लग्नाच्या ११व्या वाढदिवसानिमित्त धोनीनं आपल्या बायकोला दिलं ‘खास’ गिफ्ट!

धोनी आणि साक्षीनं ४ जुलै २०१० रोजी लग्नगाठ बांधली.

ms dhoni gifts vintage car beetle to his wife sakshi on marriage anniversary
धोनी आणि साक्षी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि त्याची पत्नी साक्षी यांनी आज लग्नाची ११ वर्षे पूर्ण केली आहेत. सर्वांनी धोनी आणि साक्षीला यासाठी शुभेच्छा दिल्या. धोनी सोशल मीडियावर कमी अ‍ॅक्टिव्ह असतो, पण साक्षी खूप अ‍ॅक्टिव्ह राहते आणि ती पतीशी संबंधित फोटो चाहत्यांसह शेअर करते. दरम्यान, धोनीने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त कोणती भेट दिली आहे, हे साक्षीने सांगितले आहे.

साक्षीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पोस्टसह अनेक फोटो पोस्ट केले. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीने साक्षीला व्हिंटेज कार फॉक्सवॅगन बीटल गिफ्ट केली आहे.

ms dhoni gifts vintage car beetle to his wife sakshi on marriage anniversary
फॉक्सवॅगन बीटल

 

हेही वाचा – ‘धोनीसाठी कोणताही खेळाडू बंदुकीची गोळी खाण्यास तयार”

साक्षीनेही या गिफ्टबद्दल धोनीचे आभार मानले आहेत. धोनी आणि साक्षीने ४ जुलै २०१० रोजी लग्नगाठ बांधली. त्यांनी एक दिवस आधी म्हणजेच 3 जुलै रोजी डेहराडूनमध्ये साखरपुडा केला. लग्नाआधी दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केले होते.

यंदा वर्षाअखेर आयपीएलसाठी धोनी मैदानावर परतणार आहे, या लीगचा दुसरा टप्पा यूएईमध्ये होणार आहे. आयपीएल १४व्या हंगामात धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. करोनामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. मात्र आता उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईत १९ सप्टेंबरपासून होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ms dhoni gifts vintage car beetle to his wife sakshi on marriage anniversary adn