यंदा आयपीएलचा सोळावा हंगाम खेळला जाणार आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामाला एप्रिलमध्ये सुरुवात होण्याची शक्यता आहे. आयपीएल २०२३ साठी सर्व १० संघानी आपली कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये संघांनी आपल्या संघातील खेळाडू निश्चित केले आहेत. अशात भारतीय संघाचा माजी आणि सीएकेचा कर्णधार एमएस धोनीनेदेखील तयारी सुरु केली आहे. ज्याचा व्हिडिओ होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आयपीएलची तयारी सुरू केली आहे. तो झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन स्टेडियम येथे सराव करत आहे. ज्याचा व्हिडिओ आला आहे. धोनी आणि सीएसके चाहत्यांसाठी हे आयपीएल खास असणार आहे, कारण धोनी क्रिकेटर म्हणून मैदानात उतरण्याची ही कदाचित शेवटची वेळ असेल. या आयपीएलनंतर धोनी लीग क्रिकेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो.

धोनीला त्याचा शेवटचा सामनाही घरच्या मैदानावर खेळायची इच्छा आहे. तसेच यावेळी आयपीएल फक्त होम आणि अवे फॉरमॅटमध्येच खेळवली जाईल. ४ वर्षांनंतर सीएसके त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे, जे चाहत्यांसाठी एक वेगळीच भावना असेल. धोनीने या हंगामासाठी तयारी सुरू केली आहे. तो नेटमध्ये फलंदाजीचा सराव करत आहे.

धोनीच्या सरावाचा व्हिडिओ सीएसकेच्या फॅन पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धोनी कसा पुढे सरसावत शॉट लगावत आहे, तर कधी तो बचावात्मक फलंदाज करताना दिसत आहे. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. त्याचबरोबर तो आयपीएल व्यतिरिक्त कोणतीही लीग खेळत नाही. ४१ वर्षीय धोनी फिटनेसच्या बाबतीत आजही अनेक सध्याच्या क्रिकेटपटूंना मागे टाकू शकतो. पण मैदानावर सराव आवश्यक आहे, त्यामुळे धोनीने आयपीएलपूर्वी सराव सुरू केला आहे.

हेही वाचा – टॉम लॅथमची ‘ती’ चूक न्यूझीलंडला पडली महागात; ज्यामुळे गिलने झळकावले द्विशतक, पाहा VIDEO

चेन्नई सुपर किंग्जचा संघ:

फलंदाज: ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, सुभ्रांशु सेनापती, अजिंक्य रहाणे, शेख रशीद
यष्टिरक्षक: महेंद्रसिंग धोनी, अंबाती रायुडू
गोलंदाज: महेश तिक्षाना, रवींद्र हंगेरगेकर, सिमरनजीत सिंग, मुकेश चौधरी, प्रशांत सोळंकी, तुषार देशपांडे, दीपk चहर, महेश पाथीराणा
अष्टपैलू: रवींद्र जडेजा, मोईन अली, शिवम दुबे, मिचेल सँटनर, ड्वेन प्रिटोरियस, बेन स्टोक्स, निशांत सिंधू, काईल जेम्सन, भगत वर्मा, अजय जाधव

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni has started training for ipl 2023 at the jsca stadium as a video has viral vbm
First published on: 19-01-2023 at 16:21 IST