धोनीचा हा फोटो कधीचा आहे माहिती आहे?

ICC ने चाहत्यांना विचारला प्रश्न

एका छोट्या विषाणूने सध्या साऱ्यांना ‘लॉकडाउन’ केले आहे. भारतासह देशभरातील क्रीडा स्पर्धा स्थगित झाल्या आहेत. सर्व क्रीडापटू आणि त्यांचा सहाय्यक कर्णचारी वर्ग आपापल्या घरी विश्राम घेत आहे. अशा कसोटीच्या काळात चाहत्यांशी संपर्क टिकवून ठेवण्यासाठी क्रीडापटू वेगवेगळ्या पद्धती शोधून काढत आहेत. त्यातील एक म्हणजे जुने फोटो पोस्ट करण्याचा एक ट्रेंड सोशल मीडियावर आला आहे. अनेक क्रिकेटपटूंनी हा ट्रेंड फॉलो केल्याचे दिसत आहे. ICC देखील त्यात सहभागी झाली आहे.

ICC च्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोन जुने फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक फोटो भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आहे. तर दुसरा फोटो इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याचा आहे. या फोटोसोबत ICC ने Flashback Friday असा हॅशटॅग वापरला आहे आणि हे दोन फोटो ICC च्या कोणत्या स्पर्धेतील आहेत? असा प्रश्न विचारला आहे.

 

View this post on Instagram

 

#FlashbackFriday Which ICC tournament are these headshots from?

A post shared by ICC (@icc) on

काही दिवसांपूर्वी असाच एक फोटो युवराज सिंगने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला होता. त्या फोटोत भारतीय क्रिकेट संघातील चार दिग्गज क्रिकेटपटू एका रांगेत टेलिफोन बूथवर उभे राहून आपल्या घरच्यांशी संपर्क साधताना दिसत होते. युवराजने शेअर केलेला फोटो खूप जुना होता. युवराजने या फोटोला मजेशीर कॅप्शन दिलं होतं आणि ‘मोबाईल जवळ नसतानाचे ते दिवस…’ असं फोटोबद्दल लिहिलं होतं. त्या फोटोत वीरेंद्र सेहवाग, आशिष नेहरा, व्ही व्ही एस लक्ष्मण यांनाही त्याने टॅग केलं होतं.

तसेच, मुंबईकर अजिंक्य रहाणेनेही एका फोटो शेअर केला होता. पण त्याने हा फोटो चाहत्यांचे मनोरंजन करण्याच्या उद्देशाने नव्हे, तर एक विशेष कारणासाठी पोस्ट केला होता. कर्णधार विराट कोहलीसोबत असलेल्या या फोटोखाली कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य याने लिहिले होते की आम्ही सारे क्रिकेटपटू आता क्रिकेट स्पर्धा किंवा मालिका सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहात आहोत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ms dhoni old photo icc flashback friday takes fans down memory lane vjb

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या