Mirabai Chanu : ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूलाही कांस्यपदकाने हुलकावणी दिली आहे. अवघ्या एक किलोच्या फरकानं मीराबाई चानूला हार पत्करावी लागल्यामुळे भारताच्या पदकाच्या आशा संपुष्टात आल्या. त्यामुळे भारताच्या पदकस्वप्नपूर्तीच्या वाटेत वजनांचा खेळ अजूनही चालूच असल्याचं दिसत आहे. पदकाने हुलकावणी दिल्याबद्दल मीराबाई चानूने नशिबाला दोष दिला आहे. प्रत्येक खेळाडू अशा परिस्थितीतून जातच असतो असंही ती म्हणाली. तसंच, यावेळी प्रतिक्रिया देताना तिने मासिक पाळीचाही उल्लेख केला आहे. "मी आजच्या खेळाने आनंदी आहे. खेळाडूबरोबर काही ना काही होत असतं. जखमांसहित अनेक गोष्टी मी सहन करत होते. रिओच्या पहिल्या ऑलिम्पिकमध्येही माझं मेडल गेलं होतं. असंच प्रत्येक खेळाडूबरोबर नशीब कधी चांगलं-वाईट असतं. रिओमध्ये अपयशी ठरले होते. पण त्यानंतर मी वर्ल्ड चॅम्पिअन ठरले. टोकिओ ऑलिम्पिकमध्ये मी पहिल्यांदा सिल्वर मेडल जिंकले होते", असं मीराबाई चानू म्हणाल्या. हेही वाचा >> Mirabai Chanu in Paris Olympic: एक किलोच्या फरकानं मीराबाई चानूनं पदक गमावलं; आणखी एक स्वप्न भंगलं! "यावेळीही मी माझे १०० टक्के देऊन मेडल जिंकण्याचा प्रयत्न केला. एशिअन गेम्समध्ये मी जखमी झाले होते. ही जखम भरून काढायला काही वेळ जावा लागला. पण यावेळी मी पूर्णपणे तयारी केली होती. परंतु, यावेळीही नशिबाने साथ दिली नाही. आज मासिक पाळीचा माझा तिसरा दिवस आहे. मागच्या ऑलिम्पिकमध्येही माझा दुसरा दिवस होता. यामुळेही शरीरात थोडाफार बदल होतो. पण मी पूर्णपणे प्रयत्न केला होता", असं मीराबाई चानू म्हणाली. #WATCH | Indian Weightlifter #MirabaiChanu speaks on finishing 4th in women's 49 kg weightlifting event at #ParisOlympics2024 She says, "I tried my best to win a medal for the country but I missed it today.It is a part of the game, we all sometimes win and sometimes… pic.twitter.com/bpgHg9Iy9j— DD India (@DDIndialive) August 8, 2024 अन् तिला कांस्यपदकावर पाणी सोडावं लागलं मीराबाई चानूकडून वेटलिफ्टिंग प्रकारात पदकाच्या मोठ्या आशा तमाम भारतवासीयांना होत्या. मीराबाईदेखील त्याच हिकमतीनं पोडियमवर उतरली होती. जगभरातल्या अव्वल वेटलिफ्टर्सशी स्पर्धा करताना मीराबाईच्या खांद्यांवर तमाम भारतीयांच्या आशांचाही भार होताच. पण त्यातूनही तिनं दमदार कामगिरी केली. पहिल्या स्नॅचमध्ये काहीशा मागे पडलेल्या मीराबाईनं पुढच्या दोन स्नॅचमध्ये कमबॅक केलं. क्लीन अँड जर्कमध्येही मीराबाईची कामगिरी सातत्यपूर्ण राहिली. पण पहिल्या स्नॅचमधल्या पिछाडीचा मीराबाई चानूला फटका बसला आणि शेवटी अवघ्या एका किलोच्या फरकानं तिला कांस्यपदकावर पाणी सोडावं लागलं.