Team India Bowling Coach: श्रीलंका दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. गौतम गंभीर यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय संघाच्या टी-२० संघाने पहिले दोन सामने जिंकत मालिका आपल्या नावे केली आहे. मात्र संघाचा सपोर्ट स्टाफ अजून निश्चित झालेला नाही. संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक कोण असेल हे अद्यापही निश्चित नाही. पण क्रिकबझच्या वृत्तानुसार आता गंभीरने सुचवलेलं नाव भारताच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. हेही वाचा - Paris Olympic 2024 Live, Day 3: तिरंदाजीत भारताच्या पदरी निराशा, पुरूष संघ क्वार्टर फायनलमधून बाहेर क्रिकबझच्या वृत्तानुसार, दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलला भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक बनवले जाऊ शकते. मॉर्केल भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपला कार्यकाळ बांगलादेशविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपासून सुरू करेल, तर सप्टेंबरमध्ये मायदेशात होणाऱ्या मालिकेपूर्वी त्याची अधिकृत नियुक्ती अपेक्षित आहे. हेही वाचा - Yashasvi Jaiswal: फक्त १३ सामने खेळत यशस्वी जैस्वालने केला मोठा विक्रम, ही कामगिरी करणारा ठरला जगातील पहिला फलंदाज सध्या साईराज बहुतुले टीम इंडियासोबत श्रीलंका दौऱ्यावर असून अंतरिम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत, मात्र अहवालानुसार ते मुख्य गोलंदाजी प्रशिक्षक होतील हे निश्चित दिसत नाही. बहुतुले हे फिरकी गोलंदाज आहेत आणि त्यांच्याबद्दल काहीही स्पष्ट नाही, तर मॉर्केल हा वेगवान गोलंदाज आहे आणि तो भारतीय संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झाले तर टीम इंडियाला फिरकी प्रशिक्षकाची गरज भासू शकते. मात्र, श्रीलंकेत सुरू असलेल्या क्रिकेट मालिकेदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समिती संघाच्या सध्याच्या प्रशिक्षकांचे मूल्यमापन करतील आणि त्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल. हेही वाचा - Paris Olympics: बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा जिंकलेला सामना ग्राह्य धरला जाणार नाही, BWF ने का घेतला असा निर्णय? Morne Morkel होणार भारताचा नवा गोलंदाजी प्रशिक्षक? साईराज बहुतुले त्यांच्या पदावर कायम राहिल्यास, गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय कोचिंग स्टाफमध्ये सहा सदस्य असतील. संघाचे मुख्य प्रशिक्षक गंभीर, अभिषेक नायर आणि रायन टेन डोशेट हे सहाय्यक प्रशिक्षक, मॉर्केल वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक, टी दिलीप क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि बहुतुले फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असतील. हेही वाचा - Olympic 2024: सात्त्विक-चिरागच्या जोडीने रचला इतिहास, ऑलिम्पिकमधील बॅडमिंटनचा सामना रद्द होऊनही गाठली उपांत्यपूर्व फेरी ३९ वर्षीय मॉर्केल हा वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे भारताला निश्चितपणे फिरकी प्रशिक्षकाची गरज भासेल. वृत्तांच्या मते मॉर्केल येत्या आठवड्यात गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारणार आहे. मॉर्ने मॉर्केलने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५४४ विकेट्स घेतल्या, ज्यात कसोटीत ३०९ विकेट, एकदिवसीय सामन्यात १८८ विकेट आणि टी-२० मध्ये ४७ विकेट्सचा समावेश आहे.