पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली होती. यासोबतच त्याने मीडियाच्या अनेक प्रश्नांची उत्तरेही दिली होती. एका प्रश्नाच्या उत्तरात त्याने पाकिस्तानसाठी फिक्सिंगमध्ये सहभागी असलेल्या खेळाडूंबाबतही मोठा खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोहम्मद हाफिजने ३ जानेवारी २०२२ रोजी आपल्या १८ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. तो टी-२० वर्ल्डकप २०२१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनल खेळला होता. पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना हाफिज म्हणाला, ”ज्या क्षणी मी फिक्सर्सच्या विरोधात आवाज उठवला, त्या क्षणी मला सर्वात जास्त त्रास झाला.”

हाफिज म्हणाला, ”जेव्हा मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या तत्कालीन अध्यक्षांना सांगितले, ”देशाचे नाव खराब करणाऱ्या अशा खेळाडूंना संघात स्थान देऊ नये. त्यावेळी मला उत्तर मिळाले की, तुम्हाला खेळायचे असेल, तर खेळा, ते लोक खेळतील.” हाफिजने कोणाचेही नाव घेतले नसले तरी या घटनेचे वर्णन त्याने त्याच्या कारकिर्दीतील सर्वात दुःखद घटना असल्याचे सांगितले.

हेही वाचा – रोनाल्डोच्या मँचेस्टर युनायटेड संघात भूकंप होण्याची शक्यता; ‘या’ कारणामुळे १७ खेळाडू सोडणार संघ?

तो पुढे म्हणाला, ”हे असे काहीतरी होते ज्यामुळे मला नेहमीच त्रास व्हायचा. माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी त्यावेळी सर्वात जास्त त्रास सहन केला. म्हणूनच मी नेहमी म्हणत राहिलो, की जर कोणी आपल्या देशाचा अभिमान दुखावला असेल, तर त्याला हा अभिमान पुन्हा मिळू नये.”

हाफिजची कारकीर्द

हाफिजने २०१८ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. हाफिजची कारकीर्द जवळपास दोन दशकांची राहिली आहे. त्याने पाकिस्तानसाठी ३९२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले ज्यात त्याने १२,७८९ धावा केल्या आणि २५३ बळी घेतले. हाफिजने ५५ कसोटी, २१८ एकदिवसीय आणि ११९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने तीन एकदिवसीय विश्वचषक आणि सहा टी-२० विश्वचषकांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व देखील केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad hafeez who recently announced retirement from international cricket has exposed the corruption in pcb adn
First published on: 07-01-2022 at 17:59 IST