पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला मोदींचा खास संदेश, म्हणाले…

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आलं

Modi special message to the women hockey team frustrated by the defeat said
ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत केलं

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये शुक्रवारी भारतीय महिला हॉकी संघाला पुरुषांप्रमाणेच ऐतिहासिक कामगिरी करण्यात अपयश आलं. रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पराभवामुळे निराश झालेल्या महिला हॉकी संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी ट्वीट केलं आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि म्हटले आहे की, “मुलींच्या कामगिरीने नव्या भारताची भावना प्रदर्शित केली आहे.  या महान कामगिरीची आम्हाला नेहमी आठवण राहील.”

पीएम मोदींनी ट्वीट केले, “टोक्यो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघाची उत्कृष्ट कामगिरी आम्हाला नेहमीच लक्षात राहील. त्यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. संघातील प्रत्येक सदस्याला उल्लेखनीय धैर्य, कौशल्य आणि लवचिकता लाभली आहे. भारतलाया या शानदार संघावर गर्व आहे.”

Olympics: …अन् त्या मैदानातच रडू लागल्या; या फोटोंचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाहीत

नरेंद्र मोदी यांनी आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये म्हटले की, ” जरी आपण महिला हॉकीमध्ये खूप कमी फरकाने पदक गमावले. परंतु हा संघ नवीन भारताची भावना प्रतिबिंबित करतो. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांचे टोक्यो २०२० मधील यश भारताच्या तरुण मुलींना हॉकीकडे वळण्यास आणि त्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित करेल. या संघाचा अभिमान आहे.”

चुरशीच्या लढतीत भारत ब्रिटनकडून ३-४ ने पराभूत

रिओ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या ब्रिटनच्या संघाने भारतीय महिला संघाला ४-३ ने पराभूत करत कांस्यपदकावर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्या १५ मिनिटांमध्ये गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये तब्बल पाच गोल झाले. ब्रिटनने १-० ची आघाडी बऱ्याच काळ टीकवली होती. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटांमध्ये सामन्यात चार गोल्स झाले. यापैकी ब्रिटनने एक गोल केला. तर भारताने अवघ्या नऊ मिनिटांमध्ये तीन गोल करत हाफ टाइममध्ये ३-२ ची आघाडी मिळवली. ब्रिटनने तिसऱ्या क्वार्टर्समध्ये ३-३ ची बरोबर केल्याने अंतीम १५ मिनिटं महत्वाची ठरली. शेवटच्या १५ मिनिटांनंतर सामन्याचे अंतिम स्कोअरकार्ड ४-३ असं होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Modi special message to the women hockey team frustrated by the defeat said srk

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या