* भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी
मोहाली येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध ऑस्ट्रलिया चौथ्या कसोटी सामन्यात शिखर धवन आणि मुरली विजय या भारताच्या दोन युवा फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली. शिखर धवनने पदार्पणातचं ८५ चेंडूत शतक ठोकले. पण आपले व्दिशतक पूर्ण करण्यात शिखरला अपयश आले. त्यानंतर आलेल्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही आणि भारताचा डाव ४९९ धावांवर सुंपूष्टात आला व भारताने ऑस्ट्रेलियावर ९१ धावांची आघाडी घेतली. कांगारूंची फलंदाजीची वेळ आली असता भुवनेश्वर कुमारने आपल्या स्विंग गोलंदाजीची जादू दाखवत ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूत धाडले. चौथ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३ बाद ७५ धावा अशी होती.