थाला महेंद्रसिंग धोनी यंदाच्या आयपीएलमधील अद्याप एकही सामना खेळलेला नाही. धोनीने कारकिर्दीत पहिल्यांदाच आयपीएलचे इतके सामने खेळलेला नाही. सीएसकेने माहिती दिल्यानुसार धोनीच्या पोटरीला दुखापत झाली होती. त्यामुळे दोन आठवडे आयपीएलचे सामने खेळू शकणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. धोनी सामने खेळत नसला तरी संघाच्या सरावांना मात्र नेट्समध्ये उपस्थित होता. आता धोनीच्या पुनरागमनाची तारीख अखेर ठरली आहे.
धोनीच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्सची यंदाच्या आयपीएलची सुरूवात फार खराब झाली. चेन्नईने सुरूवातीचे सलग तीन सामने गमावले होते. आता चेन्नईने सलग २ सामने जिंकल्याने संघाची गाडी पुन्हा रूळावर आली. चेन्नईने यंदाच्या संघात युवा खेळाडूंवर भर दिला आहे, त्यानुसार सुरूवातीला संघाला परिणाम मिळवता आला नव्हता. आता धोनीच्या येण्याने संघाची घडी नीट बसणार का, यावर सर्वांच्या नजरा असतील.
महेंद्रसिंग धोनी आयपीएल २०२६ मधील पहिला सामना २३ एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. सीएसकेच्या सूत्रांनुसार, ४४ वर्षीय धोनी प्री-सीझन कॅम्पदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे सध्या विश्रांतीवर आहे, पण आता तो पूर्णपणे फिट होण्याच्या जवळ पोहोचला आहे. सीएसकेचा पुढील सामना सनरायझर्स हैदराबादविरुद्ध आहे, मात्र धोनी संघासोबत प्रवास करणार की नाही, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
सध्या गुणतालिकेत १० संघांपैकी सीएसके आठव्या स्थानावर आहे, त्यांनी पाचपैकी दोन सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने सलग तीन सामने गमावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध घरच्या मैदानावरचे शेवटचे दोन सामने जिंकले. धोनी सीएसकेच्या घरच्या सामन्यांकडे टीम हॉटेलमधून लक्ष ठेवत आहे, मात्र तो सराव सत्रांमध्ये उपस्थित राहिला आहे. थ्रोडाऊनचा सामना करताना त्याला कोणतीही अडचण जाणवत नसल्याचं दिसलं.
कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या सामन्याच्या आदल्या दिवशी धोनीने फलंदाजी प्रशिक्षक माइक हसीसोबत काही वेळ सराव केला, मात्र मुख्य गोलंदाजांसमोर त्याने फलंदाजी केली नाही. केकेआर सामन्यापूर्वी त्याने डावखुरा फिरकीपटू नूर अहमदसोबतही वेळ घालवला. “एमएस धोनीने एका सराव सत्रात त्याच्यासोबत बराच वेळ चर्चा केली आणि त्याच्या लेग ब्रेकवर काम केलं. त्यामुळे त्याला खूप मदत झाली आणि त्याचे परिणामही दिसून आले,” असं सीएसकेचे गोलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम यांनी सांगितलं.
