Mohammad Siraj Won Best Fielder Award : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका गुरुवारी पार पडली. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने शेवटच्या सामन्यात चांगली कामगिरी करत मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. या मालिकेदरम्यान सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंची कामगिरी वाखाणण्याजोगी होती. सामन्यादरम्यान यशस्वी जैस्वाल आणि रिंकू सिंग या खेळाडूंनी फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

विश्वचषकादरम्यान सुरू झालेली सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला पदक देण्याची प्रथा अजून सुरुच आहे. यावेळी एकूण तीन खेळाडू शर्यतीत सहभागी झाले होते, मात्र मोहम्मद सिराजला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे पदक पटकावण्यात यश आले. सिराजशिवाय यशस्वी आणि रिंकू सिंग यांचीही नावे शर्यतीत सामील होती.

Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Ravichandran Ashwin Did Not Get Player of the Series Award from West Indies Cricket Board on India Tour Denied Ashwin A World Record
R Ashwin: अश्विनला मालिकावीराचा पुरस्कार द्यायचा वेस्ट इंडिज बोर्डाला विसर; विश्वविक्रम गेला लांबणीवर
IND vs BAN Test Best Fielder Of The Series Yashasvi Jaiswal Mohammed Siraj Wins Medal India Dressing Room Video
IND vs BAN कसोटी मालिकेत २ बेस्ट फिल्डर, रोहित-सिराज-यशस्वी-राहुल; कोणाला मिळालं मेडल? पाहा VIDEO
Afghanistan Rahmat Shah Falls to Double Defelection Run Out at Non Strikers End AFG vs SA
VIDEO: अफगाणिस्तानच्या फलंदाजाने स्वत:लाच केलं बाद; क्रिकेट इतिहासातला आश्चर्यकारक रनआऊट
Ian Chappell Statement on Jasprit Bumrah Rishabh Pant innings in Border Gavaskar Trophy Test Series sports news
बुमरा, पंतची लय महत्त्वाची; बॉर्डरगावस्कर मालिकेबाबत चॅपल यांचे विधान
IND vs BAN Rohit Sharma on KL Rahul and Sarfaraz Khan ahead 1st Test match
IND vs BAN : केएल राहुल की सर्फराझ खान? रोहित शर्माने केले स्पष्ट; ‘या’ खेळाडूला मिळणार प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी
Ajit Agarkar to Sent Musheer Khan on Australia Tour with India A Squad Just After 7 Matches Impressed by His Innings
Musheer Khan: मुशीर खानच्या खेळीवर अजित आगरकर फिदा; फक्त ७ सामने खेळूनही जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

शेवटच्या सामन्यानंतर भारतीय क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाने सर्व खेळाडूंना ड्रेसिंग रूममध्ये एकत्र केले. यावेळी सिराजचे कौतुक करून त्याला पदक देण्यात आले. बीसीसीआयने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या सुंदर क्षणाचा फोटोही शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये सिराज आणि टी दिलीप एकत्र दिसत आहेत.

टी-२० मालिकेतील सिराजची कामगिरी –

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत मोहम्मद सिराजची कामगिरी त्याच्या प्रतिमेनुसार काही खास नव्हती. दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने २७ धावा खर्च करून केवळ एकच विकेट मिळवली, तर तिसऱ्या सामन्यात त्याने १३ धावा खर्च केल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. फलंदाजी करताना त्याला गेल्या सामन्यात नाबाद दोन धावा करण्यात यश आले. मात्र, या दरम्यान त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : ठरलं! ‘या’ शहरात रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना गुरुवारी (१४ डिसेंबर) खेळला गेला. जोहान्सबर्गच्या न्यू वांडरर्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने २० षटकांत सात विकेट गमावून २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ १३.५ षटकांत ९५ धावांत गारद झाला. भारताने हा सामना १०६ धावांनी जिंकला. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. दुसरा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. आता तिसरा सामना भारताने जिंकला. अशाप्रकारे तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत संपली.