scorecardresearch

Premium

WPL 2024 Auction : टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी बनली लखपती; दिनेश कार्तिकने सांगितले, कोण आहे कीर्तना बालकृष्णन?

Keerthana Balakrishnan : तामिळनाडूच्या कीर्तना बालकृष्णनला मुंबई इंडियन्सने तिच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. कीर्तनाचे वडील टॅक्सी चालक असून तिने टीएस मुकुंद यांच्या अकादमीतून प्रशिक्षण घेतले आहे.

Women's Premier League 2024 Updates in marathi
दिनेश कार्तिकने सांगितले, कोण आहे कीर्तना बालकृष्णन (फोटो-इन्स्टाग्राम)

Mumbai Indians bought auto driver’s daughter Keerthana Balakrishnan : तामिळनाडूच्या कीर्तना बालकृष्णनला डब्ल्यूपीएल २०२४ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने तिच्या मूळ किमतीत (रु. १० लाख) विकत घेतले. या स्पर्धेत खेळणारी ती तामिळनाडू राज्यातील पहिली क्रिकेटपटू ठरणार आहे. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने कीर्तनाची संपूर्ण कुंडली काढली आहे. कार्तिकने ट्विटरवर एका पोस्टद्वारे कीर्तनाबद्दल सर्व काही सांगितले आहे. त्याचबरोबर डब्ल्यूपीएलमध्ये खेळणारी ती तामिळनाडूची पहिली क्रिकेटपटू बनल्याचा अभिमान वाटत असल्याचे कार्तिकने म्हटले आहे.

अभिनव मुकुंदच्या वडिलांकडून घेतले प्रशिक्षण –

दिनेश कार्तिकने सांगितले की, लिलावात कीर्तनाची विक्री करणे ही एक मोठी गोष्ट आहे. कारण क्रिकेटच्या जगात अनेक नायक आहेत, परंतु प्रत्येकाला संधी मिळत नाही. कार्तिक म्हणाला, कीर्तनाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, असे नाही. तिने भारतीय क्रिकेटपटू अभिनव मुकुंदचे वडील टीएस मुकुंद यांच्या अकादमीतून प्रशिक्षण घेतले आहे. टीएस मुकुंद आर्थिकदृष्ट्या कमकुवत तरुण क्रिकेटपटूंना पैशाशिवाय प्रशिक्षण देतात आणि कीर्तनानेही असेच प्रशिक्षण घेतले आहे. कीर्तना ही उजव्या हाताची फलंदाज आणि लेगस्पिनर असून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करते.

genelia and riteish deshmukh madhuri dixit reach jamnagar for anant ambani pre wedding
अनंत अंबानींच्या प्री-वेडिंगसाठी पतीसह पोहोचली माधुरी दीक्षित, तर रितेश-जिनिलीयाला पाहून पापाराझी म्हणाले, “दादा…”
anant ambani and radhika marchant wedding guest will get hand made candle
अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंगसाठी जामनगरच का निवडले? ‘या’ शहराशी अंबानी कुटुंबाचा आहे जवळचा संबंध
Anand Mahindra Offered Thar Car To Sarfaraz Khan Father
हिंमत हरु नका! आनंद महिंद्रांनी सरफराज खानच्या वडिलांना दिली मोठी ऑफर, म्हणाले ‘प्रेरणादायी वडील…’
Actress Sayali Sanjeev
अभिनेत्री सायली संजीव म्हणते, मला शेतकरी नवरा हवा…

कीर्तनाची पार्श्वभूमी –

दिनेश कार्तिकने सांगितले की, कीर्तनाची पार्श्वभूमी अगदी साधी आहे. तिचे वडील टॅक्सी ड्रायव्हर आहेत, पण डब्ल्यूपीएलमधील यशस्वी संघात निवड झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही चांगली होईल. ही २३ वर्षीय खेळाडू हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळताना दिसणार असून तिला स्पर्धेत आपली छाप सोडायला आवडेल. कीर्तना व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सने अष्टपैलू खेळाडू अमनदीप कौर, एस सजना, फातिमा जाफर आणि दक्षिण आफ्रिकेची माजी वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईल यांचा संघात समावेश केला आहे.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : विराट-रोहितच्या खेळण्यावर गौतम गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘टी-२० विश्वचषकासाठी दोन्ही खेळाडूंची…’

देशांतर्गत क्रिकेटमध्ये कीर्तनाची कामगिरी –

देशांतर्गत क्रिकेटमध्ये तामिळनाडू महिला, भारतीय ग्रीन महिला, दक्षिण विभागीय महिला आणि ऑरेंज ड्रॅगन महिला संघांकडून खेळली आहे. कीर्तना भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठे नाव बनणार आहे. तिने २०२१-२१ मध्ये फ्रीयर कपमध्ये ३४ च्या सरासरीने आणि ८६ च्या स्ट्राइक रेटने १०२ धावा केल्या होत्या. तसेच तिने चार विकेट्सही घेतल्या होत्या. या एकदिवसीय स्पर्धेत तामिळनाडूकडून खेळताना तिने तिनदा तीन विकेट्स घेतल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai indians bought auto drivers daughter keerthana balakrishnan in wpl 2024 auction vbm

First published on: 10-12-2023 at 17:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×