scorecardresearch

धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याच्या तयारीत

महत्वाच्या मालिकेतून पुनरागमन करण्याची चिन्ह

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं आहे. आगामी टी-२० विश्वचषक आणि धोनीचं वाढतं वय लक्षात घेता, त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी वर्षात Asia XI vs Rest of World XI अशा टी-२० सामनाच्याचं आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. १८ आणि २१ मार्च २०२० रोजी ढाका शहरात हे सामने होणार आहेत. या सामन्यांसाठी भारतीय संघातील ७ खेळाडूंना परवानगी द्यावी अशी मागणी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयला केल्याचं समजतंय. या ७ भारतीय खेळाडूंमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश असल्याचं कळतंय.

“होय, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने Asia XI vs Rest of World XI सामन्यांचं आयोजन केलं आहे. यासाठी आम्ही बीसीसीआय आणि इतर आशियाई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत.” बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अधिकारी निझामुद्दीन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. याआधी २००७ साली धोनी Asia XI vs Africa XI या मालिकेत खेळला होता. त्यामुळे बीसीसीआय आता बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या विनंतीवर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni among 7 indian players to play for asia xi bcb reaches out to bcci for marquee event psd

ताज्या बातम्या