हॅपी बर्थडे..! धोनीनं ‘अशा’ प्रकारे साजरा केला पत्नी साक्षीचा वाढदिवस; VIDEO होतोय व्हायरल

धोनी आणि साक्षीचं २०१०मध्ये लग्न झाले.

MS dhoni celebrated wife Sakshis 33rd birthday video goes viral
साक्षी धोनीचा ३३वा वाढदिवस

भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची पत्नी साक्षी आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनी सध्या कुटुंबासह रांचीमध्ये आहे. साक्षीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये साक्षी केक कापताना दिसत आहे, तर धोनी तिच्यासोबत उभा आहे. धोनी आणि साक्षीचे जुलै २०१० मध्ये लग्न झाले. या दाम्पत्याला झिवा ही मुलगी आहे. साक्षी ही इंस्टाग्रामवरील लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे. अनेकदा ती मैदानावर धोनी आणि त्याची टीम चेन्नई सुपर किंग्जला प्रोत्साहन देताना दिसते.

साक्षीला इंस्टाग्रामवर जवळपास ४५ लाख चाहते फॉलो करतात. साक्षीसोबत धोनीची पहिली भेट २००७ मध्ये एका हॉटेलमध्ये झाली होती. साक्षी आणि धोनी हे दोघेही बालपणीचे मित्र असल्याचे अनेकदा सांगितले जाते. दोघांचे वडील मित्र होते.

हेही वाचा – PHOTOS : ‘या’ १५ खेळाडूंनी क्रिकेटमध्ये केलं मोठं काम, पण SEX SCANDAL मुळं झाले ‘बदनाम’!

एका मुलाखतीत साक्षी म्हणाली होती, ”लोक अनेकदा म्हणतात की माही आणि मी बालपणीचे मित्र आहोत. आमच्या कुटुंबातील सदस्य देखील मित्र आहेत. पण आमच्यात सात वर्षांचा फरक आहे आणि आम्ही बालपणीचे मित्र नाही. ७ जुलै २०१० रोजी माहीच्या वाढदिवसाला लग्नानंतर मी पहिल्यांदा रांचीला गेले होते.”

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना रांची येथे खेळवला जाणार आहे. हा सामना पाहण्यासाठी धोनी जेएससीए स्टेडियममध्ये जाऊ शकतो. झारखंड प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव संजय सहाय म्हणाले, “धोनी येथे आहे आणि आज कोर्टवर टेनिस खेळला. तो सामना पाहायला येईल की नाही हे सांगता येत नाही.”

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ms dhoni celebrated wife sakshis 33rd birthday video goes viral adn

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या