MS Dhoni Hookah Viral Video: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये धोनी आणि पंतसह आणखी काही लोक दिसून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी धोनीचा हुक्का ओढत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा धोनी हुक्क्यामुळे चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये धोनी, “मी हुक्का ओढून येतो…”, असं बोलताना दिसून येत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच क्रिकेट चाहत्यांनी आणि नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. धोनी, पंत आणि आणखी काही लोक एका रूममध्ये असल्याचं दिसून येत आहे. ते कोणाच्या घरी आहेत की हॉटेलमध्ये, हे देखील स्पष्ट होऊ शकलेलं नाही. व्हिडीओमध्ये दिसत असलेले ६-७ लोक ग्रुप फोटो क्लिक करताना दिसून येत आहेत. तर पंत सोफ्यावर झोपलेल्या पंतला धोनी आपल्या बोटातील अंगठी काढून देताना दिसून येत आहे.

व्हिडीओ होतोय व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धोनी, पंत आणि ६ ते ७ लोक एजाँय करताना दिसून येत आहे. धोनी उठून जातो, त्यावेळी पंत त्याला हाक मारतो. धोनी परत येतो आणि पंतसोबत जे व्यक्ती बसले आहेत, त्यांच्या पाया पडताना दिसतो. त्यानंतर धोनी त्यांना म्हणतो की, “दादा हुक्का ओढून येतो…”, धोनी हुक्क्याचा उल्लेख करत असल्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील त्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आयपीएल २०२६ स्पर्धा सुरू असताना चेन्नई सुपर किंग्ज संघाचा माजी खेळाडू जॉर्ज बेलीने मोठा खुलासा करत म्हटले होते की, धोनी आपल्या रूममध्ये हुक्का ओढायचा.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली आहे. एका युझरने प्रतिक्रिया देत लिहिले की, “जर हेच एखाद्या महिला क्रिकेटपटूने केलं असतं, तर आणखी जोरदार टीका झाली असती. पुरुष क्रिकेटपटूचा आहे, म्हणून सर्वांनी हलक्यात घेतलं. जर यात गैर नाही, मग महिला क्रिकेटपटूने डान्स केला, त्यात काय गैर आहे?”, तर आणखी एका युझरने आपली प्रतिक्रिया देत लिहिले की, “खेळाडू आपल्या वैयक्तिक आयुष्यात काय करतात, याने कोणालाही त्रास व्हायला नको. कारण त्यांनी काही गुन्हा केलेला नाही.”