Year Ender 2025 Most Test Wicket by Indian: भारताच्या कसोटी संघासाठी २०२५ हे वर्ष फारसं चांगलं राहिलं नाही. वर्षाच्या सुरूवातीलाच ऑस्ट्रेलियाविरूद्ध संघाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेत पराभवाला सामोरं जावं लागलं. यानंतर संघातील दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटला अचानक अलविदा करत सर्वांनाच धक्का दिला. यानंतर शुबमन गिल संघाचा नवा कर्णधार ठरला. यादरम्यान काही खेळाडूंनी भारतासाठी कसोटीत चांगली कामगिरी केली. पण यंदा कसोटीत सर्वाधिक विकेट्स बुमराहच्या नावावरून नसून वेगळ्याच गोलंदाजाने बाजी मारली आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर जसप्रीत बुमराहला दुखापत झाली. या दुखापतीमुळे बुमराह बराच काळ भारतीय संघातून बाहेर होता. यादरम्यान भारताच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी मोहम्मद सिराजच्या खांद्यावर होती आणि जी त्याने चोख पार पाडली. यासह मोहम्मद सिराजने भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

कसोटी विकेट्समध्ये मोहम्मद सिराजने या वर्षी जसप्रीत बुमराहला मागे टाकलं. सिराजने बुमराहपेक्षा दोन जास्त सामने खेळले असले तरी, यादरम्यान सिराजने सर्वोत्तम गोलंदाजी केली हे नाकारता येत नाही. सिराजने या वर्षी १० सामन्यांमध्ये एकूण ४३ विकेट्स घेतल्या, ज्यामुळे तो मिचेल स्टार्कनंतर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा गोलंदाज आहे.

बुमराह जागतिक यादीत पाचव्या स्थानावर आहे, तर मिचेल स्टार्कने २०२५ मध्ये १० सामन्यांमध्ये ५१ विकेट्सह सर्वाधिक कसोटी विकेट्स घेतल्या आहेत. या वर्षी स्टार्कला इंग्लंडविरुद्ध आणखी एक कसोटी खेळायची आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील बॉक्सिंग डे अ‍ॅशेस कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे.

२०२५ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज

खेळाडूसामनेडावषटकमेडनधावाविकेटसर्वश्रेष्ठ५ विकेट्स
मोहम्मद सिराज१०१९३११.३४५११७०४३६-७०
जसप्रीत बुमराह१४२४३.३५२६८७३१५-२७
रवींद्र जडेजा१०१८२९७.४४१९५५२५४-५०
कुलदीप यादव१३३.२१७४६३२०५-८२
प्रसिद्ध कृष्णा१३२१०६२६२०४-६२
आकाश दीप१०९.११४४७४१३६-९९
वॉशिंग्टन सुंदर१४१७०२२५५७११४-२२
नितीश कुमार रेड्डी५१२१८२-३२
अक्षर पटेल२०५७१-२१
शार्दुल ठाकुर२७१४४२-५१