scorecardresearch

IND vs AUS 1st ODI: मिचेल स्टार्कने विराटला बाद करत केला मोठा कारनामा; ऑस्ट्रेलियासाठी ‘ही’ कामगिरी करणारा चौथा गोलंदाज ठरला

India vs Australia 1st ODI Updates: मिचेल स्टार्क ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची विकेट घेत त्याने ही कामगिरी केली.

IND vs AUS 1st ODI Match Updates
मिचेल स्टार्क आणि विराट कोहली (फोटो-ट्विटर)

India vs Australia 2023 1st ODI Match Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला शुक्रवारी सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. हा सामना भारतीय संघाने ५ गडी राखून जिंकला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि केएल राहुलने महत्वाचे योगदान दिले. दरम्यान वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने एक मोठा कारनामा केला आहे.

या सामन्यात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या धोकादायक गोलंदाजीसमोर भारताची अव्वल फळी पूर्णपणे हतबल दिसले. स्टार्क अचूक लाईन आणि लेन्थने वेगवान गोलंदाजी करताना दिसला. त्यामुळे भारतीय फलंदाजांना त्याच्यासमोर उभे राहणे कठीण झाले. आहे. मिचेल स्टार्कने मोठी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो चौथा गोलंदाज ठरला आहे.

मिशेल जॅन्सनला मागे सोडले –

ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत मिचेल स्टार्क चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीची विकेट घेताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला मागे टाकून त्याने ही कामगिरी केली. त्यानंतर सुर्यकुमार यादव आणि शुबमन गिलला बाद केल. शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज आहे.

त्याने ९९९ विकेट्स घेतल्या, तर ग्लेन मॅकग्रा ९४८ विकेट्ससह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर ब्रेट ली आहे, ज्याने ७१८ विकेट घेतल्या आहेत. मिचेल स्टार्क चौथ्या क्रमांकावर पोहोचला असून त्याने ५९३ विकेट घेतल्या आहेत. या यादीत मिचेल जॉन्सन ५९० विकेट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे.

ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारे गोलंदाज –

१.शेन वॉर्न: ९९९
२.ग्लेन मॅकग्रा: ९४८
३.ब्रेट ली: ७१८
४.मिचेल स्टार्क: ५९३
५.मिचेल जॉन्सन: ५९०

हेही वाचा – Sachin Tendulkar: बीसीसीआयचा पुढचा अध्यक्ष होणार का? यावर मास्टर ब्लास्टर तेंडुलकर म्हणाला, ‘मी…’

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संघ ३५.४ षटकात १८८ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने सर्वाधिक ८१ धावा केल्या. मार्शने ६५ चेंडूत १० चौकार आणि ५ षटकार ठोकले. त्याचबरोबर जोश इंग्लिशने २६ धावांची खेळी केली.१८९ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली होती. भारतीय संघाने ५ षटकाच्या समाप्तीनंतर ३ बाद सोळा धावा केल्या होत्या. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि केएल राहुलने महत्वाचे योगदान दिले. केएल राहुलने (७५ ) आणि रवींद्र जडेजा (४५) धावांवर नाबाद राहिले. भारतीय संघाने ३९.५ षटकात ५ बाद १९१ धावा केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 20:57 IST
ताज्या बातम्या