scorecardresearch

Premium

साक्षी धोनीच्या जीवाला धोका; पिस्तूल बाळगण्याची मागितली परवानगी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनी हिने आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

साक्षी धोनीच्या जीवाला धोका; पिस्तूल बाळगण्याची मागितली परवानगी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची पत्नी साक्षी धोनी हिने आपल्या जीवाला धोका असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. जीवाला धोका असल्याकारणाने स्वतःजवळ पिस्तूल बाळगण्याची परवानगी द्यावी, असे तिने म्हटले आहे.

साक्षीने पिस्तूल किंवा रिव्हॉल्व्हर जवळ बाळगण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज संबंधित अधिकारी वर्गाला केला आहे. या अर्जात तिने आपल्या जीवाला धोका असल्याची शक्यता वर्तवली आहे. ‘मी अनेकदा घरी एकटी असते. घराबाहेर पडतानादेखील बहुतांश वेळी मी एकटीच असते. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असळण्याची शक्यता आहे, असे तिने अर्जात नमूद केले आहे. या कारणास्तव शस्त्र बाळगण्याच्या परवाना कायद्याअंतर्गत साक्षीने पिस्तूल अथवा ०.३२ची रिव्हॉल्व्हर बाळगण्याची परवानगी संबंधित विभागाकडे मागितली आहे.

२०१० मध्ये धोनीलादेखील या परवान्यानांतर्गत शस्त्र बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे. ९ मिमी. पिस्तूल बाळगण्याचा परवाना त्याच्याकडे आहे. दरम्यान, झारखंड गृह विभागाने धोनीचा अर्ज डिसेंबर २००८मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवला होता. मात्र, त्या संबंधी काही अधिक माहितीची गरज असल्याचे सांगत त्यावर परवानगी मिळण्यास उशीर झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ms dhoni wife sakshi dhoni treat to life application arms license

First published on: 20-06-2018 at 15:57 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×