Mitchell Starc world record in Australia vs Bangladesh Test: ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट गोलंदाज मिचेल स्टार्कने एक नवा विश्वविक्रम आपल्या नावे केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन संघ अवघ्या १९८ धावांत सर्वबाद झाला; तर २९ धावांत संघाने झटपट ४ विकेट्स गमावल्या. ऑस्ट्रेलियाचा संघ सर्वबाद झाल्यानंतर बांगलादेशचा संघ फलंदाजीसाठी उतरला आणि मिचेल स्टार्कने संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिली. या विकेटसह मिचेल स्टार्कने कसोटी इतिहासात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु पहिल्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच संपूर्ण संघ १९८ धावांवर सर्वबाद झाला. स्टीव्ह स्मिथने अर्धशतकी खेळी केली, मात्र त्याला इतर कोणत्याही फलंदाजांची साथ मिळाली नाही; परिणामी, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्यांदाच २०० धावांच्या आत सर्वबाद झाला. कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच सर्वात कमी धावसंख्या उभारली.

सलामीवीर शादमान इस्लाम आणि तन्झिद हसन तमीम यांनी बांगलादेश संघाला स्थिर सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु मिचेल स्टार्कने नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर शादमान इस्लामला बाद केलं. नॅथन लायनने त्याचा झेल घेतला. शादमानने ३० चेंडूंत २० धावा केल्या; त्याच्या या खेळीत दोन चौकारांचा समावेश होता. या बळीसह, मिचेल स्टार्कने कसोटी क्रिकेटमध्ये ४३४ बळींचा टप्पा गाठला.

मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियाला ब्रेकथ्रू मिळवून दिल्यानंतर कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा ‘डावखुरा गोलंदाज’ ठरला. विशेष म्हणजे, त्याने हा टप्पा ‘आंतरराष्ट्रीय डाव्या हाताचे व्यक्ती दिन’ (International Left-Handers Day) या खास दिवशी गाठला आहे. आज १३ ऑगस्ट रोजीला ‘आंतरराष्ट्रीय डाव्या हाताच्या व्यक्तींचा दिवस’ (International Left-Handers Day) साजरा केला जात आहे आणि याच दिवशी मिचेल स्टार्कने हा विक्रम प्रस्थापित केला. शिवाय, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेण्याच्या बाबतीत स्टार्कने आता भारताचे दिग्गज खेळाडू कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे; आणखी केवळ एक बळी घेतल्यानंतर तो त्यांना मागे टाकेल.

कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणारे डावखुरे वेगवान गोलंदाज

मिचेल स्टार्क – ऑस्ट्रेलिया – ४३४ विकेट्स
रंगना हेराथ – श्रीलंका – ४३३ विकेट्स
वसीम अक्रम – पाकिस्तान – ४१४ विकेट्स
डॅनियल व्हेटोरी – न्यूझीलंड – ३६२ विकेट्स
चामिंडा वास – श्रीलंका – ३५५ विकेट्स