पंजाबमधल्या मिनरव्हा अकादमी क्लब संघाने स्वीडनमध्ये झालेल्या युवा फुटबॉल स्पर्धेत दमदार कामगिरी केली. गोथिआ कप स्पर्धेत मिनरव्हा अकादमी संघाने घवघवीत यश मिळवलं.
या संघात बहुतांश खेळाडू मणिपूरचे आहेत. फुटबॉलच्या बाबतीत ईशान्येकडील राज्यं अतिशय उत्साही आहेत. याचा प्रत्यय या संघाच्या कामगिरीत दिसून आला. या संघाने इंग्लंडचा १२-० असा धुव्वा उडवला. याच संघाने फ्रान्सवर १७-१ असा एकतर्फी विजय मिळवला. या संघाने आठवडाभरापूर्वी युरोपातल्या हेलसिंग चषकाच्या जेतेपदावर कब्जा केला. फायनलमध्ये मिनरव्हा संघाने ब्राझीलवर २-१ असा विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं.
या संघाने सलग आठ सामने जिंकले आणि स्पर्धेत तब्बल ८६ गोलची नोंद केली. हेलसिंग कप आणि गोथिओ कप अशा दोन्ही स्पर्धा लागोपाठ जिंकण्याचा विक्रमही मिनरव्हा संघाने केला.
