“धोनी हल्ली झोपेत PUBG बद्दल बडबडतो”

साक्षी म्हणते, “लॉकडाउन काळात PUBG सोडून आणखी एक काम करतो धोनी”

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्ती संदर्भात रोज काही ना काही अफवा उठवल्या जात असतात. चार-पाच दिवसापूर्वी अचानक #Dhoni Retires असा एक हॅशटॅग ट्रेंड झाला. या साऱ्या प्रकारावर धोनीची पत्नी साक्षी हिने टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले होते. “लॉकडाउनमुळे काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. म्हणून असला हॅशटॅग ट्रेंड होतोय. अशा लोकांनी आपल्या स्वत:च्या आयुष्यात लक्ष घालावं”, असं उत्तर तिने दिलं होतं. त्यानंतर आता साक्षी धोनी पुन्हा एकदा तिने नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

धोनी कर्णधार असलेल्या CSK संघाने आपल्या च्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून साक्षीशी संवाद साधला. महिला अँकर रूपा रमाणी हिने CSK आणि चाहत्यांतर्फे साक्षीला प्रश्न विचारले आणि साक्षीने त्या प्रश्नांची दमदार उत्तरं दिली. याच मुलाखती दरम्यान धोनीला सध्या PUBG खेळाचे वेड लागले असून तो झोपतही याच खेळाबद्दल बडबड करत असतो, असं साक्षीने सांगितलं. “धोनीच्या डोक्यात कायम कसले तरी विचार सुरू असतात. त्याचं डोकं कधीच शांत नसतं. तो जेव्हा व्हिडीओ गेम खेळतो, तेव्हा त्याचं लक्ष थोडं विचार करण्यापासून मुक्त होतं. ती एक गोष्ट चांगली आहे. पण आता त्या PUBG खेळाने माझ्या बेडवर अतिक्रमण केलं आहे. हल्ली माही (धोनी) झोपेतही त्या PUBG गेममबद्दलच बडबड करत असतो”, असं साक्षीने सांगितलं.

लॉकडाउन काळात धोनी काय करतो? या प्रश्नावरही साक्षीने उत्तर दिलं. “धोनीकडे ९ बाईक आहेत. तो त्या बाईक उघडतो. त्याने काही पार्ट्स आणले आहेत. ते पार्ट्स तो बाईकला लावतो. मध्यंतरी तो स्वत: पूर्णपणे एक बाईक बनवत होता. त्याने सुरूवात केली आणि पूर्ण बाईक बनवून तयार पण केली. पण तेवढ्यात त्याला लक्षात आलं की त्याने एक पार्ट लावलाच नाही. मग त्याने पुन्हा सगळी बाईक पुन्हा उघडली आणि सगळं परत करत बसला”, असा मजेशीर किस्सा साक्षीने सांगितला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ms dhoni is sleep talking pubg these days assemble bikes in lockdown period says wife sakshi on csk chat

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या