Mohammad Shami broke Trent Boult’s record: अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या घातक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघ फलंदाजांची दाणादाण उडाली. त्यामुळे फलंदाजांना मदत करणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाचा डाव २७६ धावांवर गडगडला. अनेक ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी चांगली सुरुवात केली, पण मोठी खेळी खेळण्यात कोणालाही यश आले नाही. ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याचबरोबर मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेत ट्रेंट बोल्टचा विक्रम मोडला.

मोहम्मद शमीने बोल्टला टाकले मागे –

मोहम्मद शमीने मोहाली वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० षटकांत ५१ धावा देऊन ५ विकेट्स घेतल्या. त्याने या दरम्यान एक मेडन षटकही टाकले. त्याने या सामन्यात मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट आणि शॉन अॅबॉट यांना बाद केले. मोहालीमध्ये भारतीय गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच बळी घेण्याचा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ होती.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

९३ एकदिवसीय सामन्यांनंतर सर्वाधिक विकेट्स घेण्याबाबत बोलायचे झाले, तर शमी या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ट्रेंट बोल्टला मागे टाकले, ज्याने त्याच्या पहिल्या ९३ एकदिवसीय सामन्यांमध्ये १६९ बळी घेतले होते. आता शमीने ९३ एकदिवसीय सामन्यात १७० विकेट्स घेत बोल्टला मागे टाकले असून तो दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये ९३ सामन्यांनंतर, मिचेल स्टार्क सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये पहिल्या स्थानावर आहे, ज्याने १८० बळी घेतले होते.

हेही वाचा – World Cup 2023: ICC ने वर्ल्ड कपसाठी बक्षीस रक्कम केली जाहीर, जाणून घ्या विजेत्या संघाला किती मिळणार रक्कम?

९३ एकदिवसीय सामन्यांनंतर वेगवान गोलंदाजांनी घेतलेल्या सर्वाधिक एकदिवसीय विकेट्स –

१८० – मिचेल स्टार्क
१७० – मोहम्मद शमी<br>१६९ – ट्रेंट बोल्ट
१६४ – ब्रेट ली
१५६ – मॉर्ने मॉर्केल
१५५ – अॅलन डोनाल्ड
१५२ – वकार युनूस
१५१- शोएब अख्तर

हेही वाचा – भारतात प्रथमच MotoGP शर्यतीचे आयोजन! सुरेश रैनाने सोशल मीडियावर शेअर केला VIDEO

या सामन्यात मोहम्मद शमीने भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या, तर जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यास आमंत्रित केले होते. त्यानुसार ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सर्वबाद २७६ धावा केल्या. कांगारू संघाकडून सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली तर स्टीव्ह स्मिथने ४१ धावा आणि जोश इंग्लिशने ४५ धावा केल्या.

Story img Loader