Mohammed Siraj Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी डबल हेडर सामन्यांचा थरार पार पडला. स्पर्धेतील ४६ वा सामना गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्जचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने २० षटकात ९ गडी बाद १६३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सकडून वॉशिंग्टन सुंदरने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. हा सामना गुजरातने ४ गडी राखून आपल्या नावावर केला. यादरम्यान गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

मोहम्मद सिराजने घडवला इतिहास

या सामन्यात गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने दमदार कामगिरी केली. सिराजने ४ षटकात २८ धावा खर्च केल्या आणि १ गडी बाद केले. या दमदार कामगिरसह सिराजने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. सिराजने गोलंदाजी करताना सुरुवातीच्या षटकातच २ फलंदाजांना माघारी धाडलं. यासह मोहम्मद सिराज हा आयपीएलच्या पहिल्याच षटकात २ गडी बाद करणारा गुजरात टायटन्सच पहिलाच गोलंदाज ठरला आहे.

पंजाब किंग्जची सलामी जोडी ही आयपीएल २०२६ स्पर्धेतील सर्वात स्फोटक फलंदाजांच्या जोडींपैकी एक आहे. पण सिराजने पहिल्याच षटकात गुजरातला यश मिळवून दिलं, त्यामुळे पंजाबचा संघ अडचणीत आला. सिराजने आधी सलामीवीर फलंदाज प्रियांश आर्यला बाद करत माघारी धाडलं. त्याला बाद करण्यासाठी निशांत संधूने झेल घेतला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने कुपर कॉनोलीला बाद करत माघारी धाडलं.

या सामन्यात गुजरात टायटन्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला ९ गडी बाद १६३ धावा करता आल्या. पंजाबकडून सूर्यांश शेडगेने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शनने ५७, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद ४० धावांची खेळी करून गुजरातला ४ गडी राखून विजय मिळवून दिला.