भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने इंडिया सीमेंट्सने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल संभाषणात तो ७ नंबरची जर्सी का घालतो, याचे रहस्य उघड केले. चेन्नई सुपर किंग्जची मालकी इंडिया सिमेंट्सची आहे. धोनी त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच फ्रँचायझी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर T20 असो, खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये ७ नंबरची जर्सी परिधान करत आला आहे.

क्रिकेटमध्ये सात नंबरची जर्सी घालणारं कोणी नव्हतं. त्यामुळे सात नंबरची जर्सी म्हटलं की डोळ्यासमोर एकच नाव समोर येतं, ते म्हणजे महेंद्र सिंह धोनी. याआधी ७ नंबरची जर्सी फुटबॉलमध्ये खूप महत्त्वाची असायची. कारण ही जर्सी डेव्हिड बेकहॅम, राऊल आणि क्रिस्टियानो रोनाल्डो सारख्या दिग्गज खेळाडूंनी परिधान केली होती.

Rohit Sharma on Mumbai Indians captaincy
रोहित शर्माचं मुंबई इंडियन्सच्या कॅप्टन्सीबाबत पहिल्यांदाच स्पष्ट विधान; म्हणाला, “संघात नवीन आलेल्यांनी माझे विचार..”
IPL 2024 Chennai Rajasthan Royals vs Gujarat Titans Match Updates in Marathi
IPL 2024: “असा विचार करू नका…” हर्षा भोगलेंना विजयानंतर शुबमन गिल नेमकं काय म्हणाला, पाहा व्हीडिओ
Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Katchatheevu island issue sri lanka
कच्चथिवू बेटाच्या वादावर श्रीलंकेचं पहिलं भाष्य; मंत्री म्हणाले, “फक्त सरकार बदललं म्हणून…!”

रोहित शर्मा की विराट कोहली, भारताचा उत्तम कसोटी कर्णधार कोण?; भारताच्या माजी खेळाडूने स्पष्टच सांगितलं

व्हर्च्युअल संभाषणादरम्यान धोनी म्हणाला, ‘बर्‍याच लोकांना सुरुवातीला वाटले की सात हा माझ्यासाठी लकी नंबर आहे. मात्र, त्यामागे एक अतिशय साधे कारण होते. माझा जन्म जुलै महिन्याच्या सातव्या तारखेला झाला. सातव्या महिन्याचा सातवा दिवस. त्यामुळेच कोणता नंबर चांगला आहे, याकडे जाण्याऐवजी मी माझी जन्मतारीख जर्सीचा नंबर म्हणून निवडली.’

एमएस धोनी म्हणाला, ‘मग लोक मला याबद्दल विचारत राहिले. म्हणून, मी त्या उत्तरात भर घालत राहिलो. ७/७ आणि नंतर आणि जन्मवर्ष ८१ आहे. आठ मधून १ वजा केल्यास ७ येते. हा एक नॅचरल नंबर होता. लोक मला जे म्हणत होते ते मी ऐकू लागलो. जेव्हा लोक मला विचारतात तेव्हा मी त्यानुसार उत्तर देतो. सात ही नैसर्गिक संख्या आहे. ती तुमच्या विरोधात जात नाही. म्हणून मी माझ्या उत्तरात ते देखील जोडले. मी याबद्दल खूप अंधश्रद्धाळू नाही, परंतु हा माझ्या मनाच्या जवळचा नंबर आहे. म्हणून, मी माझ्याजवळ ठेवतो,’ असं धोनीने सांगितलं.

धोनीने २००४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ७ क्रमांकाची जर्सी घालून भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. खेळाच्या इतिहासातील तीन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा हा दिग्गज क्रिकेटपटू एकमेव कर्णधार आहे.