scorecardresearch

Premium

Mohammed Shami: वर्ल्डकप २०२३ पूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, घरगुती हिंसाचार प्रकरणात मोहम्मद शमीला जामीन मंजूर

Mohammed Shami: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला १९ सप्टेंबर रोजी पत्नीसोबतच्या वादातून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज स्वीकारला.

Big relief for Mohammed Shami before the World Cup got bail in the dispute case with his wife
मोहम्मद शमीला १९ सप्टेंबर रोजी पत्नीसोबतच्या वादातून मोठा दिलासा मिळाला आहे. सौजन्य- (ट्वीटर)

Mohammed Shami Gets Bail: भारतीय क्रिकेट संघाचा महत्त्वाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला १९ सप्टेंबर रोजी पत्नीच्या छळ आणि घरगुती हिंसाचार प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. शमीला अलीपूर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते, त्यानंतर त्याचा जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. कोर्टात हजर राहण्याबरोबरच मोहम्मद शमीने जामीन अर्जही दाखल केला होता.

मंगळवारी अलीपूर कोर्टाने भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला दोन हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. शमी मंगळवारी कोलकात्याच्या अलीपूर एसीजेएम कोर्टात प्रत्यक्ष हजर झाला आणि त्याला जामीन मिळाला. २०१८ मध्ये हसीन जहाँने जाधवपूर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे मोहम्मद शमी आणि त्याच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर शमीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली.

IND vs AUS: You didn't even call why did Amit Mishra say this to Rohit Sharma on commitment question Video during practice goes viral
IND vs AUS: “तुम्ही फोनही केला नाही…”, ‘कमिटमेंट’च्या प्रश्नावर अमित मिश्रा रोहित शर्माला असं का म्हणाला? सराव दरम्यानचा Video व्हायरल
Nishikant Dubey vs SOnia Gandhi 1
“तेव्हा सोनिया गांधींनी खासदाराची कॉलर पकडली; मुलायमसिंह म्हणाले, हत्या…”, भाजपा नेत्याने सांगितला २०११ चा किस्सा
Rohit Sharma's Embarrassing Record
IND vs BAN: रोहित शर्माच्या नावावर झाली लाजिरवाण्या विक्रमाची नोंद, आशिया कपमध्ये ‘हा’ नकोसा कारनामा करणारा ठरला पहिला भारतीय
IND vs BAN: Virat Kohli's drop from the team Aakash Chopra's surprising advice to Team India
Aakash Chopra: “विराट कोहलीला संघातून वगळणे हे…”, आकाश चोप्राने टीम इंडियाला दिला आश्चर्यचकीत करणारा सल्ला

तत्पूर्वी, वकिलाने शमीला न्यायालयात हजर राहून जामीन घेण्यास सांगितले होते. २०१८ मध्ये, शमीवर त्याची माजी पत्नी हसीन जहाँने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता आणि तिने खालच्या न्यायालयात केस दाखल केली होती. पत्नीच्या छळ प्रकरणात मोहम्मद शमी पहिल्यांदाच कोर्टात हजर झाला. ५ ऑक्टोबरपासून खेळल्या जाणार्‍या विश्वचषक २०२३च्या आधी, भारतीय क्रिकेटपटू मंगळवारी, १९ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर झाला आणि जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधिशांनी याचिका मान्य करत जामीन मंजूर केला.

हेही वाचा: चीनकडून भारताचा पराभव ; आशियाई क्रीडा स्पर्धेतील फुटबॉलच्या पहिल्या सामन्यात १-५ अशा फरकाने हार

विश्वचषकापूर्वी भारतीय क्रिकेटपटू मंगळवारी कोर्टात हजर झाले. शमीचा भाऊ मोहम्मद हसिमही त्याच्यासोबत होता. दोघांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीशांनी याचिका मान्य करत दोघांनाही जामीन मंजूर केला. शमीचे वकील सलीम रहमान म्हणाले, “शमी आणि त्याचा भाऊ हसिम कोर्टात हजर झाले. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे.” सलीम यांच्याशिवाय वकील नजमुल आलम सरकार न्यायालयात उपस्थित होते.

२३ ऑगस्ट रोजी अलीपूरच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांनी असा निर्णय दिला की, हसीनच्या तक्रारीच्या अनुषंगाने शमीला बोलावण्याचे कोणतेही कारण न्यायालयाला सापडले नाही. त्यामुळे सध्या त्याला न्यायालयात हजर राहण्याची गरज नाही. मात्र, पुढील ३० दिवसांच्या आत भारतीय क्रिकेटपटूला खटल्यातील पुढील कार्यवाहीसाठी ट्रायल कोर्टात अर्ज करावा लागेल. या कालावधीत तो जामिनासाठी अर्ज करू शकतो. ट्रायल कोर्ट शमीरच्या जामिनावर कायद्यानुसार निर्णय देईल. या आदेशानंतर शमी कोर्टात हजर झाला आणि त्याला जामीन मिळाला.

८ मार्च २०१८ रोजी हसीनने मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाविरुद्ध जादवपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता आणि त्यांच्यावर तिचा छळ केल्याचा आरोप केला होता. २९ ऑगस्ट २०१९ रोजी अलीपूरच्या ACJM कोर्टाने शमीविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्याच वर्षी ९ सप्टेंबर रोजी अलीपूर जिल्हा सत्र न्यायालयाने या आदेशाला स्थगिती दिली. जवळपास चार वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे.

हेही वाचा: विश्वचषक नेमबाजी स्पर्धा : निश्चलची रौप्य कामगिरी

ऑस्ट्रेलिया मालिकेत शमीवर सर्वांची नजर असेल

मोहम्मद शमीला आशिया चषक २०२३ मध्ये फक्त २ सामने खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये त्याने एक नेपाळविरुद्ध आणि दुसरा बांगलादेश संघाविरुद्ध खेळला. या दोन्ही सामन्यांमध्ये शमीने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. आता त्याला विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वन डे मालिकेतील सर्व सामने खेळण्याची संधी मिळू शकते. अशा स्थितीत त्याच्या गोलंदाजीच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mohammed shami appeared in court before the world cup granted bail in domestic violence case avw

First published on: 20-09-2023 at 10:45 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×