scorecardresearch

Premium

भारतात प्रथमच MotoGP शर्यतीचे आयोजन! सुरेश रैनाने सोशल मीडियावर शेअर केला VIDEO

Buddha International Circuit: भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने या शर्यतीत सहा वेळा विश्वविजेता स्पेनच्या मार्क मार्केझची भेट घेतली. मोटोजीपी रेसिंगमध्ये रस दाखवून त्याने या संधीचा फायदा घेतला. रैनाने आपल्या सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली.

First time MotoGP race held in India
सुरेश रैनाची मोटोजीपी भारत २०२३ उपस्थिती (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

MotoGP India 2023 in Buddha International Circuit: सध्या उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे जगातील आघाडीच्या मोटो रायडर्सचा मेळावा आहे. वास्तविक, २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान ग्रेटर नोएडा येथील बुद्ध इंटरनॅशनल सर्किट येथे मोटोजीपी भारत शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शर्यत देशात प्रथमच आयोजित केली जात असून मोटार स्पोर्ट्सच्या चाहत्यांना याबद्दल खूप उत्सुकता आहे. या शर्यतीसाठी येथे आलेले स्टार रायडर्स देखील भारतीय संस्कृती आणि मोटारस्पोर्टबद्दल लोकांमध्ये असलेला उत्साह पाहून खूप आनंदी दिसत आहेत.

यामुळेच त्याने बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर गल्ली क्रिकेटचा आनंद लुटला. या दरम्यान माजी भारतीय क्रिकेटर सुरेश रैना देखील दिसला, जो मोटोजीपी रायडर्ससोबत गल्ली क्रिकेट खेळला. सुरेश रैनाने रेड बुल केटीएम स्टार रायडर ब्रॅड बाइंडरला गोलंदाजी दिली. मात्र, ब्रॅडने त्याच्या चेंडूंवर मोठे फटके खेळल्यामुळे रैना गोलंदाजीमध्ये तेवढा यशस्वी ठरला नाही. या रस्त्यावरील क्रिकेट सामन्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

India vs Australia Cricket Score Updates in Marathi
IND vs AUS, World Cup 2023: विराट कोहलीने मिचेल मार्शचा अप्रतिम झेल घेत विश्वचषकात रचला इतिहास, पाहा VIDEO
India vs Australia Cricket Score Updates in Marathi
World Cup 2023: “मला माहित नाही की हा संघ…”; विश्वचषकापूर्वी हरभजन सिंगने टीम इंडियाच्या एकजुटीवर उपस्थित केला प्रश्न
anand mahindra viral tweet bcci gifted team india jersey to anand mahindra printed with 55 number businessman post goes viral
आनंद महिंद्रांनी शेअर केली स्वत:चे नाव असलेली टीम इंडियाची ५५ नंबरची जर्सी; युजर्सनी विचारले, याचा अर्थ काय?
IND vs SL Rohit Sharma Catch Video Vira;
IND vs SL: हिटमॅनने डायव्हिंग करत एका हाताने घेतला शानदार झेल, रोहितच्या शर्माच्या कॅचचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

मोटोजीपी भारत २०२३ ही मोटोजीपी सर्किटची १३वी शर्यत असेल, ज्यामध्ये ११ संघांचे प्रतिनिधित्व करणारे २२ रायडर्स समाविष्ट आहेत. प्रत्येक संघात दोन रायडर्स असतील. हे रायडर्स होंडा, यामाहा, केटीएम, डुकाटी आणि एप्रिलिया यांसारख्या प्रसिद्ध उत्पादकांनी दिलेल्या बाइक चालवतील.

हेही वाचा – World Cup 2023: वर्ल्ड कपमधून बाहेर झाल्यानंतर पाकचा वेगवान गोलंदाज नसीम शाह झाला भावूक, शेअर केली खास पोस्ट

मार्क्वेझ सहा वेळा चॅम्पियन –

जर मार्केझबद्दल बोलायचो, तर तो सहा वेळा मोटोजीपी शर्यतीचा विजेता ठरला आहे. त्याने २०१३, २०१४, २०१६, २०१७, २०१८ आणि २०१९ मोटोजीपी सीझन जिंकले आहेत. तो फक्त व्हॅलेंटिनो रॉसी (७ वेळा चॅम्पियन) आणि जियाकोमो अगोस्टिनी (8-वेळा चॅम्पियन) मागे आहे. या वेळीही मार्क्वेझ पहिल्या क्रमांकावर राहिला तर तो व्हॅलेंटिनोची बरोबरी करेल. या हंगामात मोटोजीपीमध्ये मार्क्वेझ ३१ गुणांसह १९ व्या क्रमांकावर आहे. भारतात प्रथमच होणाऱ्या या रेसिंगला एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Motogp rider brad binder hits sixes on suresh rainas balls see video in motogp india 2023 vbm

First published on: 22-09-2023 at 17:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×