Mumbai Indians Schedule In IPL 2026: आयपीएल २०२६ स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. २८ मार्चपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. काही दिवसांपू्र्वी या स्पर्धेतील पहिल्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं होतं. गुरूवारी या स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्याचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ५ वेळा जेतेपदाचा मान पटकावला आहे. आता सहाव्यांदा जेतेपद मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ मैदानात उतरणार आहे. मुंबई इंडियन्सचे ७ सामने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. दरम्यान हे सामने कधी आणि कोणत्या संघाविरूद्ध होणार? जाणून घ्या.
आयपीएल २०२६ स्पर्धेतील पहिला सामना २८ मार्चला खेळवला जाणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये खेळवला जाणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघ आपला पहिला सामना २९ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स संघाविरूद्ध खेळणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर ४ एप्रिलला होणाऱ्या सामन्यात मुंबईचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. हा सामना दिल्लीत खेळवला जाणार आहे. तर ७ एप्रिलला गुवाहाटीच्या मैदानावर मुंबई विरूद्ध राजस्थान सामना खेळवला जाईल. त्यानंतर साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सामना पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्सविरूद्ध होणार आहे. हा सामना २४ मे ला मुंबईत खेळवला जाईल.
मुंबई इंडियन्स १२ एप्रिलला आपल्या घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना करणार आहे. तर बहुप्रतिक्षित मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचा थरार २३ एप्रिलला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. २९ एप्रिलला वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरूद्ध हैदराबाद सामना होणार आहे. ४ मे ला मुंबई इंडियन्स विरूद्ध लखनौ सुपरजायंट्स सामना खेळवला जाणार आहे. यावेळी पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. हार्दिकला रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव हे २ टी-२० वर्ल्डकपविजेते कर्णधार मार्गदर्शन करताना दिसतील.
मुंबई इंडियन्स संघाचं संपूर्ण वेळापत्रक
२९ मार्च – मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स – मुंबई – ७:३० वाजता.
४ एप्रिल – दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स – दिल्ली – ३:३० वाजता.
७ एप्रिल – राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स – गुवाहाटी – ७:३० वाजता.
१२ एप्रिल – मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – मुंबई – ७:३० वाजता.
१६ एप्रिल – मुंबई इंडियन्स vs पंजाब किंग्स – मुंबई – ७:३० वाजता.
२० एप्रिल – गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स – अहमदाबाद – ७:३० वाजता.
२३ एप्रिल – मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्स – मुंबई – ७:३० वाजता.
२९ एप्रिल – मुंबई इंडियन्स vs सनरायझर्स हैदराबाद – मुंबई – ७:३० वाजता.
२ मे – चेन्नई सुपर किंग्स vs मुंबई इंडियन्स – चेन्नई – ७:३० वाजता.
४ मे – मुंबई इंडियन्स vs लखनऊ सुपर जायंट्स – मुंबई – ७:३० वाजता.
१० मे – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू vs मुंबई इंडियन्स – रायपूर – ७:३० वाजता.
१४ मे – पंजाब किंग्स vs मुंबई इंडियन्स – धरमशाला – ७:३० वाजता.
२० मे – कोलकाता नाईट रायडर्स vs मुंबई इंडियन्स – कोलकाता – ७:३० वाजता.
२४ मे – मुंबई इंडियन्स vs राजस्थान रॉयल्स – मुंबई – ३:३० वाजता.
