‘‘….तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते’’

मुंबई इंडियन्सच्या युवा खेळाडूने सांगितला भावनिक अनुभव

Mumbai Indians fast bowler yudhveer singh charak on ipl auction 2021
युधवीर सिंह चरक

आयपीएल स्पर्धा ही क्रिकेटविश्वातील सर्वात मोठी टी-20 स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेत खेळण्यासाठी अनेक युवा क्रिकेटपटू खूप मेहनत घेतात. अशात, या खेळाडूंना बलाढ्य संघानी आपल्या ताफ्यात सामील करून घेतले, तर त्यांनाही बरेच शिकायला मिळते. असाच अनुभव मुंबई इंडियन्सचा युवा वेगवान गोलंदाज युधवीर सिंह चरकला आला.

आयपीएल 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, त्यात त्यांना एक विजय मिळाला आहे. पाच वेळा विक्रमी विजेतेपद पटकावलेल्या मुंबईने यंदाच्या मोसमात संघात वेगवान गोलंदाज युधवीर सिंह चरकचा समावेश केला आहे. या खेळाडूला अद्याप आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली नसली, तरी युधवीर या सुवर्ण संधीबद्दल आशावादी आहे.

युधवीर चरक म्हणाला, ”यावर्षी 18 फेब्रुवारी रोजी लिलावादरम्यान गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खान सरांनी माझे नाव घेतले, तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. मला माहित होते की माझे नाव हे शेवटचे असेल. जर नसेल, तर ठीक होते. मी आणि माझे कुटुंब टीव्हीकडे नजरा लावून होतो.”

 

तो म्हणाला, “ही गोष्ट माझ्यासाठी किती अविश्वसनीय होती, हे मी सांगू शकत नाही. मुंबईसाठी निवडले जाणे ही माझ्यासाठी आणि माझे राज्य जम्मू-काश्मीरसाठी एक मोठी गोष्ट होती. माझ्या राज्यातील खेळाडूंना माझ्याकडून खूप अपेक्षा होती, की सामना खेळेन आणि माझ्या राज्याचे नाव उंचावेन.”

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हैदराबादचे प्रतिनिधित्व करणारा चरकला मुंबई इंडियन्सने यावेळी आयपीएलच्या लिलावात 20 लाख रुपयांची बोली लावून संघात घेतले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Mumbai indians fast bowler yudhveer singh charak on ipl auction 2021 adn

ताज्या बातम्या