यूएई येथे सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेमध्ये भारताने पाकिस्तानविरोधातील सामन्यात शानदार विजय प्राप्त केला. भारताने पाकिस्तानला पाच गडी राखून पराभूत केलं. दरम्यान, या सामन्यात हार्दिक पंड्याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांत शानदार कामगिरी केली. त्याच्या या खेळाचे जगभरातून कौतूक होताना दिसत आहे. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षकपद भूषवलेल्या मिकी आर्थर यांनीदेखील पंड्याची तोंडभरून वाहवा केली आहे. हार्दिक पंड्या मैदानात असणे म्हणजे ११ नव्हे तर १२ खेळाडू संघात असल्यासारखे आहे, असे गौरवोद्गार कार्थर यांनी काढले आहेत.

हेही वाचा >> आईचे निधन झाले तरी तो खेळत राहिला, भारतीय फलंदाजांना अडचणीत आणणाऱ्या पाकिस्तानी नसीमने केलेला आहे मोठा संघर्ष

मिकी आर्थर ESPNCricinfo या क्रीडाविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळाशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी पंड्याच्या खेळाचे कौतूक केले. “संघात हार्दिक पंड्या असणे म्हणजे भारत संघ १२ खेळाडूंसह खेळत असल्यासारखे आहे. माझ्या काळात जॅक कॅलिस असाच होता. हार्दिक पंड्या असा खेळाडू आहे, ज्याचा समावेश आघाडीच्या चार वेगवान गोलंदाजांमध्ये तसेच पहिल्या पाच फलंदाजांनमध्ये करता येईल,” असे मिकी अर्थर म्हणाले.

हेही वाचा >> विश्लेषण : ‘स्लो ओव्हर रेट’ म्हणजे नेमकं काय? ज्याचा फटका भारत-पाकिस्तान या दोन्ही संघांना बसला

“हार्दिक पंड्या दिवसेंदिवस परिपक्व होताना मी पाहात आलो आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याने संघाचे चांगल्या प्रकारे नेतृत्व केले. त्यावेळी त्याने संघाला चांगल्या प्रकारे सांभाळले होते. तसेच दबाव असतानादेखील त्याने उत्तम खेळ दावखवला होता,” असेदेखील आर्थर म्हणाले. आगामी टी-२० विश्वचषकासाठी तो भारताचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो, असे भाकितही आर्थर यांनी वर्तवले.