर्णधारपदाबद्दल म्हणाला की, ” धोनी खेळपट्टीच्या आधारावर सामन्यात फलंदाजी क्रम बदलतो, ते कोण गोलंदाजी करतो यावर अवलंबून असतो. धोनीला असे वाटले की मॅक्सवेल कदाचित पुन्हा गोलंदाजी करणार आहे आणि दोन किंवा तीन षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी करेल, आणि म्हणून त्याने उजव्या हाताच्या फलंदाजाला फलंदाजीसाठी पाठवले”.

धोनीच्या निवडीमुळे संघर्षाची ठिणगी पडण्याची भीती?; सुनील गावसकरांनी व्यक्त केली शंका

भारतीय टी -20 संघाचा हा सर्वात मोठा निर्णय

यावर वॉन पुढे म्हणाले की, तुम्हाला आतापर्यंतचा सर्वात मोठा टी -20 कर्णधार (धोनी) मिळाला आहे आणि मला माहित आहे की जेव्हा त्याला टी वर्ल्ड कपसाठी मेंटॉररिंगसाठी नियुक्त करण्यात आले होते, तेव्हा थोडा गोंधळ उडाला होता. भारताला एमएस धोनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत का नको असेल? असा प्रश्न त्यावेळी माझ्या मनात निर्माण झाला होता. मला वाटते भारतीय टी -20 संघाचा हा सर्वात मोठा निर्णय आहे.”

तर संघाची कामगिरी सुधारेल

“भारतीय संघाला चतुर धोनीची गरज आहे आणि त्याच्या आसपास असण्याने संघाची कामगिरी सुधारेल, तो त्याच्या रणनीतीमध्ये ९० टक्क्यांपर्यंत यशस्वी आहे. अर्थातच धोनीच्या उपस्थितीमुळे संघाला फायदा होणार आहे.” असा विश्वास देखील मायकेल वॉनने व्यक्त केला आहे. 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael vaughan on ms dhoni as india mentor for t20 world cup srk
First published on: 27-09-2021 at 13:07 IST