Most Successfull Teams In T20 World Cup:आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना ७ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना अमेरिकेविरुद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने गेल्यावेळी झालेल्या आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. यावेळी भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. भारतीय संघातील खेळाडू सध्या तुफान फॉर्ममध्ये आहेत. यासह वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन भारतात केले जाणार आहे. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं जड असणार आहे. याआधी कुठल्याही संघाला सलग दोन वेळा जेतेपदाची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
टी -२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ कोणता?
टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे आतापर्यंत ९ हंगाम खेळवले गेले असून आगामी हंगाम हे १० वे हंगाम असणार आहे. यादरम्यान काही संघांनी एकदा तर काही संघांनी दोन वेळ जेतेपदाची ट्रॉफी उंचावली आहे. या स्पर्धेतील भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज असे ३ संघ आहेत, ज्या संघांनी प्रत्येकी २-२ वेळा जेतेपदाचा मान मिळवला आहे. तर पाकिस्तान,श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या ३ संघांनी प्रत्येकी १-१ वेळा जेतेपदाचा मान पटकावला आहे.
तर या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ कोणता असेल तर, तो भारतीय संघ आहे. कारण भारतीय संघाच्या नावे या स्पर्धेतील सर्वाधिक सामने जिंकण्याची नोंद आहे. या स्पर्धेत भारतीय संघाची विजयाची सरासरी ६७ ते ७० टक्के इतकी आहे.
भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना २००७ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यानंतर २००९ मध्ये युनिस खानच्या नेतृत्वाखाली खेळताना पाकिस्तानने जेतेपदाचा मान पटकावला होता.
टी – २० वर्ल्डकप स्पर्धेतील विजेता संघ आणि त्यांचे कर्णधार
२००७: भारत – एमएस धोनी
२००९: पाकिस्तान – युनिस खान
२०१०: इंग्लंड – पॉल कॉलिंगवुड
२०१२: वेस्ट इंडिज – डॅरेन सॅमी
२०१४: श्रीलंका – लसिथ मलिंगा
२०१६: वेस्ट इंडिज – डॅरेन सॅमी
२०२१: ऑस्ट्रेलिया – आरोन फिंच
२०२२: इंग्लंड – जोस बटलर
२०२४: भारत – रोहित शर्मा</p>

