IPL इतिहासातील खुंखार गोलंदाज; धावांसाठी फलंदाजांना करावा लागला संघर्ष, नावं वाचून तुम्हाही व्हाल थक्क

आयपीएल इतिहासातील या खतरनाक गोलंदाजांनी मैदानात उतरलेल्या फलंदाजांना धावांसाठी अक्षरक्षा रडवलं.

Most Dangerous Bowlers In IPL History
IPL इतिहासातील खतरनाक गोलंदाज महितीयत का? (Image-Indian Express)

Most Dangerous Bowlers In IPL History : इंडियन प्रीमियर लीग २०२३ ची सुरुवात उद्या ३१ मार्चपासून होणार आहे. आयपीएलच्या १६ व्या सीजनचा पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. तत्पूर्वी, आयपीएल इतिहासातील काही भेदक गोलंदाजांबाबत जाणून घेऊयात, ज्यांनी मैदानात भेदक गोलंदाजी केल्यामुळं फलदाजांना धावांसाठी संघर्ष करावा लागला.

१) भुवनेश्वर कुमार

भारताचा वेगवान गोलंदाज या लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर आहे. भुवनेश्वर कुमार आयपीएलमध्ये सनरायजर्स हैद्रबाद संघाकडून खेळतो. या लीगमध्ये आतापर्यंत त्याने एकूण १४६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये भुवनेश्वरने ५४२ षटक फेकले आहेत. तसंच या सामन्यांमध्ये भुवनेश्वरने एकूण १५४ विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. भुवनेश्वरने १४०६ निर्धाव चेंडू फेकले असून त्याच्या गोलंदाजीचा ७.३० इतका इकॉनमी रेट राहिला आहे.

२) सुनील नारायण</strong>

कोलकाता नाईट रायडर्सचा सुनील नारायण दुसऱ्या स्थानावर आहे. सुनीलने आयपीएलमध्ये एकूण १४८ सामने खेळले आहेत. याचदरम्यान त्याने ५७६ षटकांमध्ये १३९१ निर्धाव चेंडू फेकले आहेत. तसंच सुनीलने भेदक गोलंदाजी करून ६.६३ च्या इकॉनमी रेटने १५२ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली आहे.

नक्की वाचा – IPL History: ‘या’ ५ खेळाडूंनी पकडले सर्वात जास्त झेल; लिस्टमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश

३) रविचंद्रन आश्विन

सर्वात जास्त निर्धाव चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजांच्या लिस्टमध्ये रविचंद्रन आश्विन तिसऱ्या स्थानावर आहे. आश्विनने या लीगमध्ये एकूण १८४ सामने खेळले आहेत. याचदरम्यान आश्विनने ६४९ षटकांची गोलंदाजी केली असून यामध्ये १३८७ निर्धाव चेंडूंचा समावेश आहे. त्याने ६.९८ च्या इकॉनोमी रेटने गोलंदाजी करून १५७ विकेट्स घेतले आहेत.

४) हरभजन सिंग

हरभजन सिंग या क्रमवारीत चौथ्या स्थानावर आहे. हरभजनने आयपीएलमध्ये १६३ सामन्यांमध्ये ५६९ षटक फेकले आहेत. याचदरम्यान त्याने १२६८ निर्धाव चेंडू फेकले आहेत. हरभजनने या लीगमध्ये ७.०८ च्या इकॉनमी रेटने गोलंदाजी करत १५० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

५) लसिथ मलिंगा

या लीगचा दिग्गज वेगवाग गोलंदाज लसिथ मलिंगा सर्वात जास्त निर्धाव चेंडू फेकणाऱ्या खेळाडूंच्या लिस्टमध्ये पाचव्या स्थानावर आहे. मलिंगाने आयपीएलमध्ये एकूण १२२ सामने खेळले आहेत. याचदरम्यान त्याने ४७१ षटकांची गोलंदाजी केली आहे. मलिंगाच्या नावार १७० विकेट्सची नोंद असून त्याने ११५५ निर्धाव चेंडू फेकले आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 18:03 IST
Next Story
Virat Kohli Marksheet: विराट कोहलीने आयपीएलपूर्वी शेअर केली इयत्ता दहावीची मार्कशीट; जाणून घ्या कोणत्या विषयात होता कच्चा
Exit mobile version