scorecardresearch

Premium

Shabaash Mithu Teaser: टाळ्यांचा कडकडाट, रेकॉर्ड्स अन् तापसीची जोरदार एंट्री; मिताली राजच्या बायोपिकचा टीझर पाहिलात का?

टीझरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजच्या लूकमध्ये बॅट पकडून दिसत आहे.

(Photo - व्हिडीओतून स्क्रीन ग्रॅब)
(Photo – व्हिडीओतून स्क्रीन ग्रॅब)

भारतीय महिला क्रिकेट संघाची दिग्गज खेळाडू मिताली राज हिचा बायोपिक ‘शाबाश मिठू’चा (Shabaash Mithu) टीझर सोमवारी रिलीज झाला आहे. या टीझरमध्ये अभिनेत्री तापसी पन्नू मिताली राजच्या लूकमध्ये बॅट पकडून दिसत आहे. तापसी पन्नूला मितालीच्या लूकमध्ये छान दिसत असून तिने स्वतः तिचा टीझर तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.

हाच व्हिडिओ मिताली राजने स्वतः ट्विटरवर त्याच कॅप्शनसह शेअर केला आहे. या टीझर व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “जेंटलमनच्या गेममध्ये तिने इतिहास रचला आणि स्वतःची वेगळी कहाणी बनवली.” दरम्यान, या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या टीझर व्हिडीओमध्ये कॉमेंट्री करताना मिताली राजचे रेकॉर्ड स्क्रीनवर दाखवले जातात.

bigg-boss-mamta-kulkarni
ड्रग्स प्रकरण, टॉपलेस फोटोशूट, वादग्रस्त वक्तव्य अन्…९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीची Bigg Boss 17 मध्ये एंट्री?
rasika
रसिका सुनील करणार ‘सूर नवा ध्यास नवा’च्या आगामी पर्वाचं सूत्रसंचालन, अनुभव शेअर करत म्हणाली, “पडद्यामागे सगळ्यांची…”
Delhi Metro viral video
चक्क धावत्या मेट्रोमध्ये आजोबांनी बिडी पेटवली अन्…, VIRAL व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया…
big boss fame actress ruchira jadhav reply to trolls
“बाकीच्या मंडळांचे देव पण पावतात”, लालबागच्या राजाच्या दर्शनावरून ट्रोल करणाऱ्याला अभिनेत्रीने दिलं उत्तर, म्हणाली…

टीझरची सुरुवात खेळाच्या मैदानावरील प्रेक्षकांच्या टाळ्यांसह. संपूर्ण टीझरमध्ये इंग्रजी आणि हिंदी कॉमेंट्री सुरू आहे आणि मिताली राज ड्रेसिंग रूममधून तयार होऊन, हातात बॅट घेऊन मैदानात एंट्री घेताना दिसत आहे. या टीझरच्या शेवटी तापसी पन्नू मिताली राजच्या भूमिकेत दिसत आहे. तिच्या हातात बॅट आहे आणि भारतीय जर्सीमध्ये हेल्मेट घालून ती स्ट्राइक घेताना दिसत आहे.

श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित ‘शाबाश मिठू’ हा चित्रपट भारतीय महिला क्रिकेटपटू आणि एकदिवसीय कर्णधार मिताली राजच्या आयुष्यावर बनवण्यात आला आहे. मिताली राजने चार वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. चालू विश्वचषक स्पर्धेत ती सहाव्यांदा भारतीय संघाकडून खेळण्यासाठी आली आहे. २००० च्या विश्वचषकात ती पहिल्यांदा भारतीय संघात सामील झाली होती.

मितालीच्या नावावर विश्वचषकात सर्वाधिक सामन्यांचे नेतृत्व करण्याचा विक्रम आहे. तसेच ती १०,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारी एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. तिला लेडी तेंडुलकर म्हणूनही ओळखले जाते. अलीकडेच तिला भारत सरकारचा खेलरत्न पुरस्कारही देण्यात आला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mithali raj biopic shabaash mithu teaser released taapsee pannu in lead role hrc

First published on: 21-03-2022 at 14:40 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×