मिनादला तंदुरुस्ती शिबिरातून वगळल्याबद्दल आश्चर्य!

२०१९-२०च्या हंगामात त्याने २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धामध्ये एकूण ४९ बळी प्राप्त केले.

मिनाद मांजरेकर

मुंबई : स्थानिक हंगामात गेल्या दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करूनही मिनाद मांजरेकरला मुंबईच्या तंदुरुस्ती शिबिरातून वगळण्यात आल्यामुळे क्रिकेट वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उजव्या हाताने वेगवान गोलंदाजी करणाऱ्या २४ वर्षीय मिनादने गेल्या दोन वर्षांत ८३ बळी मिळवले. यामध्ये सौराष्ट्राविरुद्धच्या एकमेव रणजी सामन्यातील सहा बळींचा समावेश आहे. २०१९-२०च्या हंगामात त्याने २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धामध्ये एकूण ४९ बळी प्राप्त केले. मात्र तरीही त्याला शिबिरात स्थान लाभले नाही.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Minad manjrekar surprisingly excluding from fitness camp zws

ताज्या बातम्या