विजयी अभियानासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब उत्सुक

आयपीएलच्या मागील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ तळाच्या स्थानावर होता.

मिचेल जॉन्सन

आयपीएलच्या मागील हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ तळाच्या स्थानावर होता. मात्र नवख्या गुजरात लायन्सला हरवून नवव्या हंगामाचा विजयी आरंभ करण्यास पंजाबचा संघ उत्सुक आहे.
पंजाबच्या संघाने यंदाच्या हंगामासाठी कोणत्याही मोठय़ा खेळाडूला खरेदी केलेले नाही. फक्त ऑस्ट्रेलियाच्या जॉर्ज बेलीच्या जागी नेतृत्वाची धुरा दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरकडे सोपवण्यात आली आहे. निवृत्त वीरेंद्र सेहवाग संघाच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री प्रीती झिंटाच्या मालकीच्या पंजाब संघाची वाटचाल मिलर, ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, मुरली विजय आणि मिचेल जॉन्सन यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल. त्याव्यतिरिक्त अष्टपैलू फरहान बेहरादिन, मार्क्स स्टॉयनिस, वेगवान गोलंदाज मोहित शर्मा आणि डावखुरा फिरकी गोलंदाज स्वप्निल सिंग यांच्याशिवाय फारसे लक्षवेधी खेळाडू नाहीत. मागील हंगामात पंजाबच्या फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव आढळला होता आणि जेव्हा फलंदाजांनी चांगली कामगिरी केली, तेव्हा गोलंदाजांची कामगिरी खराब झाली.
सोमवारी आयपीएलमधील आपला पहिलावहिला सामना खेळणाऱ्या गुजरात लायन्सचा संघ तुलनेने अधिक मजबूत आहे. स्फोटक फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम, कर्णधार सुरेश रैना, आरोन फिन्च, अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो आणि जेम्स फॉकनर यांच्यासारख्या ट्वेन्टी-२० विशेषज्ञ दिग्गजांवर गुजरातची मदार आहे. वेगवान गोलंदाजीच्या विभागात मात्र गुजरातची कमजोरी दिसून येते. दक्षिण आफ्रिकेचा जागतिक कीर्तीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन वेगळता त्यांच्याकडे वेगवान गोलंदाजांची वाणवा आहे. त्यांच्याकडे काही मध्यमगती गोलंदाज जरूर आहेत.

संघ
किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरीत सिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टॉयनिस, स्वप्निल सिंग, अरमान जाफर, फरहान बेहरादिन, के. सी. करिअप्पा, रिशी धवन, गुरकिराट सिंग मान, निखिल नाईक, शार्दूल ठाकूर.
गुजरात लायन्स : सुरेश रैना (कर्णधार), ड्वेन ब्राव्हो, जेम्स फॉकनर, आरोन फिन्च, ब्रेंडन मॅक्क्युलम, ड्वेन स्मिथ, डेल स्टेन, प्रवीण तांबे, इशान किशन, रवींद्र जडेजा, शदाब, जाकाती, दिनेश कार्तिक, शिविल कौशिक, धवल कुलकर्णी, प्रवीण कुमार, प्रदीप सांगवान, जयदेव शाह, उमंग शर्मा, अ‍ॅन्ड्रय़ू टाय, सरबजित लड्डा, अक्षदीप नाथ, अमित मिश्रा, पारस डोग्रा, एकलव्य द्विवेदी.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mitchell johnson ipl