scorecardresearch

Video : मोहम्मद कैफला क्रिकेटच्या इतिहासातील बेस्ट फिल्डर का म्हणतात? ४२ वर्षांच्या कैफने हवेत उडी मारून घेतला झेल

फलंदाजाने उंच मारलेला चेंडू पकडण्यासाठी कैफ धावत गेला अन् उडी मारून अखेर झेल पकडलाच, Video पाहून थक्क व्हाल.

Mohammad Kaif outstanding Fielding in LLC
मोहम्मद कैफने अप्रतिम झेल घेतलेला व्हिडीओ व्हायरल. (Image-LLC Twitter)

Mohammad Kaif Jaw Dropping Catch Video Viral : भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात बेस्ट फिल्डर म्हणून मौहम्मद कैफने मैदानावर ठसा उमटवला आहे. आता रविंद्र जडेजा मैदानावर जशी कमाल करत आहे, तशाच प्रकारचं अप्रतिम क्षेत्ररक्षण कैफने २० वर्षांपूर्वी केलं. कैफने भारतीय क्रिकेटच्या क्षेत्ररक्षणाचा दर्जा बदलला आहे. आजही कैफ मैदानात उतरल्यावर जबरदस्त फिल्डिंग करताना दिसत आहे. कारण लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील कैफच्या उत्कृष्ट फिल्डिंगचा व्हिडीओ समोर आला आहे. ४२ वर्षांचा मोहम्मद कैफ लीजेंड्स लीग खेळत आहे. या क्रिकेट स्पर्धेतही कैफने फिल्डिंगचा जलवा दाखवला आहे.

धावत गेला अन् मैदानात उडी मारून घेतला झेल

मोहम्मद कैफ इंडिया महाराजा या संघासाठी लीजेंड्स लीगमध्ये खेळत आहे. गौतम गंभीर या संघाचं नेतृत्व करत आहे. शनिवारी इंडिया महाराजा आणि वर्ड्ल जायंट्समध्ये लढत झाली. १६ व्या षटकात केविन ओ ब्रायनने मोठा फटका मारला. चेंडू डीप मिड विकेटवर गेला. पण त्या जागेवर मोहम्मद कैफ फिल्डिंग करत होता. कैफला हवेत उडालेला चेंडू दिसता त्याने धाव घेतली आणि उडी मारून झेल घेतला. हा झेल घेतल्यानंतर कैफला हसू आवरलं नाही. कैफने घेतलेला झेल पाहून स्टेडियममध्ये असलेल्या प्रेक्षकांसह खेळाडूंच्याही भुवया उंचावल्या. हरभजन सिंग आणि गौतम गंभीरनेही कैफला गळाभेट दिली.

नक्की वाचा – आरारारारा..खतरनाक! २८ चेंडू…१० चौकार अन् ५ षटकार, WPL मध्ये शफाली वर्माने ठोकल्या ७६ धावा, पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

इंडिया महाराजा संघाचा झाला निसटता पराभव

वर्ल्ड जायंट्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ८ विकेट्स गमावून १६६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार अॅरोन फिंचने ५३ आणि शेन वॉटसनने ५५ धावांची खेळी केली. हरभजन सिंगने ४ विकेट घेतल्या. इंडिया महाराजा संघाने १६७ धावांचा पाठलाग करताना शर्थीचे प्रयत्न केले. पण महाराजा टीमचा निसटता पराभव झाला. या संघाने ५ विकेट्स गमावून १६४ धावा केल्या. कर्णधार गौतम गंभीरने ६८ धावांची खेळी केली. पण शेवटी वर्ल्ड जायंट्सने सामना खिशात घातला. महाराजा संघाचा या टुर्नामेंटमध्ये दुसरा पराभव आहे. पहिल्या सामन्यात महाराजा संघाला एशिया लायंसने पराभूत केलं होतं.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-03-2023 at 13:56 IST