मिताली, अश्विनची ‘खेलरत्न’साठी शिफारस

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांची शिफारस केली आहे. याचप्रमाणे अर्जुन पुरस्कारासाठी सलामीवीर फलंदाज शिखर, के. एल. राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांचे नामांकन दाखल केले आहे. परंतु कोणत्याही महिला क्रिकेटपटूची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली नाही.  अश्विन […]

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी महिला संघाची कर्णधार मिताली राज आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन यांची शिफारस केली आहे.

याचप्रमाणे अर्जुन पुरस्कारासाठी सलामीवीर फलंदाज शिखर, के. एल. राहुल आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा यांचे नामांकन दाखल केले आहे. परंतु कोणत्याही महिला क्रिकेटपटूची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेली नाही.  अश्विन आणि मिताली या दोघांनीही अर्जुन पुरस्कार पटकावला आहे. क्रिकेटप्रमाणेच अन्य क्रीडा राष्ट्रीय क्रीडा संघटनांनीही आपल्या क्रीडापटूंची नामांकने सादर केली आहेत.

अन्य क्रीडा प्रकारांमधील शिफारशी

’  टेबल टेनिस

खेलरत्न : शरथ कमाल

अर्जुन : सुतिर्था मुखर्जी, अयहिका मुखर्जी, मान ठक्कर

द्रोणाचार्य : सौम्यदीप रॉय

’  नेमबाजी   

खेलरत्न : अंकुर मित्तल, अंजुम मुदगिल

अर्जुन : ईलाव्हेनिल व्हालारिव्हान, अभिषेक वर्मा

  कुस्ती

अर्जुन : रवी दहिया, दीपक पुनिया, अंशू मलिक, सरिता मोर

द्रोणाचार्य : कुलदीप मलिक, विक्रम, सुजीत मान

’  फुटबॉल :

खेलरत्न : सुनील छेत्री

अर्जुन : बाला देवी

’  तिरंदाजी

खेलरत्न : ज्योती सुरेखा व्हेन्नमा

अर्जुन : मुस्कान किरार

द्रोणाचार्य : लिंबा राम, लोकेश चंद पाल

’  अ‍ॅथलेटिक्स :

खेलरत्न : नीरज चोप्रा, द्युती चंद  गोल्फ

खेलरत्न : शुभंकर शर्मा

अर्जुन : उदयन माने, रशीद खान, दिक्षा डागर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mithali ashwin recommendation for khel ratna akp

ताज्या बातम्या