MS Dhoni Birthday Bike Collection: भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज, ७ जुलै रोजी आपला ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याची गणना जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. क्रिकेटच्या मैदानात धोनीच्या नावे अनेक विक्रम आहेत; मात्र, ‘कॅप्टन कूल’च्या शांत स्वभावाच्या आणि जादुई नेतृत्वाच्या बळावर त्याने मोठं यश संपादन केलं. धोनीकडे बाईक्सचा जणू खजाना आहे, पण माहीला बाईक इतक्या का आवडतात यामागचं कारण जाणून घेऊया.
एम एस धोनीकडे एकूण किती बाईक आहेत?
भारतात मोटारसायकलवर मनापासून प्रेम करणाऱ्या सेलिब्रिटींचा विचार केला, तर माजी भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचं नाव सर्वात पहिल्या क्रमांकावर येतं. क्रिकेटमुळे त्याला जागतिक ओळख मिळाली असली, तरी दुचाकींबद्दलची त्याची अफाट आवड त्याला बाईकप्रेमींमध्येही तितकीच लोकप्रिय बनवते. धोनीच्या ताफ्यात जवळपास १०० बाईक आहेत. संपूर्ण गॅरेज धोनीच्या या बाईकने भरलेलं आहे.
गेल्या काही वर्षांत धोनीने दुर्मिळ, विंटेज, क्लासिक आणि आधुनिक सुपरबाईक्सचा जबरदस्त संग्रह उभारला आहे. या संग्रहाची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचं मानलं जातं. रांची येथील धोनीचं गॅरेज आज वाहनप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. या गॅरेजमध्ये अशा अनेक दुर्मिळ आणि अनोख्या मोटारसायकली आहेत, ज्यांचे मालक होण्याचं स्वप्न अनेक जण पाहत असतात.
महेंद्रसिंग धोनीला बाईक्सची इतकी आवड का?
भारतातील सर्वात यशस्वी क्रिकेटपटूंपैकी एक होण्यापूर्वीपासूनच महेंद्रसिंग धोनीला मोटारसायकलचं वेड होतं. अनेक मुलाखतींमध्ये त्याने सांगितलं आहे की, आलिशान कार खरेदी करण्यापूर्वी त्याने बाईक्स खरेदी करण्यास सुरुवात केली होती. क्रिकेटमधून मिळालेल्या पहिल्या पगाराचाही मोठा हिस्सा तो मोटारसायकलींची देखभाल आणि त्यात सुधारणा करण्यासाठी खर्च करत असे. आज रांचीतील त्याच्या गॅरेजमध्ये १०० हून अधिक मोटारसायकल आहेत. एखाद्या भारतीय सेलिब्रिटीकडे असलेल्या सर्वात मोठ्या खासगी बाईक संग्रहांपैकी हा एक मानला जातो. विंटेज यामाहा मॉडेल्सपासून अमेरिकन क्रूझर्स आणि इटालियन सुपरबाईक्सपर्यंत जवळपास प्रत्येक प्रकारची बाईक त्याच्या संग्रहात पाहायला मिळते.
कॉन्फेडरेट हेलकॅट X132
धोनीच्या संग्रहातील Confederate Hellcat X132 ही सर्वात दुर्मिळ मोटारसायकलींपैकी एक मानली जाते. या बाईकचे जगभरात अत्यंत मर्यादित युनिट्स तयार करण्यात आले होते, त्यामुळे तिची किंमत आणि दुर्मिळता दोन्ही खूपच जास्त आहेत. शक्तिशाली V-Twin इंजिन, विमाननिर्मितीत वापरल्या जाणाऱ्या दर्जेदार अॅल्युमिनियमसारख्या प्रीमियम साहित्याचा वापर आणि हाताने केलेली उत्कृष्ट निर्मिती ही या बाईकची वैशिष्ट्ये आहेत. धोनीच्या आलिशान बाईक संग्रहातील ही सर्वात मौल्यवान मोटारसायकलींपैकी एक मानली जाते. ५० ते ६० लाख इतकी या बाईक्सची किंमत आहे.

एम एस धोनीच्या संग्रहातील महागड्या बाईक्स
कॉन्फेडरेट हेलकॅट X132 – ६० ते ७० लाख
कावासाकी निंजा एच २ – ८० लाख
हार्ली डेव्हिडसन फॅटबॉय – २५ लाख
दुकाटी १०९८ – २२ लाख
कावासाकी निंजा झेड-एक्स-१४आर – २० लाख
यामाहा आरडी ३५० – ३-६ लाख
यामाहा आरएक्स १०० – १.५-३ लाख
बीसीए गोल्ड स्टार-५-१० लाख
नॉर्टन जुूबली २५० – ६-८ लाख
सुझुकी शौगन
