Michael Vaughan On Indian Cricket Team: इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन पुन्हा एकदा चर्चेत असलेल्या भारतीय संघाबद्दल बोलला आहे. वास्तविक, वॉनने २०२३च्या विश्वचषकाबाबत काही प्रतिक्रिया दिल्या आहेत. खलीज टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत इंग्लंडच्या माजी कर्णधाराने म्हटले आहे की, “यावेळी भारताला घरच्या मैदानावर विश्वचषक जिंकायचा असेल तर आक्रमकता दाखवावी लागेल. भारतीय संघ नक्कीच विश्वचषक जिंकण्याचा दावेदार आहे, मात्र टीम इंडियाच्या फलंदाजांना आक्रमकता दाखवावी लागेल, तरच त्यांना यावेळी विश्वचषक जिंकता येईल, असे वॉनने म्हटले आहे.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वॉनने म्हटले आहे की, “तुम्हाला नक्कीच विश्वास असेल की भारत फेव्हरिट आहे, तसे व्हायला हवे, कारण यावेळी वर्ल्ड कप भारतात होत आहे. पण त्यांना फलंदाजीत अधिक आक्रमक व्हावे लागेल, भारतीय संघ गोलंदाजीत आक्रमकता दाखवत आहे पण फलंदाजीत तसे होताना दिसत नाही. हा एक मोठा प्रश्न आहे. अलीकडेच ते त्यांच्या दृष्टिकोनात थोडे अधिक आक्रमक झाले आहेत. हा आक्रमक दृष्टीकोन पुढे सुरु ठेवणे आवश्यक असून धरसोड वृत्ती कमी करावी लागेल.” नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला होता. या अनुषंगाने त्याने हे भाष्य केले आहे.

हेही वाचा: Shoaib Akhtar: “तीनपैकी ‘हा’ फॉरमॅट सोडून दे!” विराट कोहलीला शोएब अख्तरचा अजब सल्ला

यासोबतच इंग्लंडचा माजी कर्णधार पुढे म्हणाला आहे की, “भारतात खूप चांगला टॅलेंट आहे, त्यांच्याकडे चांगले खेळाडू आहेत पण अनेक वर्षांपासून टीम इंडिया व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये चॅम्पियन बनू शकलेली नाही. माझ्या मते या विश्वचषकात ते घरच्या मैदानावर त्यांच्या लोकांसमोर दबावात योग्य शैलीत खेळू शकतात की नाही यावर बरेच काही अवलंबून असेल. मागील वेळेस त्यांच्याकडे धोनी होता तो खूप कूल कॅप्टन म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे भारत विश्वचषक जिंकू शकला.”

हेही वाचा: IPL vs PSL: ‘केवढा तो कॉन्फिडन्स!’ पीसीबी प्रमुख नजम सेठींच्या मते पीएसएल आयपीएलपेक्षा डिजिटल रेटिंगच्या तुलनेत अव्वल, जाणून घ्या

मायकेल वॉनने इंग्लंडला विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार सांगितले

माजी इंग्लिश कर्णधाराने आपली निवड भारताला नाही तर इंग्लंडला दिली आहे जो विश्वचषक जिंकू शकतो. इंग्लंड हा विजयाचा दावेदार असल्याचे वॉनने सांगितले. वॉन म्हणाला, “इंग्लंडकडे फिरकीचे चांगले पर्याय आहेत, त्यांच्याकडे उत्तम गुणवत्तेचे खेळाडू आहेत जे फिरकीही चांगले खेळतात. इंग्लंडकडे वेगवान गोलंदाज आहेत जे विरोधी फलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडू शकतात. जोफ्रा आर्चर दुखापतीतून सावरत असून लवकरच तो संघात पुनरागमन करेन. जोफ्रा आर्चर आणि मार्क वुड ९० मैल प्रतितास वेगाने गोलंदाजी करत आहे, त्यामुळे मला वाटते की इंग्लंड हा विश्वचषक विजयाचा प्रबळ दावेदार आहे पण भारत त्यांच्यासाठी धोकादायक असेल हे त्यांनी लक्षात ठेवावे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Michael vaughan says not india but england team is strongest contender to win world cup avw
First published on: 21-03-2023 at 16:44 IST