Most Interesting IPL Facts : इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा सीजन ३१ मार्च २०२३ पासून सुरु होणार आहे. या सीजनमध्येही अनेक जुने विक्रम मोडण्याची शक्यता असून नवीन विक्रमांना गवसणी घालण्यात येईल. पण त्याआधी आम्ही तुम्हाला आयपीएल इतिहासाशी संबंधीत काही महत्वाचे तथ्य सांगणार आहोत, जे पाहून तुम्हीही थक्क झाल्याशिवाय राहणार नाहीत.

आयपीएलचा पहिला सामना वर्ष २००८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात ब्रेंडन मॅक्यूलमने धडाकेबाज खेळी करून ७३ चेंडूत १५८ धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. मॅक्यूलम एकमेव नाईट रायडर आहे, ज्याने आयपीएलमध्ये शतक ठोकलं आहे. केकेआरचा अन्य कोणताही खेळाडू असा पराक्रम करू शकला नाही.

Rupee hits all time low against US Dollar
रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी 
Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Rohit Sharma 17 times Golden Duck
MI vs RR : रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम, दिनेश कार्तिकसह ‘या’ यादीत पोहोचला पहिल्या स्थानावर

रोहित शर्मा हॅट्रिक

इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्माने ही टूर्नामेंट पाचवेळा जिंकली आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलमध्ये ५ जेतेपदांवर शिक्कामोर्तब केला आहे. पण तुम्हाला माहितीय का, रोहित शर्माने वर्ष २००९ मध्ये मुंबई इंडियन्सविरोधात आयपीएल करिअरची पहिली विकेट हॅट्रिक घेतली होती. २००९ मध्ये रोहित डेक्कन चार्जर्स टीमकडून खेळत होता. त्यावेळी रोहितने अभिषेक नायर, हरभजन सिंग आणि जेपी डुमिनीला बाद करून विकेट हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता.

नक्की वाचा – IPL History: ‘या’ ५ खेळाडूंनी पकडले सर्वात जास्त झेल; लिस्टमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश

रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोर

आयपीएलच्या सर्वात लोकप्रिय आरसीबी टीमसोबत एक अनोखं रहस्य जोडलं गेलं आहे. आरसीबीने २३ एप्रिल २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाच्या विरुद्ध आयपीएल इतिहासातील सर्वात मोठा स्कोर केला होता. या सामन्यात आरसीबीने एकूण २६३ धावा केल्या होत्या. पण त्यानंतर काही वर्षांनी आरसीबीच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद करण्यात आली. २३ एप्रिल २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरोधात झालेल्या सामन्यात आरसीबीचा आख्खा संघ ४९ धावांवर गारद झाला. आयपीएल इतिहासातील आरसीबीने केलेल्या सर्वात कमी धावसंख्येची नोंद करण्यात आली.

सचिन तेंडुलकरने जिंकली ऑरेंज कॅप

दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरनेही आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. सचिन तेंडुलकर भारताचा एकमेव खेळाडू आहे, ज्याने आयपीएल इतिहासात सर्वात पहिल्यांदा ऑरेंज कॅप जिंकली आहे. तेंडुलकरच्या आधी शॉन मार्श आणि मॅथ्यू हेडनने ऑरेंज कॅप जिंकण्याचा चमकदार कामगिरी केलीय. सचिनने २०१० मध्ये ६१८ धावा करून ऑरेंज कॅप जिंकली होती.

ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज शेन वॉटसनने शतक ठोकून इतिहास रचला होता. २०१३ मध्ये वॉटसन राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळत होता. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या विरोधात झालेल्या सामन्यात आक्रमक खेळी करून शतक ठोकलं होतं. २०१८ मध्ये वॉटसन चेन्नई सुपर किंग्जकडू खेळला आणि त्यावेळी त्याने राजस्थान रॉयल्सच्या विरोधात झालेल्या सामन्यात वादळी खेळी करत शतक ठोकलं होतं.