ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३२ धावांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. या विजयानंतर टीम इंडियाने चार सामन्यांच्या बॉर्डर गावसकर मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या विजयात बऱ्याच भारतीय खेळाडूंनी महत्वाची भूमिका बजावली, ज्यामध्ये मोहम्मद शम्मी एक होता. ज्याने फक्त चेंडूनेच नव्हे तर बॅटनेही योगदान दिले. त्याचबरोबर त्याने विराट कोहलीसारख्या खेळाडूंना मागे सोडले आहे.

पहिल्या डावाच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने जडेजाच्या रूपाने पहिली विकेट गमावली. यानंतर फलंदाजीला आलेल्या मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची जोरदार धुलाई केली. ज्यामध्ये मोहम्मद शमीने बाद होण्यापूर्वी ४७ चेंडूत ३७ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान, त्याने कसोटीत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

Dinesh Karthik Hits 108 m Longest Six of IPL 2024
VIDEO: शेवटच्या हंगामात दिनेश कार्तिकची धूम; पल्लेदार षटकार आणि झुंजार इनिंग्ज
Mumbai Indians vs Chennai Super Kings match update in marathi
MI vs CSK : विराट-रोहितला जे जमलं नाही, ते ४२ वर्षीय धोनीने करुन दाखवलं, ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
Who is Angkrish Raghuvanshi
IPL 2024 : कोण आहे अंगक्रिश रघुवंशी? ज्याने सुनील नरेनच्या साथीने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची केली धुलाई
list of fastest bowlers in IPL 2024 and whole History
उमरान मलिकचा विक्रम मोडणार मयंक यादव? IPL मधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम कोणाच्या नावावर? पाहा यादी

मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात धडाकेबाज ३७ धावा केल्या, ज्या ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात नऊ खेळाडूंनी केलेल्या धावांपेक्षा अधिक धावा होत्या. या खेळीदरम्यान शमीने दोन गगनभेदी षटकार ठोकले. त्यामुळे कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत त्याने विराट कोहली, युवराज सिंग, राहुल द्रविड आणि पुजारा यांना मागे टाकले आहे. विराट कोहलीने २४, युवराज सिंग २२, राहुल द्रविड २१ आणि पुजाराने १५ षटकार लगावले आहेत. शमीने ६१ सामन्यात २५ षटकार मारले आहेत.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: भल्या-भल्यांना घाम फोडणाऱ्या मर्फीला शमीने गुडघे टेकून लगावला गंगनचुंबी षटकार, टॉडही झाला अवाक पाहा

तो भारताचा १६वा खेळाडू ठरला –

भारतासाठी कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर आहे, ज्याने १०३ सामन्यात ९० षटकार ठोकले आहेत. या यादीत एमएस धोनी दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत ७८ षटकार ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे, ज्याच्या नावावर ६९ षटकार आहेत. या यादीत भारताचा कर्णधार रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ४६ सामन्यात ६६ षटकार मारले आहेत. त्याचबरोबर मोहम्मद शमी या यादीत १६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हेही वाचा – IND vs AUS 1st Test: ‘…अखेर हा काय तमाशा चालला आहे?’, स्टीव्ह स्मिथच्या थम्प्सअप रिअ‍ॅक्शन संतापले अ‍ॅलन बॉर्डर

भल्या-भल्यांना घाम फोडणाऱ्या मफीला दाखवले तारे-

खरं तर, मोहम्मद शमीने १३१ व्या षटकातील दोम चेंडूवर षटकार लगावले. मर्फीने त्याला गुड लेन्थ चेंडू टाकला होता. ज्यावर शमीने एक तर गुडघे टेकून शानदार गगनचुंबी षटकार लगावला. जो सर्वजण पाहत राहिले. इतकेच नाही, तर गोलंदाज टॉड मर्फीही अवाक झाला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईपर्यंत पाहत राहिला.