Mumbai Indians Record In IPL: आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ५ वेळचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण मुंबईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. स्पर्धेतील ६५ वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. इडन गार्डन्सच्या मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने २० षटकांअखेर १४७ धावा केल्या आहेत. दरम्यान या सामन्यासाठी मैदानात उतरताच मुंबई इंडियन्सच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त होता, त्यामुळे तो गेल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर सूर्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहने मुंबईचं नेतृत्व केलं. आता हार्दिक पंड्या नेतृत्व करण्यासाठी परतताच मुंबई इंडियन्सच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. आयपीएलमध्ये केवळ दुसऱ्यांदाच असं घडलं आहे.

कोलकाताच्या इडन गार्डन्सवर सुरु असलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर मुंबई इंडियन्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. हार्दिकने प्लेईंग ११ सांगितली त्यावेळी त्याने सांगितलं की, कोणाला संघात स्थान देण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने गेल्या ३ सामन्यांमध्ये ३ वेगवेगळे कर्णधार मैदानात उतरवले होते. यासह २०१३ नंतर दुसऱ्यांदाच असं घडलं आहे. याआदी २०१३ मध्ये पुणे वॉरियर्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात असं घडलं होतं. या सामन्यात पुणे वॉरियर्स संघाने देखील ३ सामन्यांमध्ये ३ कर्णधारांना संधी दिली होती.

मुंबई इंडियन्सचा पराभव

या सामन्यात मुंबईचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १४७ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईकडून कॉर्बिन बॉशने सर्वाधिक ३२ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सकडून मनीष पांडेने सर्वाधिक ४५ धावा केल्या. शेवटी रिंकू सिंगने चौकार मारुन कोलकाताला विजय मिळवून दिला.